program 1
Location:-http://wikimapia.org/14018697/Patrakar-Bhavan
26 feb 11 am morning
Program 2
११२ प्रस्थापित गायक, ६५ वादक कलाकार, ३५० लोकांचे समूहगान, नऊ स्टुडिओ, १२ ध्वनिमुदक, तीन शहर आणि २००० लोकांचा सकारात्मक सहभाग यातून साकारलेल्या पहिल्यावहिल्या, भारतातील सर्वात भव्य गीताचा अर्थात, 'मराठी अभिमान गीता'चा प्रकाशन सोहळा, २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषादिनी ठाण्यात रंगणार आहे.
लहानग्या मुग्धा वैशंपायनपासून ज्येष्ठ शाहीर विठ्ठल उमप यांच्यापर्यंत मराठीतील बहुतेक प्रस्थापित गायकांनी गायलेल्या मराठी अभिमान गीताचे शब्द कविवर्य सुरेश भट यांचे आहेत. संगीतकार कौशल इनामदार यांच्या 'मराठी अस्मिता' संस्थेची निमिर्ती संकल्पना असलेले अभिमान गीत मराठीजनांना अर्पण करण्याचा सोहळा ठाण्याच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता होईल.
मराठीचा अभिमान मराठी माणसांमध्ये रुजवण्याची गरज असून, मराठीची अवहेलना थांबविण्यासाठी आपण मराठी भाषकांनी एकत्र येऊन जनसामान्यांची चळवळ उभी केली तरच, अमराठी लोकांना आपल्या भाषेविषयी आदर बाळगण्यास आपण सांगू शकू, या विचारातूनच या अभिमान गीताच्या संकल्पनेचा जन्म झाल्याचे संगीतकार कौशल इनामदार यांनी सांगितले.
ए. आर. रहमान यांच्या चेन्नईतील स्टुडिओपासून उत्तमोत्तम वादकांपर्यंत सगळ्या सर्वोत्तम सुविधा आणि त्याहीपेक्षा मराठी गान विश्वातील ११२ सवोर्त्कृष्ट आवाजांच्या साथीने घडलेले हे गीत मराठी भाषेच्या अभिमानवृद्धीसाठी उपयुक्त होईल, अशी भावना कौशल इनामदार यांनी व्यक्त केली.
सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील २१ मान्यवरांच्या हस्ते या अभिमान गीताचे प्रकाशन होईल. त्याच बरोबर 'मराठी अस्मिता' प्रस्तुत 'गर्द निळा गगनझुला' ही शब्द-सुरांची सहलही रसिकांना अनुभवता येईल. या मैफलीचे संचालन कवी अशोक बागवे करतील. तर, अभिमान गीताच्या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन निवेदक सुधीर गाडगीळ करतील.
हा कार्यक्रम विनामूल्य असून, प्रकाशन सोहळ्याच्या प्रवेशिकांसाठी ठाण्यात न्यू सिंफनी (२५३८६९७८), यश अॅपरल्स (२५३९०७६३), कळव्यात अंतरंग लेडिज शॉपी (९८६७६४२६७२), डोंबिवलीत कॉटन किंग, कल्याण रोड (०२५१-२४४५७४५), कल्याणमध्ये सरस्वती ग्रंथ भांडार (९८६९९३८२९८) आणि दादरमध्ये महाराष्ट्र वॉच ग्रामोफोन कंपनी (६६६२५६६१) येथे संपर्क साधावा.
0 comments:
Post a Comment