From: Sapre Uday (Mumbai - Project Control) <U.Sapre@ticb.
Date: 2010/2/9
Subject: e book : to ani ti : Original copy
To:
Courtesy : naama gumjaayegaa
दोस्त,
ई साहित्य प्रकाशनाचं चौथं मराठी ई बुक 'तो आणि ती' आज प्रकाशित होतं आहे. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीची original ई कॉपी आपणासमोर ठेवताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. मराठी भाषेला नव्या ई युगात मानाच्या स्थानावर नेण्याच्या असंख्य लोकांच्या प्रयत्नाला आम्ही हातभार लावू शकतो यात आम्हाला खुप खुप आनंद आहे.
"तो आणि ती" हे एक छान पुस्तक आहे. छान म्हणजे छान. निवांत. सिंपल. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं म्हणणार्या पाडगांवकरांच्या कवितेचं ते थोडंसं विस्तारित रूप म्हणा ना. कसलीच पंडितगिरी न करता, किंवा गोंडस शब्द न पेरता अगदी रोजच्या जीवनातलं प्रेम या पुस्तकात रंगवलं आहे. कसलीच रंगरंगोटी नाही. फ़ॅशनेबल आवरणं नाहीत. जडजंबाल शब्द नाहीत. उपमा , उत्प्रेक्षा, रुपक वगैरे अलंकार नाहीत. अगदी साधं सुधं वरणभात प्रेम.
"ढाई आखर प्रेमका पढे तो पंडित होय".
प्रेमाचा सुगंध असलेलं हे पुस्तक तुम्हाला सहजपणे कधी पंडित बनवेल कळणारही नाही.
हे पुस्तक लिहीणारा कवी मयुरेश कुलकर्णी हा वीस बावीस वर्षांचा तरूण विद्यार्थी आहे. मूळचा हा भारतीय मराठी मुलगा सध्या दक्षिण आफ़्रिकेत शिकतो आहे. आईवडीलही पूर्व आफ़्रिकेतल्याच अंगोला या देशात असतात. तुमच्या आमच्यासारखाच हा तरूण इंटरनेटवर कविता पोस्ट करत असतो. त्याच्या इतर कविता वाचण्यासाठी त्याला लिहा mayuresh87@gmail.
तो आणि ती हे पुस्तक कसं वाटलं हे आम्हाला esahity@gmail.
ई साहित्य प्रकाशनाची साप्ताहिक नेटाक्षरी, स्वरनेटाक्षरी, काव्यांजली दिवाळी अंक आदी प्रकाशनं सातत्याने सुरूच असतात. सुमारे ५०००० लोकांपर्यंत पोहोचणारी ही प्रकाशनं आहेत. लवकरच ही वाचक संख्या १ लाखावर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि त्याने आमचं समाधान नाही. प्रत्येक मराठी ई मेल धारक, इंटरनेटला जोडलेला प्रत्येक मराठी माणूस आमच्या या चळवळीत जोडला जावा हा आमचा ध्यास आहे. मराठी साहित्य नव्या ई युगात सर्वोच्च स्थानावर जावं, मराठीच्या अभिव्यक्तीची ताकद जगभर पसरलेल्या नव्या पिढीला जाणवावी हा आमचा उद्देश आहे. नवीन मराठी साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण या नवीन ई साहित्य यज्ञात सामिल व्हावं असा आमचा आग्रह असतो. या साठी आपण आमच्याशी संपर्क साधावा.
कळावे. लोभ असावा.
आपला मित्र
नाम गुम जायेगा
समन्वयक
ई साहित्य प्रकाशन
ताजा कलम : Our other activities
काव्यांजली ई दिवाळी अंकास भेट द्या: http://kavyanjalide
नेटाक्षरी चे साठ साप्ताहिक अंक पहा : www.netaksharee.
स्वरनेटाक्षरी आठ अंक : www.swarnetaksharee
या पुर्वीची प्रकाशित पुस्तकं :
टल्लीची शाळा : टल्ली
मकरंदची त्रिवेणी : कवी मकरंद सावंत
ग्रेव्हयार्ड लिटरेचर : कवी प्राजक्त देशमुख
ऑर्कुट फ़ेसबुक आणि ट्विटर यांवर तसेच निरनिराळ्या मराठी कवितांच्या ब्लॉग वर आम्ही भेटतच असतो तुम्हाला.
Attachment(s) from =?UTF-8?B?4KS44KS+4KSX4KSwIOCkreCkguCkoeCkvuCksOClhw==?=
1 of 1 File(s)
0 comments:
Post a Comment