शेर-ए-खान हा काय तुझा बाप आहे का ............ मला तर वाचून आशे वाटते ...........
धन्यवाद !
आपला
सचिन
From: www.marathiguide.com <pooja.mane86@gmail.com>
To: GarjaMaharashtraMaza@yahoogroups.com
Sent: Thu, 11 February, 2010 10:08:34 PM
Subject: [GarjaMaharashtraMaza] [Ekdam sahi] शेर-ए-खान आणि सेव्ह टायगर प्रोजेक्ट!
प्रकाश अकोलकर
[Please don't remove orginal authir name else I will not be able to send more super articles like thios]
अचानकपणे महाराष्ट्रात 'सेव्ह टायगर प्रोजेक्ट' हाती घेतला गेला आणि त्यामुळे अवसान गळालेल्या वाघांच्या अंगीही बळ आलं...
........
राहुल गांधी यांनी आपल्या मुंबईच्या अवघ्या चार तासांच्या भेटीत वाघाची पार शेळी करून टाकली आणि मुंबईत आमचाच शब्द चालतो, अशा वल्गना गेली चार दशकं करणाऱ्या संघटनेची पुरती हवा गेली. त्यातच पोलिस संरक्षणात अवघं आयुष्य घालवणाऱ्या या कागदी वाघांचं संरक्षणही काढून घेण्याचं महाराष्ट्र सरकारनं ठरवलं, तेव्हा आता 'सेव्ह टायगर प्रोजेक्ट' हाती घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता!
पण संपूर्ण देशातल्याच वाघांची संख्या कमी होत चालल्यानं अनेक जातिवंत शिकाऱ्यांनाही अचानक वाघ वाचवण्याचं स्फुरण चढलं. चिंकाऱ्याच्या शिकारीनं ख्यातकीर्त झालेले धर्मरावबाबा अत्राम यांनाही या मोहिमेत मग सामील व्हावंसं वाटू लागलं, तेव्हा शरद पवारांसारखा जातिवंत शिकारी या मोहिमेत सामील न होता, तरच नवल!
खरं तर या वाघांना एकटा 'शेर'-ए-खान पुरून उरला होता. जंगलच्या राजानं कितीही वल्गना केल्या, तरी आपण त्याच्या गुहेत जाऊन त्याच्यापुढे गुडघे टेकणार नाही, असं त्यानं स्पष्ट केलं होतं. वाघही त्याच्या या भूमिकेपुढे नमल्याचं चित्र शनिवारच्या रात्रीपर्यंत स्पष्ट उभं राहिलं होतं. पण रविवारी रात्री पवारांनी आपला या 'सेव्ह टायगर प्रोजेक्ट'ला पाठिंबा असल्याचं सूचित केलं आणि मग दोनच दिवसांपूवीर् पार गारठून गेलेल्या वाघांच्या अंगीही बारा हत्तींचं बळ संचारलं आणि त्यांनी नव्या जोमानं आपल्या कारवाया सुरू केल्या. खरं तर वाघाला हे बळ देण्यामागे पवारांचा नेमका हेतू काय होता, ते आतापावेतो सर्वांनाच कळून चुकलं आहे आणि आता वाघाचं संरक्षण काढून घेण्याच्या वल्गना करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तर ते पुरतं ठाऊक होतं. वाघाचं संरक्षण काढून घेतल्यावर चुकून काही अनुचित प्रकार घडला, तर मुंबईत अराजक निर्माण होऊ शकतं, हे मुख्यमंत्र्यांना ठाऊक नाही, असं म्हणता येणार नाही. पण त्यांची ही खेळी चुकली आणि वाघाला आणखीनच अवसान आलं. त्यानंच 'आम्हाला तुमचं संरक्षण नको!' अशा वल्गना सुरू केल्या आणि आता आपल्याला मनसोक्त बागडायला मिळणार, या कल्पनेनं एरवी कायम गुहेत दडून बसणाऱ्या वाघाच्या भोवती भोवती फिरणाऱ्या तमाम कागदी वाघांनीही हे संरक्षण झुगारून देण्याचा पवित्रा घेतला आणि कुठे 'शेर'खानाच्या फोटोला काळं फास तर कुठे चार दगड मार, असा आपला जुनाच कार्यक्रम नव्यानं सुरू केला.
खरं तर या 'शेर'खानाच्या समाचारासाठी मुक्रर केलेल्या मुहूर्ताच्या दोनच दिवसांनी 'व्हेलेंटाईन डे' येत आहे. त्या दिवशी मुंबईत धुडगूस घालण्याचा कार्यक्रम गेली अनेक वषेर् ही वाघमंडळी नित्यनेमानं करत! पण त्यामुळे झालं काय की या वाघाच्या दर्शनासाठी गदीर् करणाऱ्या तरुणांच्या मनात मोठी नाराजी निर्माण झाली आणि त्यांनी वाघाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर होणाऱ्या प्रदर्शनी कार्यक्रमांकडे पाठ फिरवली. वाघाला हे कळून चुकलं होतंच. त्यामुळेच त्यानं गेल्या दसऱ्याचा आपला हा खेळच रद्द करून टाकला. खरं तर गेल्या चार वर्षांपासून याच वाघानं गुहेबाहेर काढलेला आपलाच एक भाऊबंद याच तरुणांना बघायला मिळाला होता. त्यामुळे मूळच्या वाघाची ताकद चांगलीच कमी झाली होती.
वाघ म्हातारा झाला होता आणि त्यामुळेच राज्यातील तरुणाची त्याच्याशी नाळ जुळत नव्हती, हे स्पष्ट होऊ लागलं होतं. त्यामुळे वाघानं आपल्या बछड्याला पुढे केलं. पण या बछड्यानं कितीही अवसान आणलं, तरीही त्यात मूळ वाघाचा जोर असल्याचं काही दिसत नव्हतं. सारी तरुणाई आपली मूळची गुहा सोडून बाहेर पडलेल्या वाघालाच बघायला जमे. वाघाचा बछडा त्यामुळे अधिकच अस्वस्थ होत गेला आणि तशातच त्याला 'शेर'-ए-खानाच्या रूपानं आणखी एक सव्वाशेर भेटला! इकडे वाघ त्याच्या घराबाहेर हातात दगड घेऊन बसला असतानाच हा मात्र अत्यंत शांतपणे चॅनेलवाल्यांना मुलाखती देऊन आपली भूमिका स्पष्ट करत होता. ही भूमिका अत्यंत लॉजिकल असायची. या मुलाखतींमध्ये तो कधीही गुरगुरला नाही वा त्यानं उसनं अवसानही आणलं नाही. तो सारं काही स्पष्टपणे सांगत होता. आपण आणि आपले सहकारी काय करतात, कशासाठी करतात, ते सारं सारं तो सांगून टाकत होता. 'शुक्रवारची कहाणी'च होती ती! त्यानं सरळ सांगून टाकलं की आम्हा बॉलीवुडवाल्यांशी जे काही बोलायचं असेल, ते सोमवार-मंगळवारीच बोला. शुक्रवारी आमचं काही खरं नसतं. शुक्रवार म्हणजे आमचा 'डी डे'! त्या दिवशी आमचं भवितव्य ठरतं.
ते तुम्ही आम्ही म्हणजे आपण सारेजण ठरवतो. त्याच्या या सांगण्यात तथ्य तर होतंच; शिवाय एक प्रांजळपणाही होता. आता हाच प्रांजळपणा भावून त्याला बघायला जाण्याची भावना वाघापासून दूर दूर जाणाऱ्या
तरुणाईच्या मनात निर्माण होऊ शकतेच की! -जशी 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशीच्या वाघाच्या गुरगुरण्यामुळे निर्माण झाली होती.
पण वाघ आता सगळ्याच्या पलीकडे गेला आहे.
त्याला फक्त आपल्याला मोठ्यानं गुरगुरता येतंय, हेच लोकांना दाखवून द्यायचंय. त्यासाठी तो काहीही करायला तयार आहे, म्हणजे आपल्या सहकारी वाघांना करायला लावणार आहे. बाकी त्याच्या कळपातल्या इतर वाघांबद्दल तरी काय सांगायचं? तेही खरं तर गुहेत नेमकं काय चालतं, याबद्दल अनभिज्ञच असणार, हे खरं तर गेली चार दशकं वाघाचा तोच तो खेळ बघत आलेल्या मराठी माणसाला चांगलंच ठाऊक आहे. तरीही वाघाला आता पुन्हा तोच तो खेळ नव्यानं लावावासा वाटतोय आणि पवारांनाही नेमक्या याच वेळी 'सेव्ह टायगर प्रोजेक्ट' राबवायची इच्छा होणं, यापरतं मराठी माणसाचं दुसरं दुदैर्व ते काय!
त्यापेक्षा हा 'शेर'-ए-खान परवडला, त्यानं निदान या वाघाला आवाज देण्याची तरी हिंमत दाखवली. तुम्हाला काय वाटतं?
__._,_.___
.
__,_._,___
Your Mail works best with the New Yahoo Optimized IE8.
Get it NOW!.
0 comments:
Post a Comment