sponsers

Monday, May 4, 2009

http://www.majhyakavita.com Marathi kavita Fwd: Marathi kavita





---------- Forwarded message ----------
From: Marathi Kavita <marathikavita56@gmail.com>
Date: 2009/5/4
Subject: Marathi kavita
To: marathikavita56@gmail.com


Marathi kavita

1 may

Posted: 03 May 2009 04:00 PM PDT

marathi kavita prem kavita love poem poetry marathi kavita prem kavita love poem poetry marathi kavita prem kavita love poem poetry marathi kavita prem kavita love poem poetry marathi kavita prem kavita love poem poetry marathi kavita prem kavita love poem poetry marathi kavita prem kavita love poem poetry marathi kavita prem kavita love poem poetry marathi kavita prem kavita love poem poetry

No related posts.

———- मैत्री ———-

Posted: 05 Oct 2008 10:00 AM PDT

———- मैत्री ———-

पुर्वाभिमुख उभे राहून….

वाट कसली पहाताय?
माझी ?…

तुमच्या मित्राची ?

हो ना ?…
तुमच्या मित्राचीच ना ?

अरे……तर मग, हात कसले उंचावताय…

या आणि घट्ट आलिंगन द्या मला…
मला ही जाणवू दे तुमच्यातल्या उर्जेची उब.
मी ही थोडा उजळेन म्हणतो….

लगेच….लगेच सरसावतील तुमच्यातलेच काही…
निश्क्रिय, शून्य तत्वाचे, नकारात्मक विचार सरणीचे,
बर्फाचे गोळे. आणि सांगतील तुम्हाला….

"याच्या जवळ येण्याने स्वतःचं अस्तित्व नष्ट करण्यचे खूळचट विचार कशाला करता ? "

पण…तरिही,
मी तुम्हाला बोलावतोय माझ्या जवळ….
देतोय तुम्हाला आमंत्रण….
याचा अर्थ तुम्हीही तितकेच परिपक्व झाला आहात म्हणूनच ना ?
विज्ञानाच्या, बुद्धीमत्तेच्या आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर….

उरात भरून घ्या…
पूर्ण श्वास आत्मविश्वासाचा…
आणि घ्या उत्तुंग भरारी….
एक दैदिप्यमान झेप !

भले सुरुवातीला तुमचे पंख जळतील,
नजरा दिपतील….
पण तावुन सुलाखून लख्ख सोनं होतील…..
तुमच्या महत्वाकांक्षा.

आणि मला ही मिळेल एक नविन पहाट…

आपल्या 'मैत्री'ची

No related posts.

तुझ्या आठावनिने…

Posted: 05 Oct 2008 09:59 AM PDT

तुझ्या आठावनिने…

आभाळी आले नभ भरुनी
दूर कुठे पेटली पणती मंद
मन झाले खिन्न, उचकी आली,
कोणी काढली आठवण माझी
तुच असावी अशी शंका मनी आली
आणि तीच खरी ठरली शंका
स्क्र्याप तुझा पाहून
आनंद मनी दाटला
अश्रुंची झाली बरसात
मेघा बरसले नभ झाले रिक्त
धरणी झाली तृप्त
मन झाले तृप्त मैत्रीत

श्रीकांत पाटील

Related posts:

  1. आला पाउस कोवळा

समजुन घे मला…..

Posted: 05 Oct 2008 09:59 AM PDT

समजुन घे मला…..

समजुन घे मला…..
तुझ्याकडे आता काही मागणे नाही…..
मन माझ तुझ्याकडे…
आता हास्य ही माझ नाही…
रिती ओन्जळ माझी…
दोन फुल ही आपली तुझ्याचकडे
बरसलेला श्रावण
आता कोरडी असलेली जमिन
सगळ तुझ्याचकडे……..

कधी तरी वळुन विचारीन मी तुला
सम्भाळुन ठेव…… माझी हि ठेव सारी
शेवटच समजुन घे मला……
तुझ्याकडे आता काही मागणे नाही…..

स्वाती….

Related posts:

  1. * मला तुला

जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो,

Posted: 05 Oct 2008 09:58 AM PDT

जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो,

मला कधी कळलच नाही
की नेमक मला दुख कशाच आहे?
ती मला सोडुन गेली याच्..की
ती मला सोडुन गेली म्हनुन मला
दुख झाल हे जगाला कळल नाही याच….

मेलेल्या बापालाही काही काळानंतर,
माणुस विसरतोच ना….
मग पहिल प्रेम विसरण कठिण का??
कदाचित आपल्यालच ते विसरायच नसत

सतत वाटत असत की सर्वाना कळाव,
मी किती सहन केलय मी चांगला आहे..
प्रश्न ही माझाच असतो आणि
उत्तर ही माझेच……

फक्त मी त्या व्यक्तीच्या शोधात असतो
जो मला हव ते उत्तर सांगेल…………
जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो,
तेव्हा वाटत चला कुणीतरी मला समजत.
किंबहुना …………………..
त्यालाही तसच वाटत असेल..

वाक्यही एकच असत आणि विचारही एकच असतात,
फक्त ते वेगवेगळ्या ओठांतुन निघतात बस एवढेच……….

निशब्द ( देव )

Related posts:

  1. मला तर हवा असतो फक्त पाउस..
  2. ………का नाही कळली मला ..कविता…

शब्दाविणा कविता अवतरली

Posted: 05 Oct 2008 09:57 AM PDT

शब्दाविणा कविता अवतरली

.
तू अलगद हात धरलास

नि खांद्यावर भार टाकलास

तू सावरलसं तुझ्या केसांना

पण चेहरा माझा झाकलास

तू अलगद हात धरलास

स्वप्नांचा मी राजा झालो

ह्या धगधगीच्या जिवना पासून

काही क्षण वजा झालो

तू अलगद हात धरलास

एक वेदना काळजात शिरली

मी काही बोलणार इतक्यात

शब्दाविणा कविता अवतरली

तू अलगद हात धरलास

स्पर्शात मी मिसळून गेलो

चिखलात रुतलेला मी कमळ

देव चरणांच्या जवळून गेलो

तू अलगद हात धरलास

मी झेलल्या चांदण्यांच्या गारा

तू रेषां मध्ये हरवलीस

मी रचला भविष्य सारा

तू अलगद हात धरलास

मी कल्पनेत बुडत गेलो

माझ्या वास्तवाची झालीस सावली

मी काट्यां मध्ये बागडत गेलो

तू अलगद हात धरलास

काय बोलावे तेच सुचेना

भावनांचा अख्खा गाव गिळताना

शब्दाचा एकही अंकूर फुटेना

तू अलगद हात धरलास, नि

माझ्या डोळ्यांत हरवून गेलीस

इवलसं घर कुठे बांधायच आहे

तू डोळ्यात वास्तू ठरवून गेलीस

तू अलगद हात धरलास,

नि बोटं गुंफवलीस बोटात

मनात माझीच मिरवणूक निघाली

वाजत, गाजत थाटात

तू अलगद हात धरलास, नि

मुक्यानेच मागून गेलीस

हृदयाला स्पर्श करून, का गं

परक्या सारखी वागून गेलीस

तू अलगद हात धरलास, नि

काळजाचा ठोका चुकला माझा

वर म्हणालीस, "तुला काहीच नाही कळत"

अस का वागतोस तू राजा

तू अलगद हात धरलास

मी त्या क्षणांचा होत गेलो

तू नसताना जवळी

तुझ्या स्वप्नांचा होत गेलो

तू अलगद हात धरलास

मी संथ निथळत वाहणार

तुझ्यात इतका मिसळल्यावर

माझ्याकडे कसा मी राहणार

तू अलगद हात धरलास

मी श्वास रोखून धरला

पुढचा श्वास मी

तुझ्या श्वासाने भरला

तू अलगद हात धरलास

मी रंगात भिजून गेलो

आभाळ कवेत घेऊन

मी इंद्रधनूत निजून गेलो

तू अलगद हात धरलास

देह माझा जरा थरथरला

कसा व कधी, कळलचं नाही

हर्शाचा थवा मनी उतरला

@सनिल पांगे

No related posts.

मधुरात्र

Posted: 05 Oct 2008 09:57 AM PDT

मधुरात्र

काही काळापुर्वी सुचलेल्या ओळी, पण त्या पूर्ण केल्याच नाहीत कधी……….

आजही आहे माझ्या मधुरात्र ती लक्षात ग,
चांदणे अवघ्या तनुवर चंद्र अन् वक्षात ग।

उत्तररात्रीतही उतरेना उन्मत्त ते आवेग ग,
उत्तर ना यास उतारा लगाम ना वेग ग।

स्मित ते विसरु कसे स्मरतो हरेक नखरा ग,
लज्जा खोटी रागही लटका, हां भाव तुझा न खरा ग।
=============================

आज त्यात भर घातलेल्या काही ओळी…..
________________________________________

करू नकोस उगाच सये रुसण्याचे रूक्ष बहाणे,
मार्दवाची आर्जवे करून वेडावती शहाणे।

खेळ केला तारकांनी चंद्र वेडावला बिचारा,
पूर ओसरून गेला कोरडा वेडा किनारा।

घे मला जवळि आता दूर लोटू नको गडे,
कोसळावे काय आता संयमाचे उंच कड़े।

रातराणीच्या फुलांचा गंध हां विरेल ग,
निशेस्तव रातकिडा रातदिन झुरेल ग.
=============================
सारंग भणगे. (२००५-२००८)

No related posts.

आमचं नागपुर..!!

Posted: 05 Oct 2008 09:55 AM PDT

आमचं नागपुर..!!

धावपळीचं जगणे मुळीच नाही
ऐशोआरामात जगतो आम्ही
आजकाल जरी कोणी पाळत नाही
तरी भारतीय प्रमाणवेळ पाळतो आम्ही

पत्ता विचारावा तर सोय नाही
किती इमारती ध्वस्त करेल नेम नाही
मातृभाषा जरी मराठी असली
तरी मराठीतुन राष्ट्रभाषीक आम्ही

(उदा. "उस चौकमे जाके लोकमत बिल्डींग गिरेगा
वहा से डावीकडे जाके पाचवा मकान पडेगा")

शिव्यांची बेसिक लेव्हल नाहीच मुळी
भांड्ण करतात उच्च कोटींच्या शिव्या
मुली आपल्या सरळ मार्गी
'बैताड' म्हणुन चार हात लांब उभ्या

मेजवानी म्हणुन महागडी होटेल्स नसतात
पार्टी म्हणुन सगळे ढाब्यावरच जमतात
निसर्गाच्या सानीध्यात मिळावी तृप्ती चवेची
खाणारा विसरत नाही चिकनकरी खमंग सावजी

संत्र्याची गोडी असलेली गोड माणसे
अजुन कुठेच गावणार नाही
एकदा आलेला कुणी पाहुणा
पाहुणचाराचे उपकार विसरणार नाही

मान देतो नेहमिच इतरांना
मान भेटावा मोबद्ल्यात एवढीच ईच्छा असते
काढली जर कोणी मान वाकडी
तर ती कापल्याशिवाय त्याची खैर नसते

बालपण घालवलेली माती
आपला रंग सोड्त नाही
आमच्या नागपुरातल 'अबे'-'काबे'
दुर-दुर कुठेच भेटत नाही

पैशाच्या झांगड्गुट्ट्यात काय करुन राहीलो आहे?
तुझ्यापासुन दुरावुन परप्रांतात काम करतो आहे
सुर्योदयाच्या प्रकाशलेल्या परीघाचे आज मोजमाप करतोय
माझ्या नागपुरचे एवढश्या शब्दात गुणगाण करतोय

एक नागपुरकर..
विक्रांत(ViX.!!)

No related posts.

तू अशी तू तशी…

Posted: 05 Oct 2008 09:54 AM PDT

तू अशी तू तशी…

चमचमत्या किनारीची,
तु कोरीव चांदणी,
गोर्‍या चेहर्‍यावर तुझ्या
नांदते हास्य नंदिनी

तू अशी कोमल,
फुलांची गंधराणी,
तुला पाहता दरवळे,
सुंगध मनोमनी..

तू अशी शीतल,
आळवावरचे पाणी,
तुला छेडीता
अंग घेतेस चोरूनी ..

तू अशी रंगाची
रंगेल ओढणी,
टिपक्यांच्या गर्दित,
नक्षी लपेटूनी..

तु अशी मऊ,
मखमल मृगनयनी,
ठाव तुझ्या कस्तुरीचा घेता,
फिरतो मी वेड्यावानी..

तु अशी ओली
सरसर श्रावणी,
चिंब देहावर
नितळले मोत्याचे मणी..

तु अशी स्वप्नांची,
ऐकमेव राणी,
तुला आठवता
गातो मी गाणी..

तु अशी तु तशी
जिव गेला मोहरूनी,
छेडता तुला अवचित
गेलीस तू लाजूनी..

– साहिल..

Related posts:

  1. तू अशी ये !!

ढाळलेली आसवं कधी जात नाहीत वाया

Posted: 05 Oct 2008 09:54 AM PDT

ढाळलेली आसवं कधी जात नाहीत वाया
नव्यानव्याने पालवते झिजलेली काया
कातळात फ़ुटतात कसे लवलवणारे कोंब
पुन:पुन्हा रिवरिवते रे घशामधली झोंब

पाठोपाठ चालत आले सहचारिणी होऊन
सर्व माझे पणाला लावले काळीजमाया देउन
कुठे जाणे गती किती सवाल विचारले नाही
पायात कळा मेंदूत शीळा तरी कण्हणे कुथणे नाही.

प्राजक्ताच्या फ़ुलांप्रमाणे आपले अंकूर जपले
कोवळ्या मनात वीरत्व कसे घट्टपणे रोवले
शिणून थकून चालणार नव्हती तल्लख त्यांची मने
खत होऊन भक्कम केले त्यांचे पाठकणे

दूर दूर गाव मागे दिवे मंद मंद झाले
जुन्या आठवणींचे ओंडके सगळे कधीच वाहून गेले
वर्तमानाचा पहाड किती भरभर कोरून काढला
भविष्यात आयुष्याचा पोकळ खुळखुळा तेवढा उरला

आयुष्यात अनेक आल्या तडजोडीच्या वेळा
नाळ तोडून सोसल्या सार्‍या अपमानाच्या कळा
करणे होते केले नाही याहून काही भव्य
भूमीमाते उदरी घेई,ठरले व्यर्थची अग्नीदिव्य!

No related posts.

कवी देतो शिवी !!

Posted: 05 Oct 2008 09:53 AM PDT

कवी देतो शिवी !!

खिश्यातल्या पेनात नेहमीच
ज्वालाग्राही पदार्थ घेऊन हिंडणारा
एक मनस्वी…
म्हणलं तर तपस्वी…
नाहीतर उनाड स्वच्छंदी कवी..
जेव्हा शिवी देतो..
तेव्हा गर्दीच्या खालावलेल्या नजराही…
वर पाहू लागतात..इतकंच !!

खरंतर निर्भीड, बंडखोर शब्द
कागदावर लिहून
समाजावर गोंदवण्याचा
हा छंद.. रूढार्थाने
नॉन प्रॉफिट मेकिंग !!
पण हाच कवी जेव्हा शिवी देतो,
तेव्हा ह्याचा तारसप्तक
कुठेतरी गर्दीतल्याच षंढ मनांना
चाळवत असतो..इतकंच !!

ह्या समाजावरची व्यंध्यत्वाची पुटं काढतांना
त्याचं शस्त्र…प्रत्येक हल्ल्यानंतर
धारधारच होतंय अधिकाधिक…
ह्याने केलेली वळलेल्या मुठींची भाषांतरं..
एव्हाना तारस्पप्तकाने
'फ्रेश' झालेल्या मनांवर आदळतात
तेव्हा
आत्तापर्यंत खिश्यात असलेले
तटस्थ हात..
सिस्टीमचा ढासळता चिरा सावरायला
नकळत उंचावलेले असतात…इतकंच !!

-चिराग पत्की
२२.०९.२००८

No related posts.

शेवटची भेट……

Posted: 05 Oct 2008 09:53 AM PDT

शेवटची भेट……


एकमेकांना अखेरचं

बघण्यासाठी आलो होतो,

तुटण्याआधी दोन घटका

जगण्यासाठी आलो होतो…

तुला बघून डोळ्यांमधलं

आभाळ भरुन आलं होतं

खरं आभाळसुद्धा मग

ओलं चिंब झालं होतं…

तुला वाटलं …

वीज चमकली म्हणून

आभाळ चकाकलं होतं

मला कोसळताना पाहून खरं तर

त्याचं काळीज लकाकलं होतं…

@ सौमित्र साळुंखे

No related posts.

एकच वेळ …!!

Posted: 05 Oct 2008 09:50 AM PDT

एकच वेळ …!!

एकच वेळ …!!

मी तर केवळ दयेचा सागर
लोटा भर-भर वाहून घे ..
मी तर केवळ मायेचा सागर
एक डुबकी तरी मारून घे …!!

मी तर केवळ प्रकाश ज्ञानाचा
एकच अंधकार लावून घे
मी तर केवळ क्षणाचा भुंगर
एकदा तरी पाहून घे ..!!

मी तर केवळ प्रभूचा दास
एकच वेळ एइकून घे ..
तू तर आहे दासाचा दास
एकच वेळ ओळखुन घे ..!!

मी तर आहे भविष्याचा मार्ग
एकच वेळा चालून घे ..
मी तर आहे भूतांचा भुत
एकच वेळ जानूं घे …!!

मी तर आहे पाण्याचा झोत
एकच वेळ पिवून घे
मी तर आहे जीवनाचा मौत
एकच वेळ जगुन घे ..!!

मी तर आहे परमात्म्याशी समरूप
एकच वेळ उपकारून घे ..
मी तर आहे जादूचा चिराग
एकच वेळ फुकमारून घे …!!

संदीप पाटिल…!!

No related posts.

****हा थडगा जर भेटला***

Posted: 05 Oct 2008 09:49 AM PDT

****हा थडगा जर भेटला***

.
.
तुला शोधता शोधता
मी मला गेलो हरवून
सावलीही माझी गेली
कधीची मला विसरून

किती भाग्यवान आहेस
निदान मी तुला शोधतोय
मी दूर गेलो तरी हरेक
सुखात आनंदात नांदतोय

तूही अशीच कुठेतरी प्रिये
आनंदात नांदत असशील
कुणाच्या रातीला स्वप्नांचे
महल बांधत असशील

तरी कधी काळी वाटेत
हा थडगा जर भेटला
माझ्या सावली सारखं
तूही जरूर वागवं मला

@ सनिल पांगे

No related posts.

ति आली पण मी तिला नाही पाहिल !

Posted: 05 Oct 2008 09:49 AM PDT

ति आली पण मी तिला नाही पाहिल !

ति आली पण मी तिला नाही पाहिल !
ति बसली. तेव्हा लक्ष गेल !!
सगळी मुल तिच्याकडेच पाहत होती !
पण माझ भाग्य थोर तिची घायळ नजर मला न्याहळीत होती !!
तिच्या डोळ्यातुन सुटलेला पाहुण तो तीर !
नाही धरु शकला मांझ र्‍हुदय धीर !!
तिचे ते कळी पडलेले गाल !
पाहुन वाटल आपली असावी अशी माल !!
वाटल तेव्हा आजच विचाराव !
काँलेजच्या कट्यावर तिला घाटव !!
त्यासाठी आलो मी वर्गातुन खाली !
मला पाहुन हसली ति गाली !!
तेव्हा वाटल आता जाव !
काय बोलते ते पाहव !!
त्याच वेळी नक्षिबान खाल्ली पलटी !
माझी पावले फिरली उलटी !!
केली होती मेदुने र्‍हुदयावर मात !
प्रियकराने टाकली होती कात !!
मित्रा ने विचारल का सोडलास दम !
मि बोललो मला सोडवायचे आहे
माझ्या आयुष्यातले सम !!

Related posts:

  1. *तिला न जिंकता यावं इतकं मानवी हृदय पौलादी नाही रे

्रशांत महासागर..

Posted: 19 Aug 2008 12:12 PM PDT

्रशांत महासागर..

अथांग निळाई
वर आणि खाली
बघायची रे एकदा
मला तुझी खोली

गहन, गहिरा
विराट, अफाट
अशांत,प्रशांत
जिथवर जाते माझी ,
तोकडी नजर…
तिथवर पसरला तू
निळा महासागर

तू दिली निळाई
धरेला, वसूंधरेला
भारला आसमंत
गिळला पर्वत
तुझ्या पोटामधे
आहे
उत्तंग शिखर
तूच दिला जन्म
कवींच्या प्रेरणेला
आकाशस्थ चंद्राला
उफाळतोस म्हणून
प्रत्येक पूनवेला
आक्रसतोस राजा
हरेक अवसेला

धरणीआशी तू होतास
सॄष्टीआधी तू होतास
चराचर सारे
तूच प्रसवले
मनूच्या माशाला
तूच जगविले

तू
आदरणीय
वंदनीय
दडपते छाती
तुझे रूप पाहून

तू
आरंभ
तूच अंत
ऐक हे मागणे
जरा निवांत
चुकले माकले जरी
राजा रहा तू शांत

आवर रे तुझ्या
त्सुनामीच्या लाटा
तू रहा दर्यादिल
असा अविश्रांत

असाच अविश्रांत

अनिल

No related posts.

हातात असत माझ्या तर…..

Posted: 19 Aug 2008 12:10 PM PDT

हातात असत माझ्या तर…..

हातात असत माझ्या तर,
पाउस तुला दिला असता
चन्द्र तार्यांपेक्षा सई
पाउस तुला भावला असता
दूर कुठे लुकलुकण्या पेक्षा
चिम्ब भिजवतील पाउस धारा
तुझ्या संगे माझ्या मनाचा
प्रत्येक कोपरा भिजला असता….

हातात असत माझ्या तर
वार्याची झुळुक बांधली असती
माझ्या स्पर्शाप्रमाणे सई ती,
अंगभर शहारली असती
अंगभर देऊन गारवा
मोहरून टाकेल धुंद वारा..
वार्यासंगे मोहरनारी
आपली प्रीत बहरली असती..

हातात असत माझ्या तर,
नदी तुझ्या नवी केली असती
तुझ्यासाथिच्या सुर्यस्ताची
कधीच वेल चुकली नसती
धगधगत्या सुर्याला शोषून
स्वत:त बुडवून संथ वहाणे
नदीत सूर्य अन तुझ्यात मी
माझीही प्रखरता शमली असती..

हातात असत माझ्या तर
रोखला असता सूर्य मी
माहीत असता ग्रीष्म मला तर,
सोडलाच नसता अर्ग्य मी
सये तुझ्या गालान्वरती
नेहमीच असती पहाट किरणे
मध्यानिला केले असते
वट वृक्षाचे कार्य मी..

सये आभार त्यांचे ज्यांनी
माझ्यासाठी तुला घडवले
सये आभार नक्षत्रांचे
ज्यांनी, त्यांतून एक मला पाठवले
सये माझ काही नाही, पण
तय सर्वांचे प्रेम तुझ्यावर
मी तर फ़क्त दुवा त्यांचा
तेच देतो, जे मज, त्यांनी दिधले..
————————————–अम्बरीष

No related posts.

हृदयातला सल माझ्या……

Posted: 19 Aug 2008 12:07 PM PDT

हृदयातला सल माझ्या……

चांदण्यांच्या गावाला
माझे नक्षत्रांचे घर
तू माझा चन्द्र अन्
मी तुझी चकोर

जादूच्या नगरितिल
मी एक परी
येशील बनून तू राजकुमार
हीच आशा उरी

छान छान रानभर
मी पसरतेय कशी
बनून कस्तुरी राहायच
मला तुझ्या नाभितली

काळे काळे नभ
जरी जमले आकाशी
तूच फक्त इंद्रधनू
बनला माझ्या आयुश्यि

आसवांच्या माझ्या ,
तू गुलाब बागेतला
काटे टोचले कितीही
तरी सुगंध खेचतो मला

तुझ्या डोळ्यांच्या बाहुलया
मला खूप मोहावतात
पापणि बनून राहू का
मी त्यांच्या जवळपास

काही नाही केलस
तरी ,एक मात्र नक्की कर
हृदयातला सल माझ्या
बनून राहा आयुष्यभर….

स्नेहा (देवराई )

Related posts:

  1. हृदयातला सल माझ्या……

का ग वेडे हा अट्टाहास?…

Posted: 19 Aug 2008 12:07 PM PDT

का ग वेडे हा अट्टाहास?…

का ग वेडे हा अट्टाहास?…
तुझी स्वप्ने जपायसाठीच तर दिलं होतं ना मी माझं अख्खं आभाळ!!!!!!!!!!!!.
मग का हा रुसवा पुन्हा माझ्याशीच?
तुझी स्वप्ने मी माझ्यासाठी नव्हतीच मागितली कधी…….
वाटलं होतं मीही बनेन तुझ्या स्वप्नातला रहिवासी कधीतरी……..
पण हे वाटणं तरी कुठं सांगितलं मी तुला?
माझं हे एकमेव स्वप्न उराशी घेऊन तगमगत राहीलो असहाय्यपणे….
हो, उरातच दडवावं लागलं त्या स्वप्नाला……
कारण ते रेखाटण्यासाठी ठेवलेलं आभाळ तर तू घेऊन गेली होतीस ना!!!!!!!!!
फ़ुलपाखरं, आभाळ, गर्भरेशमी नक्काशी, फ़ूलाएवढी स्वप्नं
इतके विचार करण्याचीही माझी ऐपत नव्हती कधी……..
माझ्यापाशी होतं ते माझ एकुलतं एक स्वप्न.
तुझ्या स्वप्नांनी तर केली स्वमर्जीने आत्महत्या
पण माझं स्वप्न मात्र आज त्यांना वाचवताना जीव गुदमरून मरून गेलं………….

Related posts:

  1. पाउस हा खूळयागत असा का ग वागतो.?
  2. कुणाला ना पटणारा,हा असा माझा स्वभाव आहे…..
  3. कविता अशी नाही सुचत ग वेडे…….

कविता अशी नाही सुचत ग वेडे…….

Posted: 19 Aug 2008 12:07 PM PDT

कविता अशी नाही सुचत ग वेडे…….

कविता अशी नाही सुचत ग वेडे…….
त्यासाठी जाऊ द्याव्या लागतात कित्येक उदास रात्री………..
गळ्यातच घुसमटून मारावे लागतात व्यक्त होवू पाहणारे असंख्य अव्यक्त शब्द…….
न फ़ेडता ठेवावी लागतात जन्मव्यापी देणी, फ़ेडण्याची इच्छा असुनही……..
जगण्याचं नाटक करावं लागतं क्षणोक्षणी मरताना.
झाली आहेस का कधी घायाळ पानाच्या साध्या उन्मळण्याने?
फ़ुलपाखरु पकडतानाही त्याच्या दुख:ने झालीस का ग हळवी?
कधी पिंजऱ्याशी तासनतास बसलीस का ग निरखत एकाकीपणाचं दुख:
स्वत:चच फ़ूल उमलून आलं तरी गहिवरून येणारं झाड व्हावं लागत गं त्यासाठी!!!
वाळवंटात जीवन काढूनही इतरांसाठी ओयासीस बनावं लागतं,
सारं असह्य होवून कोसळलेल्या वर्षेचा थेंब न थेंब प्यावा लागतो.
मग कोठे जन्मते टीचभर कविता.
टीचभरच खरी पण जीवन सार्थ करणारी!!!

Related posts:

  1. कविता अशी-अशी असावी…
  2. ………का नाही कळली मला ..कविता…

ताई रडली तो दिवस

Posted: 19 Aug 2008 12:07 PM PDT

ताई रडली तो दिवस

——————————————————–

आई गेली तेव्हा ताई आणि मी रडलोच नाही
दोघेही अचानक मोठे झालो
आणि पपा अचानक म्हातारे

रात्री उशीरा येऊ लागले
दाढी वाढू लागली
केस गळायला आणि पिकायला लागले
पाठीत पोक
आणि तोंडाला नको नकोसा वास
अडखळत बोलायचे
अडखळत चालायचे
लोक त्यांना टल्ली म्हणायचे
जवळच रहाणारी आत्या रोज घरी यायची
सकाळीच दोन वेळचं जेवण करायची
आमचा राग राग करायची
ताईला तर काहीही बोलायची

नरुकाका - आत्याचे यजमान- मात्र
खुप चांगले
खाऊ चॉकलेट आणायचे
आणि ताईला आग्रहाने खाऊ घालायचे
माझेही लाड करायचे
पण ताईचे मात्र खुप

का कोण जाणे
ताई मात्र त्यांना टाळायची
माझ्या बरोबर-बरोबर रहायची
माझ्याबरोबरच बाहेर निघायची
इतर वेळी दुकानात जायला आळस करायची
पण नरुकाका घरात असले की
आपणहून घराबाहेर रहायची.

एके दिवशी मात्र विचित्रच झालं.
घरात आत्या आणि आम्ही दोघं
अचानक काका आले आणि आत्याला काही सांगितलं
आत्या तशीच तिच्या घरी गेली
जाताना ताईला स्वयंपाक घरातलं काम सांगून गेली
मी मात्र बाहेरच खेळत, टीव्ही बघत बसलेला

अचानक ताई बाहेर आली
हमसाहमशी रडत
आणि काका तिच्यामागून
आम्ही दोघे कितीतरी वेळ तिची समजूत काढत होतो
नरुकाका तिच्या पाठीवरुन हात फ़िरवत होते
पण ती थांबेचना

मग आत्या आली
काकांकडे प्रश्नार्थक बघत
काका म्हणाले, "तिला आईची आठवण येतेय"
आणि आत्या नाक मुरडून आत निघून गेली.
जळलेल्या भाजीवर पाणी ओतायला…

मला मात्र एक गोष्ट कधीच नाही कळली
ताई इतक्या दिवसानंतर का रडली ?

—— टल्ली

No related posts.

वादळ मैदानात आलंय

Posted: 19 Aug 2008 12:06 PM PDT

वादळ मैदानात आलंय

हल्ली म्हणे लोक वादळांनाही नांवं देतात
कतरिना, फ़तरिना….
हल्ली लोक वादळांना नावंही देतात
उद्या कुणी गांवही देतील

…आणि सांगतील
इथेच थांब या गावात
काय धुमाकुळ घालायचा तो
इथेच घाल…

वादळच ते
ऐकेल यांचं असं वाटत नाही
वादळच ते
मुळी ऐकणारच नाही
वादळ ते
सांगाल त्याच्या उलटंच करील
वादळ ते
झर्रकन गिरकी घेऊन
सांगणार्‍याचीच फ़िरकी घेईल

मग तुम्ही म्हणाल
हल्लीची पिढीच बहकली
अगदीच की हो वाया गेली
आधी वादळांना नावं दिलीत
आता वादळांना नावं ठेवाल …

वादळ ते
नावं दिलित म्हणुन हुरळणार नाही
वादळच ते
नावं ठेवलीत म्हणून सरळणार नाही
ते वादळच
वारा पिऊन झिंगलेलं
वादळ असलं
तुम्हा आम्हाला कळणारच नाही

ते म्हणेल
आजवर खुप हवा खाल्लीत
आता थोडी हवा काढतो तुमची
सवय झालीय तुम्हाला
गुलामांची
सलामांची
ऐष आणि आरामांची
थोडा घाम काढतो आता तुमचा

वादळ ते
बोललेला शब्द मोडणार नाही
वादळच ते
आता तुमची पाठ सोडणार नाही
भले कितीही नावं द्या तुम्ही
आता ते बधणार नाही
तुमचं काही साधणार नाही

वादळ मैदानात आलंय भाऊ
चला आपण पॅविलियनमध्ये जाऊ

No related posts.

रीता नसे हा प्याला मीत्रा

Posted: 19 Aug 2008 12:06 PM PDT

रीता नसे हा प्याला मीत्रा

रीता नसे हा प्याला मीत्रा
काठोकाठ भरला रे
पुन्हा एकदा पहा जरासा
कसा छलकतो आहे रे

शब्द नाचती मला खुणवती
गुंफुनी माला करण्या रे
पडतां बाहेर वीखरून जातील
कुठून आणू लीहीण्या रे

अमृत ओठांचे त्या प्यालो
अंश सोडला आहे रे
काठावरती पेल्याच्या बघ
रंग गुलाबी चढला रे

गोड लाजरा रम्य साजीरा
तीचा झळकतो मुखडा रे
चोरून तीरके पाहून मजला
पेल्यामधुनी हसला रे

कंठ न ओला झाला हा परी
पीउन सागर तरलो रे
सारे आहे भोगाया तरी
तीच्यावीणा मी झुरलो रे

कोण जन्मीचे पाप भोगीतो
पुण्य की कोणा जन्मीचे
चार घडीचा डाव मांडला
तीने सोडीला अर्धा रे

रीता नसे हा प्याला मीत्रा
मीच जाहलो रीता रे
पोकळ उरले शरीर केवळ
मन आत्म्याची चीता रे

….रसप….
१९ ऑगस्ट २००८

No related posts.

तू माझ्याशी लग्न करशील….?

Posted: 19 Aug 2008 12:03 PM PDT

तू माझ्याशी लग्न करशील….?

एक अनोळखी मुलगा येईल,
तुझ मन नाही,तुझ रूप पाहील.
तुझ्या सुंदरतेवर भालुन नक्कीच,
तो लग्नाला होकार देईल.

मान्या आहे. तुझ्या चांगल्यासाठीच,
तुझे आई-वडील हा निर्णय घेतील.
पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….

मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार,
कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार,
हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली,
तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार..

तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील,
त्याला ही भीक द्यायला तयार होतील,
पण एका भीकार्‍या शी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील…

यदा कदाचित,
तो मुलगा चांगला निघाला तरी..
फक्त जीवनाशी तडजोड म्हणून,
तो लग्नाला होकार देईल..
तुझे पालक ही त्याचे रूप आणि
मुखया म्हणजे किती हजारांची नोकरी आहे,
हे पाहून लग्नस मान्यता देतील.

पण जीवनाशी तडजोड करणार्‍या श्रीमनताशी,
काय तू जीवांभरच नात जोडशिल..अग
एका हृदयाने भिकारी मुळशी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….

तो तुला बायको म्हणून घरात ठेवेल..
तू माझ्या हृदयात राहशील..
तो तुझ्या भावनाना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल..
मी त्याच भावनांशी माझे नाते जोडेल..

हृदयतून निघालेल्या माझ्या या शब्दांवर,
मला माहीत आहे तू नक्कीच हसशील..
तरी पण……….
एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….

निशब्द(देव)

No related posts.

कविता अशी-अशी असावी…

Posted: 19 Aug 2008 12:03 PM PDT

कविता अशी-अशी असावी…

————————-

कविता एक स्पंदन असते
कधी कधी रणकंदन असते
कविता अशी-अशी असावी
असे काही बंधन नसते

कधी अंतरातले र्हुदगत असते
कधी स्वत:चिच फसगत असते
घनदाट जंगल माजलेले कधी
कधी सुबकशी मशागत असते

चांदणं,आकाश,फुले असते
वेश्यावस्तीतील मुले असते
स्वर्ग काय अन नरक काय
कवितेला सारेच खुले असते

मोजुन मापुन जोडलेली असते
सफाईदारपणे खोडलेली असते
कधी अंगावरच येते जशी..
धरणाची भिंतच फोडलेली असते

ईश्वराला केलेले वंदन असते
देहाने केलेले आक्रंदन असते
कविता अशी-अशी असावी
असे कुठलेच बंधन नसते

No related posts.

"वन्दे भाकरम्" - "अ"कविता

Posted: 19 Aug 2008 11:56 AM PDT

"वन्दे भाकरम्" - "अ"कविता

तो नेहमी दादरच्या त्या सिग्नल वर दिसायचा
इतर मळक्या पोरांत नेटनेटका असायचा
जेमतेम १२ वर्षाचं वय… चुनचुनीत
हातात कधी खेळनी तर कधी छत्र्या
मार्केट्ची नाळ ओळखुन एखाद्या सराईत बिझनेसमन सारखा वावरायचा
आपल्याच दुनियेत मश्गुल असायचा
नियतीच्या क्रुर फ़ेर्‍याचा बळी……
अन् म्हनुनच कि काय चेहर्‍यावर सतत मौनाचं साम्राज्य
चिन्मय चितळे… त्याचीही होती छानशी दुनिया
आई-बाबा आणि तो तिहेरी कुटुंब
११ जुलै च्या स्फोटात बाबा गेले.. अन् त्या धक्क्यात आईही….
कधीच परत न येण्यासाठी……
आपले म्हणवणारे नातेवाईकही एक एक करुन दुर लोटत गेले त्याला
अन् मग कसली शाळा अन् कसंल काय याच सिग्नलने त्याला आपलासा केला..
आज त्याच्या हातात तिरंगा होता
नेहमीप्रमाणेच सफाईदारपणे तो ते विकत होता…
एव्हाना आमची बरीच ओळख झाली होती
मी सहजच बोललो चिनु "वन्दे मातरम्" बोलुन दाखव ना …
क्षणभर काहीच हालचाल नाही
त्याची नजर जमीनीत जनु काहीतरी शोधत असल्यासारखी
दुसर्‍या क्षणाला त्याने माझ्याकडे पाहीलं त्याच्या डोळ्यातुन तेज ओसंडुन वाहत होतं अन् बोलला…

"वन्दे भाकरम्"

त्याचा तो इवलासा देह मला वामन अवतार घेतलेला विश्नु वाटायला लागला
दोन पावलात तिन्ही लोक पादक्रांत करुन तिसरं पाउल माझ्या डोक्यावर ठेवल्याचा भास झाला….

रितेश
हि "अ"कविता गद्यमय वाटते पण सत्यकथा आहे म्हनुन इकडे टाकली…..

Related posts:

  1. ………का नाही कळली मला ..कविता…
  2. सराईत…

अंधारगर्भ सूक्ष्म पोकळी

Posted: 19 Aug 2008 11:56 AM PDT

अंधारगर्भ सूक्ष्म पोकळी
अंतराळ व्यापणारी,
आंत आंत खेचणारी, घनकाळी
कुठवर खेचतात या, टोकदार भावना
जुलमातून जन्मणा-या, गेस्टापोंच्या यातना
किती झटले, झिजले, धावले, पडले, राबले
पदरी पडले, बाभूळवाणे, वार जिव्हारी..तुटले !
खोल खोल दर्यात, उमटते काळजातली थंड लहर
विस्फारत जाते, चिस्तारत येते, विनाशकारी कॄष्णविवर

धूसर धूम्मस, गर्भार तम्मस
आकंदित मन, शराग्री कसकस
धूसफूसते ज्वालामूखी
उफाळतो लाव्हारस
दलदलीत फसतो
आक्रोशतो जीवनरस

कोलमडण्याआधी माझ्यात मी
व्हावा एक महास्फोट
प्रसवेल मग सुशांत सॄष्टी
हॊऊदे मजवरी
इतुकीच रे कॄपादॄष्टी !

मैत्रेयी भागवत
१८ ऒगस्ट २००८

No related posts.

तिचि जबाबदारी?????????????????????/

Posted: 19 Aug 2008 11:49 AM PDT

तिचि जबाबदारी?????????????????????/

पुणे तिथे काय उणे

लहानपणापासुन ऐकलय

बरोबरच आहे…..पटलय

सन्तान्च्या वास्तव्याने पावन झालेली

देवदेवतानी युक्त असलेली

शिवाजी महाराजान्ची कर्मभुमी

पेशव्यान्चे वैभव भोगलेली

विद्येच माहेर घर असलेली

आजकालच्या कलाकारानी नटलेली

इन्द्रायणीच्या काठावर वसलेली……..

पण म्हणतात ना चान्गल्या गोष्टिला गलबोट लागत…

तस लागल ह्या पुण्यनगरीला………..

बर्‍याच बायका करतात तशी ती नोकरी करणारी

नेहमी जी गाडी येत तीच आली घ्यायला

ती पण बसली आणि गेली……….

जरा वेळाने लक्षात आल तिच्या हा नेहमीचा रस्ता नाही

बराच आरडाओरडा केला तिने..पण गाडीत ८-१० जण होते

ती एकटीच्…काय करनार ती………

नेल तिला दुरवर……….

आणि सर्वानी मिळुन कुसकरुन दिलि फेकुन तिकडेच लाम्ब………………

( हे सर्व रात्री नाही तर दिवसाच घडल आहे)

पकडले असतील सर्व नराधम

त्याना कोणती शिक्षा करुन तिच नुकसान भरुन येइल…

शरीराच्या जखमा येतील भरुन कदाचित

पण मनाच्या जखमा आयुश्यभर भळभळत राहतील,

कधी खपली धरलीच तर समाज आहे ना खरवडुन कढायला………..

………………………………………………………………………………………………………………………………….

माझी पान्ढरपेशा ही कविता वाचुन माझ्या काही मित्रानी मला या बाबतीत स्त्री ची पण काही जबाबदारी असते अस सन्गितल होत

त्याचि लिन्क दिलि आहे वर

………………………………………………………………………………………………………………………………….

आता येथे हिची काय जबाबदारी होती????

{१] तिने विचारायला हव होत का अरे तुम्हि कोन्डोम आणले का?

(२)मला आधी सान्गायच मी आय्-पिल आणल्या असत्या…

(३)आणि तुम्हि ८-१० जण मला १५-१५ मिनिटान्ची उसन्त घेउ द्या

(४)घरी फोन करते सान्गते मैत्रिणीच्या घरी आहे ,उशीरा येइल

अजुन काहि होती क तिचि जबाबदारी?????????????????????/

स्नेहा (देवराई )

No related posts.

ह्रदयाच्या पुस्तकात

Posted: 19 Aug 2008 11:44 AM PDT

ह्रदयाच्या पुस्तकात

किती पटकन तू बोललास विचार कर तुला सारे सोडून का गेले
तुला ठऊक होते सारे तरी तुला बोलावेसे असे का वाटले

माणसांच्या गर्दीत तुझा किती विश्वास मला वाटला
तुझ्या मनाची जागा हा मला विसाव्याचा कट्टा वाटला

पण क्षणात तू मला परकेपणाची जाणीव करून दिली
मैत्रीच्या रेशीम धाग्यात पहिलीच गाठ परकेपणाची बांधली

रंग मला हवे होते पण कधीही मी हिसकावून नाही घेतले
आनंदाच्या झाडाची फुलेही मी कधीच मजसाठी ओरबाडून नाही घेतली

सहज जी झाडावरून पडली तिच फुले मी वेचली
ह्रदयाच्या पुस्तकात जपून सारी ठेवली

पण तू ती फुले ही जाता जाता घेऊन गेलास
ह्रदयाच पुस्तक तुझ्यासाठी रिकाम झाल खरं
पण तुझ्या बोटांचे ठसे तुझ्याही नकळ्त
तू कायमचे माझ्या ह्रदयाच्या पुस्तकात कायमचे ठेऊन गेलास
प्रीती

Related posts:

  1. अजूनही मी तिथेच होते

*******चमक********

Posted: 19 Aug 2008 11:43 AM PDT

*******चमक********

.
.
जे मन ठरवते अगदी तसेच कुठे घडते रे

वास्तवाची अळी, स्वप्नाचे पान कुऱतडते रे

ध्येयाचा रस्ता जरी, सरळ, साधा सोप्पा

भाग्याचे पाऊल उलटे ते उलटेच पडते रे

हास्यावर ना दावा, ना अधिकार कोणाचा

एका आघाताने अश्रूंच्या जात्यात भरडते रे

किती ऊंची गाठलीस आता पडण्याची भीती

त्यापेक्षा जमनीवर राहणे खरेच परवडते रे

जिंकले सारे जग, न जिंकता आले स्वतःस

श्वास असे पर्यंतच हृद्याचे जग धडधडते रे

श्रद्धा असावी अपार स्वतः केलेल्या भक्तीवर

विश्वास दगड नसता, दगडाचे दार उघडते रे

सांग का करावा हट्ट चंद्र, सुर्य नि तारांचा

चमक तशी इवल्या काजव्यातही सापडते रे

श्रीमंतीच्या जोरावर किती गरीबांना पेटवलेस

शेवटी तुझेही शरीर अग्नी पाशीच अडते रे

@ सनिल पांगे

No related posts.

मुळाकडे

Posted: 19 Aug 2008 11:39 AM PDT

मुळाकडे

——–

सोपविला भार
तुझ्यावर आता
तूच एक त्राता
दयानिधी

तुझ्याच छायेत
विसरला शिण
उरले न हिण
देहामाजी

धरणी उशाला
आकाशाचि शाल
प्रणवाचा ताल
कानावरी

तुटुनिया गेले
पाश संसाराचे
विश्व हे घराचे
रुप झाले

हात हे मोकळे
तुला वंदावया
धन्य झाली काया
तुझ्या पायी

आनंदाने जड
विलोप पावले
झाड झेपावले
मुळाकडे

No related posts.

भुमिगत

Posted: 19 Aug 2008 11:34 AM PDT

भुमिगत

माझ्या अस्तित्वाचा हा पाचवा दिवस…..
—————————————————-

झालोय भुमिगत तुजसाठी
कराया अस्तित्वाचा भास्
तु कारे भोगतोयेस
माझ्याविना अदन्यातवास..?

विसरू नकोस
तु नाही संगी तरी तुझाच भास्
होवुनी प्राणवायु
राहिल जीवंत माझा श्वास

रडलो जरी
देइल साथ श्रावणमास
वाहुनी श्रावणधारा
लपवतिल माझ्या अश्रुची आस

चुरगळलेल्या फुलांचा
शाबूत आहे अजुन सुवास
वाळलेल्या पाकळ्या जमिनीत रुजून
परत फुलण्याचा विश्वास…!!

No related posts.

वैरीण

Posted: 19 Aug 2008 11:32 AM PDT

वैरीण

वैरीण
काळी नागीण,
लांब सावल्यांची
काजळमाया,
मधुनच आला
श्ब्दांचा वारा
काहीतरी सुचवुन
गेला,
दाटुन आली
साजणवेळा,
एक टिटवी
फिरुन गेली,
दुर कुठेतरी
अर्ध्य देउनी


__._,_.___
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
Recent Activity
Visit Your Group
Y! Messenger

All together now

Host a free online

conference on IM.

Yahoo! Finance

It's Now Personal

Guides, news,

advice & more.

Yahoo! Groups

Mom Power

Community just for Moms

Join the discussion

.

__,_._,___

0 comments:

sponsers