महाराष्ट्र तोडणा-या दलालांनो
. मराठ्या तू जिवंत माणूस नाहीस मुके जनावर रे , शहाणपणा शिकवावा इतरांनी वेळीच मराठ्या सावर रे - १ - बखर खोलून बाघशील का? इतिहासपाने चाळशील का ? संताप तुला का येईना गाड्या शंडासम तू जगतो का ? - २- आठव राजे शिवछत्रपतींना महातेज सूर्य शंभुराजांना लक्ष्मीबाई ते बाजीरावांना सावरकर , टिळक , क्रांतीसिंहाना - ३- धमण्यामधील रक्त तुझ्या लाव्हा होऊन दौडु दे राख करून गाड गनिमा चौफेर मराठा उधळू दे - ४ - दे एक नारा , एकच इशारा अखंड राष्ट्र , एक मराठा महाराष्ट्र तोडणा-या दलालांनो मुकाट आपले घर गाठा - ५ --- महाराष्ट्र अखंड होता , आहे आणि हा मराठा इतिहास जिवंत असेपर्यंत तो आखंडच राहील . जय महाराष्ट्र!
Post a Comment
0 comments:
Post a Comment