http://manase.
जे जसं वाटलं, ते तसंच्या तसं... राज ठाकरे

त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा आनंद मला तुमच्यापर्यंत रोज पोहोचता येणार आहे आणि माझ्याविषयी व माझ्या पक्षाविषयी खरीखुरी माहिती आपल्यापर्यंत मला पोहोचवता येणार आहे याचा आहे.
आजवर अनेक हिंदी, इंग्रजी वाहिन्यांनी (व काही मराठी पत्रकार व वाहिन्यांनीही) माझ्याविषयी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या माझ्या पक्षाविषयी आणि मी चालवत असलेल्या लढ्यासंबंधी तद्दन खोटी, विखारी व भंपक माहिती आपणापर्यंत पोहोचवली. ज्याचा वेळोवेळी खुलासा करण्याचा मी व माझे सहकारी यांनी प्रयत्न केला. परंतु योग्य साधनांअभावी तो प्रयत्न बर्याचदा अपुरा ठरला.
खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं वर्तमानपत्रंच आत्तापर्यंत यायला हवं होतं. परंतु ते अधिकाधिक परिपूर्ण आणि मराठी पत्रकारीतेला भूषणास्पद ठरावं यासाठी जी संसाधनं लागत आहेत त्यासाठी माझा व माझ्या सहकार्यांचा अजून काही वेळ त्या वर्तमानपत्राचं स्वप्नं सत्यात आणण्याकरता खर्च होईल. हा विलंब हे संकेतस्थळ (वेबसाइट) भरून काढेल याची मला पूर्ण खात्री आहे.
या संकेतस्थळावर महाराष्ट्रासंबंधी आणि माझ्या पक्षाच्या संबंधी अधिकाधिक नि सर्वव्यापी माहिती देण्याचा माझा संकल्प आहे. जे आजवर महाराष्ट्रात कोणत्याही पक्षानं केलं नाही ते नेहमीच माझा पक्ष करेल. हे संकेतस्थळही जगाला हेवा वाटावा असं बनवण्याचाच माझा आणि माझ्या सहकार्यांचा प्रयत्न राहील.
समजा, या प्रयत्नात किंवा माहितीत आपणास काही त्रुटी, चुका वा समस्या आढळल्या तर आपण तात्काळ याच संकेतस्थळावर माझ्याशी संपर्क साधून त्या माझ्या निदर्शनास आणून देऊ शकता. म्हणणारा कुणीही असेल तरी त्याच्या म्हणण्यात तथ्य असेल, तर त्रुटीमध्ये तात्काळ दुरूस्ती केली जाईल. शिवाय माहितीमध्ये सातत्याने भर घालण्याच्या माझ्या सहकार्यांच्या प्रयत्नांना आपणही मदत करू शकताच.
माझा संपूर्ण राजकीय लढा हा मराठी भाषा, मराठी राज्य व मराठी माणूस यांचे `गोमटे' करण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये आडवे येणारे पक्ष, संघटना, परप्रांतीय राजकीय गट आणि अनेक इतर विघ्नसंतोषींचा कणा माझी संघटना मोडल्याशिवाय राहाणार नाही. आज महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांनी लाज वाटावी इतकं मराठीपण सोडलेलं आहे. महाराष्ट्र व मराठी माणूस यांच्यासाठी नि:संदिग्धपणे उभं राहणं म्हणजे उत्तर प्रदेश, बिहारमधून महाराष्ट्रविरोधी राजकारण करण्यासाठी आलेल्या लोंढ्यांविरुद्ध लढा उभारणे असा सरळ अर्थ आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेला आहे. जर मतांच्या लाचारीसाठी आणि दिल्लीला घाबरून सर्व जण या बेकायदेशीर लोंढ्यांचं मतदार म्हणून लांगुलचालन करणार असतील, तर मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र यांची वाताहतच होईल. कुणीतरी हे लांगुलचालन आणि ही लाचारी मुळातून छाटून टाकली पाहिजे. त्यासाठी पुतनामावशीसारखं खोटं मराठी प्रेम किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या शोकेसेस निर्माण करण्याऐवजी थेट भूमिका घेऊन उभं राहणं आवश्यक आहे. ज्यात मराठी, शेती, उद्योग सारं काही येतं. अशीच थेट भूमिका घेऊन माझा पक्ष मैदानात लढाईला उतरलेला आहे.
मी निवडणुकांच्या पलीकडचं राजकारण व समाजकारण बघतो. उत्तर प्रदेश व बिहारमधून बेकायदेशीरपणे राजकीय दादागिरी करणारी गर्दी म्हणजे संपूर्ण उत्तर भारत नव्हे. संपूर्ण उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश वैगरेसारखी अनेक राज्यं येतात. त्यांना आमचा अजिबात विरोध नाही. कारण ते मराठी विरोधाच्या राजकारणाची पॉकेटस् तयार करत नाहीत. माझी भूमिका व माझा लढा मी वेळोवेळी या संकेतस्थळावर मांडेनच. परंतु वर्षानुवर्षे महाराष्ट्रात राहून मराठीच बनून गेलेल्या सर्वांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आहे. पण त्याचबरोबर त्यांना जे महाराष्ट्राने दिलं, त्या बदल्यात त्यांनी महाराष्ट्राला काय दिलं? या प्रश्नाचा विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना नेहमीच करेल. ज्याचा त्यांना खरं तर राग येऊ नये. जर या प्रश्नाचा कुणाला राग आला, तर तो खुशाल मराठीद्रोही मानावा.
नेमकी भूमिका आणि महाराष्ट्राचं संपूर्ण, अस्सल, नि:संदिग्ध मराठीकरण करण्याच्या चळवळीचं हे संकेतस्थळ म्हणजे एक छोटं पाऊल आहे. पण ते पाऊल वामनाचं आहे हे आमच्या विरोधकांनी लक्षात घ्यावं. ज्याच्या डोक्यावर ते पडेल, तो मराठीद्वेष्टा पाताळात गेलाच समजा.
मनोगत म्हणून एवढंच. पुढचं पाऊल टाकू त्यासाठी आपण मनाने, तनाने आणि धनानेही आमच्यासोबत असावं अशी मी व माझ्या सहकार्यांची इच्छा आहे.
आपण सर्वांनी मिळून `मराठीचे गोमटे करू' हीच सदिच्छा!
जय महाराष्ट्र!

राज ठाकरे
आपलाच
९७६४५४३४२४
गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा
असेल हिमंत तर अडवा
फक्त एक ठिणगी हवी
जी बस तूझ्यात आहे ,
असो पहाडापरी दुश्मन
तरी तू सुरूगं आहेस
Your Mail works best with the New Yahoo Optimized IE8. Get it NOW!.
__._,_.___
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment