"सचिन तेंडुलकर"
मज सांग तुजसाठी, काय मागू देवापाशी ?
देव देतो, जे जे काही , सर्व आहे तुजपाशी ||१||
मोरपिस सुयशाचे, आणतोस खेचुनी |
शोभते शिरपेचात, ठेवी मानाने खोचुनी ||२||
नाणे फेक जिंको कोणी, तुजसी नसे फरक |
डोंगर धावांचे रची, केव्हढा तुझा उरक ||३||
उतरता तू मैदानी, प्रतिस्पर्धी होई खिन्न |
फटकेबाजी पाहुनी, प्रेक्षक होती प्रसन्न | |४||
आव्हान शत्रुचेही, लीलया झणी पेलतो |
असतोस तू तिथुनी, धाऊनी चेंडू झेलतो ||५||
ठेवल्या जरी कितीही, तुझ्याकङुनी अपेक्षा |
देतोस भरभरुनी, तू मोठ्ठा आभाळापेक्षा ||६||
बाधते न तुज कधीही, कोणतीही यशबाधा |
निर्लेप निर्विकारी, उरतोस किती साधा ? ||७||
ऊर्ध्वगामी गति तुझी, घेतो गगन भरारी |
यश कीर्तीची तोरणे, उभारी जगतद्वारी ||८||
हिरा तूची स्वशैलीचा, कोंदणात जङविला |
स्वणॉक्षरी इतिहास, तुझा तूची घडविला ||९||
लाभले भाग्य तुजला, इतरा नसे इतुके |
सांगे उपेंद्र हर्षे, आस्थेने कवतुके ||१०||
झळके क्रिकेट विश्व, ऐसे महान कर्तुत्व |
दौडती विजयी अश्व, गर्जती तुझे श्रेष्ठत्व ||११||
आशिष तुजप्रती, थोर माय-पित्यांचा |
मिळे पुण्य वरदान, तो स्पर्श देवकरांचा ||१२||
Best Regards,
Mahesh Bhoir
www.agrizatka.
www.maheshbhoir.
www.maheshbhoir.
+91 9870560065
0 comments:
Post a Comment