रोवल्या भगव्याचा तपास
त्याच्या टाचांनी..... मागे पडायचा वारा धावायाचा तांडा सारा.... त्यांची नजर... आसायची जळजळित आग मेल्या आत्म्याला जाग... त्यांच्या कपाळावर.. स्पष्ट रेषा ठाम शिवगंध न ओलांडी घाम ... त्याची भवानी ... म्यानामधे - असायचा धाक म्यानाबाहेर - शरण वाक् .... त्यांचे निशान.. बेजुमान थपडा वा-याला अभिमानी वरनजर सा-याला.. त्यांची जयंती ... पुतळ्या पुढे - बेफाम चेले पुतळ्या मागे - कलंडलेले पेले ... त्यांची नजर .. आता जराशी हताश रोवल्या भगव्याचा तपास ...
Post a Comment
0 comments:
Post a Comment