sponsers

Thursday, February 4, 2010

[GarjaMaharashtraMaza] 'स्थानिक' अस्मिता

 

http://www.marathiasmita.com/शिवाजी पार्कातल्या कावळ्याला स्ट्रीटलाइटचे दिवे बंद होताच झुंजूमुंजू झाल्याची खात्री पटली. आदल्या रात्री मैदानात दहा वाजेपर्यंत कंठाळी आवाजातली

सभा चालू होती त्यामुळे त्याच्या झोपेचं खोबरं झालं होतं. पण स्थानिकांच्या अस्मितेची सभा असल्यामुळे त्याने ही सभा ऐकली होती. त्याला एकच कळलं जे काही आहे ते आपलं म्हणजे स्थानिकांचं आहे. त्या सभेमुळे त्याचीही अस्मिता जागी झाली होती. त्याच्या फांदीवर शेजारच्या फांदीवरील कावळी जरा टेकायला आली तेव्हा त्यानं तिला ' या फांदीवर टेकायचं नाही... ही माझी म्हणजे स्थानिकाची फांदी आहे..' असं सांगून हुसकावलं होतं. नंतर शेजारच्या झाडावरचा चिमणा त्याच्या झाडावर आला तेव्हा त्यानं त्या कावळीच्या साथीनं त्याला पिटाळून लावलं होतं.

आपली 'स्थानिक' अस्मिता जागी झाल्यानं त्याला आता बरं वाटू लागलं होतं, त्याचे बाहू... नाही पंख फुरफुरू लागले होते. त्याने मान मागे पुढे करीत आळस दिला आणि काण्या डोळ्याने आपल्या झाडावर नजर टाकीत नवं आक्रमण झालं नाही ना याची पाहणी केली. आणि मग पंख फडफडवीत त्याने चौपाटीच्या दिशेने भरारी घेतली...

चौपाटीवर साचलेला ताजा उकीरडा पाहून त्याचे मन आनंदाने भरून आले... पोटात कावळे... (हो कावळ्याच्या पोटातही कावळेच काव काव करतात!) कावकाव करू लागले होते त्यामुळे त्याने एक गिरकी घेऊन उकिरड्यावर लँडिंग केले... भक्ष्यावर चोच मारणार तोच त्याची नजर दूर समुदावर गेली... तेथे काही तरी वेगळेच त्याला दिसले... त्याला फक्त डाव्या डोळ्यानेच दिसत असल्यामुळे त्याने मान नव्वद अंशात वळवली आणि नीट पाहण्याचा प्रयत्न केला... त्याच्या इलाख्यातल्या समुदात त्याला वेगळेच पक्षी दिसले... त्याचा संताप झाला... त्याने लगेच सगळ्या कावळ्यांना काव काव करीत साद दिली आणि लढाऊ विमानांचा ताफा यावा तसा आसपासच्या झाडांवरून सगळी कावळे मंडळी गोळा झाली... आणि त्या समुदातल्या पांढऱ्या पक्ष्यांच्या दिशेने झेपावली..

... पांढऱ्या माकडांनो... हा समुद आमचा आहे... चला येथून निघा...

समुदातले फ्लेमिंगो, सी गल... या अचानक हल्ल्याने गांगरले... आणि समुदात आत निघून गेले...

आता समुद मोकळा झाला होता... पण या समुदाचं काय करायचं तेच त्याला कळेना.. त्याने समुदात उतरून मासे मारण्याचा प्रयत्न केला पण आलेल्या लाटेने त्याला खेचून नेण्याचा प्रयत्न केला..

मनाशीच तो बोलला, 'बहुदा हा समुद स्थानिकांचा नसावा...'

 

Source:- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5532498.cms

 

__._,_.___
.

__,_._,___

0 comments:

sponsers