कोल्हापूर : प्रत्येकाकडेच अग्निपंख आहेत...स्वतःचे निश्चित ध्येय ठरवा...सातत्यपूर्ण ज्ञानार्जनाची आस ठेवा... त्याला कठोर परिश्रमाची जोड द्या...संकटांचा कॅप्टन व्हा....आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भरारी घेत यशोलौकिकाचे शिलेदार व्हा...भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. सुमारे तासभर रंगलेल्या या संवादातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा मिळत होती. प्रत्येकाची मनं प्रज्वलित होत होती.
आज सकाळपासूनच केशवराव भोसले नाट्यगृहाचा परिसर विज्ञाननिष्ठेने भारलेला होता. राज्य, राष्ट्रीय पातळीवर पारितोषिकप्राप्त विविध वैज्ञानिक उपकरणांचे प्रदर्शनच जणु भरले आणि त्याचवेळी जगाच्या पाठीवरील नामांकित शास्त्रज्ञांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी या वातावरणाला उंचीवर नेऊन ठेवले. कार्यक्रमाची नियोजित वेळ साडेअकराची पण, बारा वाजून तीन मिनिटांनी वाहनांचा ताफा परिसरात आला आणि या साऱ्या माहोलच उत्साह आणखीनच वाढला. "समर्थ भारत 2020' चे स्वप्न देणाऱ्या कलामचाचांना भेटण्यासाठी आसुसलेल्या विद्यार्थ्यांनी तर त्यांना गराडाच घातला. सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत कलामचाचांचे व्यासपीठावर आगमन झाले. वयाच्या अठ्ठयाहत्तराव्या वर्षीही अखंडपणे वाहणारा उत्साहाचा झरा जणु नाट्यगृहात अवतरला.
श्री.कलाम यांनी सांगितले ते त्यांच्याच शब्दात असे :
* सुफी संताच्या कवितेचे आठवण करून देत त्यांनी संवाद सुरु केला.," तुमचा जन्म खुरटण्यासाठी झालेला नाही तर तुम्हांला पंख आहेत आणि झेप घ्यायला शिका. छोटे ध्येय हे नेहमीच गुन्हा असतो...? हे तुम्हांला माहित आहे का..? तुमचे पंख म्हणजेच तुमचे शिक्षण,ज्ञान आहे.
* नॉलेज इक्विशन : ध्येय (एम) + निर्मिती क्षमता (क्रियेटव्हीटी) + मनाची श्रीमंती (रायचूसनेस ऑफ हार्ट ) + धैर्य (करेज).
* प्रत्येकाच्या घरातील ग्रंथालय हीच सगळ्यात मोठी ज्ञानाची संपत्ती आहे.वीस पुस्तकापासून हे ग्रंथालय सुरु करा. त्यातील मुलांसाठी असतील. तुम्ही जेव्हा आजोबा व्हाल तेव्हा ग्रंथालयांतील पुस्तकांची संख्या दोन हजार झालेली असेल.
* अशी शपथ घ्या.. की मी किमान पाच झाडे लावेन आणि ती जगवेन.
काम कोणतेही असले तरी त्यासाठी कष्टाची तयारी करेन. वेळ तुम्ही विकत घेवू शकत नाही. त्यामुळे नेहमीच वेळ पाळीन. पाच अशिक्षित माणसांना मी साक्षर करेन.
* जीवनात नेहमी स्वतःच्याच यशाचा नव्हे तर दुसऱ्याच्या यशातही आनंद मानण्याचा दृष्टीकोन बाळगा. तो तुमचे जीवन अधिक सुंदर करेल.
* जात,धर्म,राज्य,भाषा यावर आधारित कोणताच भेदभाव तुमच्या जगण्यात येवू देवू नका.
* आई हसरी असेल तर सारे कुटूंब हसत असते. त्यामुळे असे कांही करा की तुमची आई नेहमी आनंदी आणि हसरी राहील.
* श्री.कलाम यांचा संवाद दीड वाजता संपला. त्याचा समारोप राष्ट्रगीताने झाला. सगळे सभागृह राष्ट्रगीत म्हणत असतानाही त्याचा स्वर लहान होता. ते त्यांच्या ध्यानात आल्यावर लगेच दोन्ही हात उंचावून त्यांनी जोशात राष्ट्रगीत म्हणण्यास सुचविले. त्यानंतर सभागृहाचा आवाज भारदस्त झाला. त्यातून राष्ट्रप्रेमाचा स्फुलिंगे चेतविली गेली...
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. नुसते नाव ऐकल्यावरच कुणाचीही मान अभिमानाने वर उंच जावी असे व्यक्तिमत्व. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी,भेटण्यासाठी, त्यांचा संवाद ऐकण्यासाठी मुलांबरोबरच इतरांनाही प्रचंड उत्सुकता होती. परंतू सुरक्षिततेच्या कारणांवरून मोजक्याच विद्यार्थ्यांना त्यांच्याशी संवाद साधता आला. त्यांचे वय सध्या 78 आहे. परंतू या वयातही त्यांनी तब्बल एक तास मुलांशी हितगुज केले. त्यांना प्रश्न विचारले, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांना बोलते केले आणि जगण्याचे तत्वज्ञानही सहजरित्या समजावून सांगितले. मुलांना प्रोत्साहन देणे म्हणजे काय असते हे कुणीही त्यांच्याकडूनच शिकावे.तासभर बोलल्यानंतरही त्यांच्या बोलण्यात थकवा नव्हता. त्यांचे सुरक्षा अधिकारी त्यांना वेळेची आठवण करून देत होते.अन्यथा त्यांचा हा संवाद आणखी बराच वेळ सुरु राहिला असता. हा संवाद साधताना त्यांनी कुणालाच मध्यस्थी करून दिली नाही. मुलं-मुली आणि कलाम सर असाच हा सुमारे तासभराचा जगणं समजून घेण्याचा संवाद रंगला...!
राजकारण्यांची किंमत शून्य...!
संवाद सुरु करतानाच श्री.कलाम यांनी आपल्यासमोरील मुले कोणत्या वर्गातील आहेत हे तपासून घेतले. त्यामध्ये नववीच्या वर्गातील मुले सर्वाधिक होती. मुलांना आयुष्यात काय व्हायचे आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी पाच प्रश्न विचारले. त्यामध्ये इंजिनिअर आणि शास्त्रज्ञ होण्यास सर्वाधिक मुला-मुलींनी पसंती दिली. त्यापेक्षा कमी मुले आयएएस होणार म्हणाली. चांगला शिक्षक कोण होणार म्हटल्यावर तर मोजकेच हात उंचावले. त्यांचा शेवटचा प्रश्न होता, ""चांगला राजकीय नेता (गुड पॉलिटिशन) व्हायला किती जणांना आवडेल...? साऱ्यांच्या नजरा सभागृहावर खिळल्या...कॅमेरांचा लखलखाट झाला...परंतू एकही हात वर उंचावल्याचे दिसले नाही...नंतर सभागृहाच्या उजव्या कोपऱ्यात एका मुलीने आपल्याला राजकीय नेता व्हायला आवडेल अशी पसंती दिली...! पांचशेहून अधिक मुला-मुलींमध्ये, जे उद्याची भावी पिढी आहे, त्यातील फक्त एकाच मुलीला राजकीय नेता व्हायला आवडले आणि उर्वरित मुलांना ते होवू नये असे वाटले त्यामागे या क्षेत्राबध्दल लोकांच्या मनांत असलेली नाराजीच अधोरेखित झाली.

Location:-http://wikimapia.org/14018697/Patrakar-Bhavan
26 feb 11 am morning
0 comments:
Post a Comment