sponsers

Sunday, February 7, 2010

[arya_amhi_marathi] Marathi Nokrya .....

 



---------- Forwarded message ----------
From: Sapre Uday (Mumbai - Project Control) <U.Sapre@ticb.com>
Date: 2010/2/8
Subject: FW: Marathi Nokrya .....
To:


See if this helps any !

 


Courtesy : Bhopi Poonam

 

 

Please forward to those who are in need ……

ठाणे पोलीस दलात शिपाई पदाच्या ६७० जागा
महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती अंतर्गत ठाणे शहर पोलीस दलात पोलीस शिपाई (६६८ जागा), बँडसमन (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती दि. ८ मार्च २०१० रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम, ठाणे शहर येथे होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ३ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.


भंडारा जिल्हा न्यायालयात १३० जागा
भंडारा जिल्हा न्यायालयात बेलिफ (३० जागा), शिपाई (२५ जागा), कनिष्ठ लिपिक (७५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बँ
क ऑफ इंडियामध्ये ४२ जागा
बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा सल्लागार (१ जागा), तांत्रिक अधिकारी (२ जागा), फायनान्स एक्झिक्युटिव्ह (३९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑन लाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती
www.bankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. ३ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेत ३२ जागा
ठाणे जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत विशेष शिक्षक -कर्णबधिर (५ जागा), विशेष शिक्षक -मतिमंद (२२ जागा), विशेष शिक्षक-दृष्टिदोष (५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. ६ फेब्रुवारी २०१० रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अपंगांसाठी २ जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अपंग अनुशेष भरती मोहिमेअंतर्गत पर्यवेक्षक (१ जागा), लिपिक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयात ३३० जागा
नगर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई येथे लिपिक टंकलेखक (२२८ जागा), हमाल (१०२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई मुख्यमहानगर दंडाधिकारी कार्यालयात १६६ जागा
मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई या कार्यालयात लिपिक-टंकलेखक (७४ जागा) लघुलेखक-उच्च श्रेणी (१४ जागा), लघुलेखक-निम्न श्रेणी (२० जागा), शिपाई (५८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयात ८० जागा
औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयात स्टेनोग्राफर -निम्नश्रेणी (३० जागा), शिपाई (५० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ६२ जागांसाठी परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील अधिव्याख्याता (६२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. २९ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भंडारा जिल्हा न्यायालयात १५५ जागा

भंडारा जिल्हा न्यायालयात लघुलेखक-निम्न श्रेणी (२५ जागा), कनिष्ठ लिपिक (७५ जागा), शिपाई (२५ जागा), बेलिफ (३० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नाशिक जिल्हा न्यायालयात २२० जागा

नाशिक जिल्हा न्यायालयात लघुलेखक-निम्न श्रेणी (२२ जागा), कनिष्ठ लिपिक (५४ जागा), शिपाई (१८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमत आवृत्तीत दि. २५ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.


पुणे येथील सी डॅक केंद्रात २३ जागा
पुणे येथील प्रगत संगणक विकास केंद्र (सीडॅक) येथे प्लेसमेंट एक्झिक्युटिव्ह (१ जागा), प्लेसमेंट असिस्टंट (२ जागा), मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (२ जागा), कॉन्सुलर (२ जागा), सेक्रेटरी (५ जागा), अकाउंट असिस्टंट (१ जागा), हिंदी ऑफिसर (१ जागा), रिसेप्शनिस्ट (३ जागा), मल्टिफंक्शनल स्टाफ (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.cdac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बेस्टमध्ये प्रशिक्षणार्थी तारतंत्रीच्या ३३ जागा

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) प्रशिक्षणार्थी तारतंत्री (३३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २८ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत १९ जागा

राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत प्रकल्प सहायक (१९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. ५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.nplindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय तटरक्षक दलात यांत्रिक, नाविक भरती

भारतीय तटरक्षक दलात यांत्रिक, नाविक, कुक व स्टुअर्डची पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३-२९ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

ठाणे जिल्हा रुग्णालयात १ जागा

महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेमार्फत ठाणे जिल्हा रुग्णालयात डाटा मॅनेजर (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २८ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

सातारा जिल्हा न्यायालयात २२० जागा

सातारा जिल्हा न्यायालयात लघुलेखक-निम्न श्रेणी (२४ जागा), कनिष्ठ लिपिक (१०४ जागा), शिपाई (९२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. ऐक्यच्या सातारा आवृत्तीत दि. २५ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञाच्या ११ जागा

राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ (११ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.nplindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमाडंटंची भरती

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमाडंटची पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३-२९ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

अहमदनगर जिल्हा न्यायालयात २३० जागा

अहमदनगर जिल्हा न्यायालयात लघुलेखक-निम्न श्रेणी (१८ जागा), कनिष्ठ लिपिक (१२२ जागा), शिपाई (९० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नवी मुंबई महापालिकेत १ जागा
नवी मुंबई महानगरपालिकेत वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. ११ फेब्रुवारी २०१० रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता व सामनामध्ये दि. २६ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी व लिपिकाच्या १२५५ जागा
पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी- स्थापत्य अभियंता (४ जागा), अधिकारी- इलेक्ट्रिकल अभियंता (३ जागा), अधिकारी-आर्किक्टेक्चर (२ जागा), लिपिक (१२४६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://pnbindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २० जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

सशस्त्र सीमा बलमध्ये खेळाडूंसाठी १४२ जागा

सशस्त्र सीमा बलमध्ये खेळाडूंसाठी कॉन्स्टेबल-पुरुष (१४० जागा), कॉन्स्टेबल-स्त्री (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१० आहे. अर्ज व अधिक माहिती http://www.ssb.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मध्य रेल्वेत २ जागा

मध्य रेल्वेमध्ये सांस्कृतिक कोट्याअंतर्गत ग्रुप सी मध्ये २ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १६-२२ जानेवारीच्या अंकात आली आहे.

इंडियन ऑईल कार्पोरेशनध्ये बॉयलर ऑपरेशन अभियंत्याच्या ३ जागा

इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये बॉयलर ऑपरेशन अभियंता (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.iocl.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इंडियन ऑईल कार्पोरेशनध्ये अपंगांसाठी ४ जागा

इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये अपंगांसाठीच्या विशेष भरती मोहिमेअतंर्गत लॅब अनॉलिस्ट (१ जागा), मटेरियल असिस्टंट (२ जागा), असिस्टंट केमिस्ट (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.iocl.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रिज कमिशनमध्ये ३१ जागा

केंद्र शासनाच्या खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रिज कमिशनमध्ये इकॉनॉमिक इन्व्हेस्टिगेटर (३ जागा), कनिष्ठ उपसंपादक (१ जागा), ऑडिटर (३ जागा), सहायक विकास अधिकारी (४ जागा), सुपरिडेंट (५ जागा), स्टेनो (५ जागा), कनिष्ठ स्तर लिपिक (१० जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १६-२२ जानेवारीच्या अंकात आली आहे.

नॅशनल थर्मल पॉवर लिमिटेडमध्ये १३३ जागा

नॅशनल थर्मल पॉवर लिमिटेडमध्ये सिव्हिल कंन्स्ट्रक्शन (७० जागा), सेफ्टी (९ जागा), इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (४ जागा), वैद्यकीय अधिकारी (३१ जागा), कंपनी सेक्रेटरी (४ जागा), फॅकल्टी फॉर ट्रेनिंग (४ जागा), जिओलॉजी /जिओग्राफिक/ड्रिलिंग /फिल्ड ऑपरेशन (४ जागा), इन्व्हॉर्नमेंट (१ जागा), रिसर्च अलायन्स (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ntpc.timesjobs.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बेस्टमध्ये सुरक्षा रक्षकाच्या ३१९ जागा

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात सुरक्षा रक्षक (३१९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत करावेत. सविस्तर जाहिरात दै. लोकमत व सामनामध्ये दि. २० जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

सशस्त्र सीमा बलमध्ये १० जागा

सशस्त्र सीमा बलमध्ये व्हेटर्नरी असिस्टंट सर्जन (१० जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०१० आहे. अर्ज व अधिक माहिती http://www.ssb.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पंजाब अँड सिंध बँकेत अधिकार्‍यांच्या ५६५ जागा

पंजाब अँड सिंध बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (५०० जागा), तांत्रिक अधिकारी (५ जागा), चार्टर्ड अकाउंटंट (२५ जागा), ईडीपी ऑफिसर (३५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.psbindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २० जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात १ जागा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुलसचिव (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. १९ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

पंजाब अँड सिंध बँकेत लिपिका -नि- रोखपालच्या २५० जागा

पंजाब अँड सिंध बँकेत लिपिक-नि-रोखपाल (२५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.psbindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २० जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलात ९० जागा

केंद्रीय राखीव पोलीस दलात सीटी/टेक्निकल/ट्रेडसमन (९० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०१० आहे. अर्ज व अधिक माहिती http://www.crpf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ।

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये ३३ जागा

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये शास्त्रज्ञ (३३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०१० आहे. अधिक माहिती http://www.iictindia.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये ३१ जागा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अभियंता (३१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. २७ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०१० या कालावधीत होणार आहेत. अधिक माहिती http://www.bhel.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय सैन्य दलात विधी पदवीधरांसाठी १३ जागा

भारतीय सैन्य दलात विधी पदवीधरांसाठी पुरुषांच्या ६ जागा व महिलांच्या ७ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज २० फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती www.indianarmy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

भारतीय सैन्य दलात एनसीसी स्पेशल एन्ट्री स्किम अंतर्गत ५९ जागा

भारतीय सैन्य दलात एनसीसी विशेष भरती अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशनमार्फत पुरुषांच्या ५० जागा व महिलांच्या ९ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज १० फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

खडकीच्या इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत ३८१ जागा

इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी खडकी (पुणे) येथे अर्धकुशल कारागिर (३८१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

दामोदर व्हॅली कार्पोरेशनमध्ये ५९ जागा

दामोदर व्हॅली कार्पोरेशनमध्ये प्रशिक्षणार्थी व्यवस्थापक (२३ जागा), वरिष्ठ प्रशिक्षणार्थी औषधनिर्माता (२५ जागा), सुरक्षा अधिकारी (८ जागा), सहायक नि कनिष्ठ भाषांतरकार (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती www.dvc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

अणू ऊर्जा विभागात २४ जागा

अणू ऊर्जा विभागाच्या सामान्य सेवा संस्थेत सायंटिफिक ऑफिसर (९ जागा), नर्स (७ जागा), सायंटिफिक असिस्टंट (५ जागा), फार्मासिस्ट (२ जागा), ट्रेडसमन (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०१० आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

पार्लमेंट ऑफ इंडियामध्ये ५२ जागा

पार्लमेंट ऑफ इंडियामध्ये राजशिष्टाचार अधिकारी (३५ जागा), संशोधन अधिकारी (१७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०१० जागा आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीत ४ जागा

देहूरोड (पुणे) येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत वरिष्ठ नर्स (१ जागा), मेडिकल असिस्टंट (१ जागा), वॉर्ड सहायक (१ जागा), फार्मासिस्ट (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

बिहार क्षेत्रीय ग्रामीण बँकेत ८६ जागा

बिहार क्षेत्रीय ग्रामीण बँकेत लिपिक-नि-रोखपाल (८६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

ईआरएनईटीमध्ये १५ जागा

ईआरएनईटी इंडियामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (१ जागा), व्यवस्थापक (१ जागा), ज्युनिअर सायंटिफिक ऑफिसर (१ जागा), तांत्रिक सहायक (२ जागा), खासगी सचिव (२ जागा), सहायक (३ जागा), स्टेनोग्राफर (५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसात करावे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. अधिक माहिती www.eis.ernet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत १४ जागा

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत सहायक संचालक -राजभाषा (१ जागा), कार्यक्रम सहायक (१ जागा), तांत्रिक सहायक (७ जागा), चालक (१ जागा), कनिष्ठस्तर लिपिक (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांत करावे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. अधिक माहिती www.cicr.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

भारतीय अन्न महामंडळात अधिका-यांच्या १५ जागा

भारतीय अन्न महामंडळात उपसरव्यवस्थापक -लेखा (९ जागा), उपसरव्यवस्थापक - सामान्य प्रशासन (१ जागा), उप सरव्यवस्थापक - इले/यांत्रिक (१ जागा), सहायक सरव्यवस्थापक - विधी (२ जागा), सहायक सरव्यवस्थापक - तांत्रिक (१ जागा), वैद्यकीय अधिकारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://specialtest.in/fci यासंकेतस्थळावर मिळेल. या संबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. ९ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

अंबरनाथच्या मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत १ जागा

संरक्षण मंत्रालयाच्या अंबरनाथ येथील मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत मशिनिस्ट सेमी स्किल्ड (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ९ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

ओनएनजीसीमध्ये २४ जागा

ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये उपमहाव्यवस्थापक (१ जागा), वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (१४ जागा), वैद्यकीय अधिकारी (७ जागा), कंपनी सेक्रेटरी/व्यवस्थापक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत ११ जागा

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ (११ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.nplindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बेस्टमध्ये मागासवर्गीय भरती अंतर्गत ३७६ जागा

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) मागासवर्गीय विशेष भरती अंतर्गत दुय्यम निबंधक (१ जागा), महाकार्यदेशक -यांत्रिकी (२ जागा), कार्यदेशक-यांत्रिकी ( ३ जागा), कार्यदेशक-सांगाडा (१ जागा), सहायक कार्यदेशक -यांत्रिकी (३२ जागा), सहायक कार्यदेशक- विद्युत (७ जागा), सहायक कार्यदेशक - व्हल्कनायझिंग (१ जागा), सहायक कार्यदेशक- सांगाडा (३ जागा), कनिष्ठ यांत्रिकी -मोटार वाहन (७१ जागा), कनिष्ठ विजतंत्री (१४ जागा), कनिष्ठ स्वच्छक (२४१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०१० आहे. अधिक तपशील www.bestundertaking.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ८ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये १२ जागा

स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये सल्लागार-कार्डियालॉजी (१ जागा), विशेषज्ञ (४ जागा), वैद्यकीय अधिकारी (४ जागा), कनिष्ठ तांत्रिक (१ जागा), कनिष्ठ औषध निर्माता (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत ५ फेब्रुवारी २०१० रोजी होणार आहे. अधिक माहिती www.sail.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती दै. टाइम्स ऑफ इंडियाच्या दि. ६ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

पुण्याच्या एफटीआयआयमध्ये ९ जागा

पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्सिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रोफेसर साऊंड इंजिनिअर (१ जागा), असिस्टंट प्रोफेसर टिव्ही ग्राफिक (१ जागा), लेक्चरर टिव्ही ग्राफिक (१ जागा), लेक्चरर आर्ट डायरेक्टर (१ जागा), लेक्चरर साऊंड इंजिनिअर (१ जागा), ग्रंथपाल (१ जागा), सहायक सुरक्षा अधिकारी (१ जागा), डेमोस्ट्रेटर-साऊंड रेकॉर्डिंग (१ जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २६ डिसेंबर २००९ - १ जानेवारी २०१०च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मध्य रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी १२ जागा

मध्य रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी ग्रुप सी मध्ये १२ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २६ डिसेंबर २००९ - १ जानेवारी २०१०च्या अंकात आली आहे.

अंबरनाथच्या इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत ४ जागा

इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबरनाथ येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१ जागा), वैद्यकीय सहायक-पुरुष (२ जागा), वैद्यकीय सहायक-महिला (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २ जानेवारी २०१० - ८ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

आयआरसीटीसी मध्ये ३९५ जागा

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये सहायक व्यवस्थापक - केटरिंग (१७ जागा), सहायक व्यवस्थापक - पर्यटन (१३ जागा), सहायक व्यवस्थापक - आयटी (४ जागा), सहायक व्यवस्थापक - मनुष्यबळ विकास (९ जागा), सहायक व्यवस्थापक - फायनान्स (१५ जागा), एक्झिक्युटिव्ह - केटरिंग (१७० जागा), एक्झिक्युटिव्ह - पर्यटन (२१ जागा), एक्झिक्युटिव्ह - आयटी (१४ जागा), एक्झिक्युटिव्ह - मनुष्यबळ विकास (१० जागा), एक्झिक्युटिव्ह - फायनान्स (२० जागा), सिनिअर सुपरवायझर - टुरिझम (१० जागा), असिस्टंट सुपरवायझर - आयटी (४० जागा), असिस्टंट सुपरवायझर - मनुष्यबळ विकास (२२ जागा), असिस्टंट सुपरवायझर - फायनान्स (३० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.irctc.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डमध्ये १ जागा

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डमध्ये सहायक संचालक - जनसंपर्क (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २६ डिसेंबर २००९ - १ जानेवारी २०१०च्या अंकात आली आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षेअंतर्गत ११० जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१० ची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत तालुका निरीक्षक- भूमी अभिलेख (१८ जागा), नायब तहसीलदार (९२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटी तारीख ९ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

--
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

****Internet Email Confidentiality Footer**** Privileged/Confidential Information may be contained in this message. If you are not the addressee indicated in this message (or responsible for delivery of the message to such person), you may not copy or deliver this message to anyone. In such case, you should destroy this message and notify the sender by reply email. Please advise immediately if you or your employer do not consent to Internet email for messages of this kind. Opinions, conclusions and other information in this message that do not relate to the official business of The Shaw Group Inc. or its subsidiaries shall be understood as neither given nor endorsed by it. ______________________________________ The Shaw Group Inc. http://www.shawgrp.com



__._,_.___
.

__,_._,___

0 comments:

sponsers