sponsers

Wednesday, February 24, 2010

[GarjaMaharashtraMaza] काल रात्री....

 

काल रात्री....

काल रात्री,
मी आई नसलेल्या पोरासारखा
रडत होतो
हुंदके देऊन
बराच वेळ ...
नक्की किती ..?
हे सांगता येन कठीण...
पण बहुतेक,
अश्रू सुकेपर्यंत नक्कीच...

रात्रीन बरच समजावल मला
पाठीवरती मायेन,
हातही फिरवला अंधारान..
रडू नकोस म्हणून
डोळेही पुसले एकांतान...
पण मी अजुनही,
रडतच होतो
आई नसलेल्या पोरासारखा...

नंतर कळल,
की,गेल्या काही रात्री
मी नुसत्याच जागून काढल्याय,
एकही कविता न लिहिता...
कवितेविना मी
आणि आई नसलेल पोर
दोघही सारखेच...

म्हणुनच...
काल रात्री
मी आई नसलेल्या पोरासारखा
रडत होतो...
बराच वेळ.


Best Regards,

Mahesh Bhoir
www.agrizatka.tk
www.maheshbhoir.tk
www.maheshbhoir.co.cc
+91 9870560065

__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___

0 comments:

sponsers