भारतकुमार राऊत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नामदार गोखले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आणि अशा महापुरुषांच्या नावाचा उदंड जप करत चरितार्थ चालवणारे लाखो लोक या देशात आहेत. पण ज्यांच्या नावावर आपला उदरनिर्वाह चालतो, त्यांच्या स्मारकांचे किमान जतन करण्याचे कोणाला सुचत नाही... ........... एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत, समाजसुधारक आणि पत्रकार गोपाळ गणेश आगरकर यांनी 'महापुरुषांचा पराभव' या निबंधात लिहिले की, 'बव्हंश: महापुरुषांचा पराभव होण्यास त्यांचे पाठिराखेच कारणीभूत ठरतात. महापुरुषांनी जी शिकवण दिली, तिच्या अगदी उलटे वागण्याची पाठिराख्यांची तऱ्हा असते.' आगरकरांच्या या लिखाणाला शंभर वषेर् उलटून गेली, तरी परिस्थिती बदललेली नाही, याचे वारंवार दाखले मिळत राहतात. अशावेळी पाठिराख्यांचा राग येण्याबरोबरच महापुरुषांची कीव येत राहते. याचे कारण महापुरुषांनी आपल्या हयातीत जे कार्य केले, त्याची मुबलक फळे चाखणारे त्यांचे पाठिराखे व कार्यकतेर् त्या महापुरुषांची शिकवण अमलात आणत नाहीतच, शिवाय त्यांच्या स्मारकांचेही रक्षण करीत नाहीत. या विषयावर आजच लिहिण्याचे कारण हे की, २ जानेवारीला सकाळी मुंबईतील काही पत्रकार वरळी नाक्यावरील आचार्य अत्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त त्यांना पुष्पांजली वाहण्यासाठी जमले. या कार्यक्रमाची पूर्वकल्पना स्थानिक पोलिस, महापालिका वॉर्ड ऑफिसर यांना दिल्याने पोलिसांचा बंदोबस्त होता. पण पुतळ्याच्या पायथ्याशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, फुटलेले ग्लास, लिंबू आदींचा खच होता. आचार्य अत्रेंच्या पायाशीच नक्की 'रंगल्या रात्री' कशा असतील, याची पूर्ण कल्पना यावी, अशी ही परिस्थिती. गजबजलेल्या वरळी नाक्यावरच असे करण्याचे कोणाचे धाडस का व्हावे? आणि झालेच, तर त्यांना कोणीच, अगदी पोलिसांनीही का रोखू नये? या पुतळ्यापासून जेमतेम शंभर फुटावर ट्रॅफिक पोलिसची चौकी आहे. पहाऱ्यावरील पोलिस अधिकाऱ्याला विचारले, तर त्याचे उत्तर असे की, दोनच दिवसांपूवीर् ३१ डिसेंबरची रात्र होती. त्यावेळचे हे कृत्य असावे. त्या नंतर दोन दिवस उलटले, तरी ना पोलिसांना याची दखल घ्यावीशी वाटली, ना महापालिकेला काही करावेसे वाटले. नंतर महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून तक्रार केली, तेव्हा अवघ्या तासाभरात सारे काही साफसूफ झाले. रात्री जाऊन विचारले, तर असे काही घडलेच नव्हते; साऱ्या 'मीडियाच्या बाता', त्याकडे लक्ष देऊ नका, असे ठामपणे सांगण्यात आले. योगायोगाने रिकाम्या बाटल्या, लिंबू, फुटलेले ग्लास यांचे फोटोच एका फोटोग्राफर पत्रकाराने टिपले आहेत. पण कदाचित, ते सारेही बनावट असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांना बदनाम करण्याचा डाव आहे, असा कांगावा ही मंडळी करू शकतील. हे एकच उदाहरण नाही. फोर्ट भागात गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूतीर् महादेव गोविंद रानडे प्रभृतींचे पुतळे आहेत. इंग्रजांच्या राजवटीत लोकवर्गणीतून हे पुतळे उभारले गेले. या विभूतींच्या लोकप्रियतेची व समाजातील त्यांच्या स्थानाची ही पावती होती. आज जर आपण हे पुतळे बघितले, तर नामदार गोखल्यांच्या पुतळ्याच्या आसऱ्याने दुकानांच्या टपऱ्या दिसतात. न्या. रानड्यांच्या अंगावरील धूळ दरवषीर्च्या पावसात दूर होते, तितकीच. दादर भागात सेनापती पांडुरंग सदाशिव बापट, नाटककार राम गणेश गडकरी यांचे पुतळे मोक्याच्या जागी आहेत. वर्षातून दोनदा-जयंती व पुण्यतिथीला त्यांच्या गळ्यात हार पडतात. पुढे ते निसर्गक्रमानुसार कुजून नष्ट होईपर्यंत गळ्यातच असतात. शिवाजी पार्कात वारंवार वेगवेगळे समारंभ, मेळावे, जाहीर सभा होत राहतात. त्यांचे मोठाले फलक सेनापती बापटांना चहूबाजूंनी घेरतात. मग ब्रिटिश साम्राज्यातील पोलिसांना हुलकावणी देणारे सेनापती स्वातंत्र्यात मात्र राजकारण्याच्या बॅनर्सच्या जेलमध्ये बंदिस्त होतात. गडकरींची अवस्था तर त्याहून बिकट. ते शिवाजी पार्क नाक्यावरच उभे आहेत. तो चौक 'गडकरी चौक' बनल्यामुळे बेस्ट बसच्या पाट्यांपुरते त्यांचे स्मरण जिवंत राहिले. त्यांच्या अर्धपुतळ्यासमोर सदैव कोणा ना कोणा नेत्याच्या वाढदिवसांच्या अभीष्टचिंतनाचे किंवा कोणा नेत्याची कुठेतरी नेमणूक झाल्याचे बोर्ड. 'एकच प्याला'सारखे नाटक लिहून आणि 'विरामचिन्हे'सारखी कविता लिहून जो साहित्यिक अजरामर झाला आणि 'अर्धा शेक्सपियर' म्हणून मराठी समाजाला प्रिय ठरला, त्यालाच आपण झाकोळले आहे, हे त्या बिचाऱ्या प्लॅस्टिकच्या होडिर्ंगांना काय कळणार? ती अक्कल ही होडिर्ंग्ज तिथे लावणाऱ्यांना असायला हवी. पण स्वत:चे नाव आणि फोटो यावरच फिदा असणाऱ्यांना कोण कुठले गडकरी? असे अनेक किस्से. चंेबूरकडून मुंबईत शिरतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. त्याच्या आसपास असलेल्या उद्यानाच्या कुंपणावर जर्द्याच्या जाहिराती लागतात. गांधीजींच्या पुतळ्याजवळ कुठल्याशा विदेशी कापड कंपनीच्या फॅब्रिक्सचे बोर्ड दिसतात. फोर्टात मंगळदास माकेर्टजवळ 'हुतात्मा बाबू गेनू मार्ग' नावाची छोटी गल्ली आहे. गांधीजींच्या स्वदेशीच्या आंदोलनाने पेटून उठलेल्या बाबू गेनू या कापड बाजारातील कामगाराने विदेशी कापड घेऊन भरधाव जाणाऱ्या ट्रकसमोर स्वत:ला झोकून दिले. बाबू गेनू हुतात्मा झाले. पुढे स्वातंत्र्य मिळाले. ज्या रस्त्यावर त्यांचे स्मारक झाले, त्याच रस्त्यावरील दुकानांत परदेशी कापडाची घाऊक खरेदीविक्री सुरू झाली. ती तरी रोखावी, असे कोणाला वाटले नाही. महापुरुषांचा हा पराभव कोणी केला? छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नामदार गोखले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आणि अशा महापुरुषांच्या नावाचा उदंड जप करत आपले राजकारण करत चरितार्थ चालवणारे लाखो लोक या देशात आहेत. पण ज्यांच्या नावावर आपला उदरनिर्वाह चालतो, त्यांच्या स्मारकांचे किमान जतन करण्याचे कोणाला सुचत नाही. त्यामुळेच वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक हमरस्त्यावर असूनही अडगळीला जाते आणि हा 'दाढीवाला' कोण असा प्रश्ान् अनोळखीेंना पडतो. बोरिबंदर स्थानकासमोर उभ्या राहिलेल्या १८५७च्या हुतात्म्यांच्या स्मारकासमोर महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या उभ्या ठाकतात आणि आतल्या हिरवळीवर महापालिकेचाच सिक्युरिटी गार्ड विड्या फुकत दिवस 'भरतो.' अशा वेळी स्मरण होते ते लंडनमधील पार्लमेंटसमोर उभ्या राहिलेल्या माजी पंतप्रधान सर विस्टन चचिर्ल यांच्या, वॉटर्लूच्या लढाईत ब्रिटनला विजय मिळवून देणाऱ्या सेनापती नेल्सनच्या स्मारकांचे. ब्रिटिश सरकार, लंडनची महापालिका यांच्याबरोबरच तिथली जनता या नेत्यांच्या स्मृतीचे प्राणपणाने रक्षण, जतन करते व तिचे पावित्र्य राखते. न्यूयॉर्कला बोस्टन टी पाटीर्चे स्मारक आहे. तिथे कोणी सिगरेट फुंकत फिरताना दिसणार नाही आणि पॅरिसला नेपोलियन बोनापार्टच्या स्मारकात शिरताना सर्व युरोपीय नागरिकांच्या हॅट नकळत डोक्यावरून उतरून हातात येतात. हा विचार आपल्या मनात नोंदला जाईल, तेव्हाच महापुरुषांचा पराभव टळेल आणि अत्रेंच्या पायाशी दारूच्या पाटर््या झोडण्याचा 'गेल्या एक हजार वर्षांत झाला नाही' असा अपराध दर ३१ डिसेंबरला करण्यास कोणी धजणार नाही. (लेखक टाइम्स ऑफ इंडिया समूहाचे संपादकीय सल्लागार असून शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आहेत.) |
0 comments:
Post a Comment