sponsers

Monday, May 18, 2009

http://www.majhyakavita.com Marathi kavita Fwd: Marathi kavita





---------- Forwarded message ----------
From: www.marathikavita1.co.cc <marathikavita56@gmail.com>
Date: 2009/5/18
Subject: Fwd: Marathi kavita
To:





Marathi kavita

कंट्रोल+ अल्ट + डिलीट

Posted: 16 May 2009 04:34 PM PDT

कंट्रोल+ अल्ट + डिलीट

कंट्रोल+ अल्ट + डिलीट

मला आठवत तु म्हटल होतस
वेगळे होवुया….
नको असलेल्या नात्याच 
ओझ आता नको उचलुया….
किती सहज … चेह-यावरची रेष न हलवता….
बघत राहीले तुला क्षणभर….
अन चांदण्याच दिसल्या मला भर दुपारी…
काहीच कळेना…तु शांत काही रीअक्ट न होता
अन मग सारे सोपस्कार… कागदोपत्री
कुठलाही वाद नाही… प्रश्न नाही 
शोधत राहीले मी उत्तरे न विचारलेल्या प्रश्नांची….

आज परत एकदा ..तु ..मी समोरासमोर….
आज तुला मी हवेय…. का??? 
एकटेपण सहन होत नाही….. 
की शरीराची भुक संपत नाही…

विसरले नाही मी तुझ ते बोल…
आठवत तरी का तुला ते अंधुकस..???
येस…. आज मी तुला तेच सांगतेय….
"मी तुला केलय माझ्या जिवनातुन 
कंट्रोल+ अल्ट + डिलीट!!! "

No related posts.

बाहुली ग… बाहुली…

Posted: 16 May 2009 04:34 PM PDT

बाहुली ग… बाहुली…

बाहुली ग… बाहुली…

बाहुली ग… बाहुली…
कशी सांगु कहाणी…
प्रीतीच्या खेळातली
मी नाही ग राणी…

बाहुली ग… बाहुली…
कशी गाऊ गाणी
ह्रुदयात ग ही
वेडी प्रीत त्याची…

बाहुली ग… बाहुली…
कशी धरु फ़ेर…
नाही ग फ़ुलणार
हा मनमोर…

बाहुली ग… बाहुली…
कशी लपवु तुला??
गळ्याशी ग माझ्या
बघ हुंदका आला….

बाहुली ग… बाहुली…
दे सोडुन हे स्वप्न
झालय ग हे
मन मंदिर भग्न

बाहुली ग… बाहुली…
चल सोड हा चाळा
पडली बघ त्याचा गळा
तीची ग वरमाळा…

बाहुली ग… बाहुली…
चल हास बळेबळे
चारचौघ राणी
पाहती तुझ्याकडे..

बाहुली ग… बाहुली…

बाहुली ग… बाहुली…

No related posts.

मन..

Posted: 16 May 2009 04:33 PM PDT

मन..

मन आभाळ आभाळ.. मन पाऊस पाऊस…
मन आभास आभास.. मन सुवास सुवास..

मन चांदवा चांदवा.. नभी चांदण्यांचा थवा..
मन पाखरु पाखरु.. मन पारवा पारवा..

मन वेल्हाळ वेल्हाळ.. मन कल्लोळ कल्लोळ…
मन तुफ़ान.. उधाण.. मन पान सळसळ..

मन अथांग सागर.. मन निळेनिळे पाणी…
मन आठवांचे मोती.. मन विरहाची गाणी..

मन हवंस हवंस… मन नकोसं नकोसं…
मन चांदणी पुनव.. विना चंद्राची आवस…

मन कधी ऐलतीर.. मन कधी पैलतीर..
मन होउन नावाडी.. तुला भेटण्या अधीर..

मन काहुर..प्रतिक्षा.. मन कासाविस आशा..
वाट पाहुन पाहुन… मन विरह.. निराशा..
वाट पाहुन पाहुन… मन… विरह.. निराशा..!

No related posts.

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत

Posted: 16 May 2009 04:30 PM PDT

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत - १

पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत
आयुष्यात - - प़ेम केल होत - २

एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत
आयुष्यात - - प़ेम केल होत - ३

दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत
आयुष्यात - - प़ेम केल होत - ४

हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत
आयुष्यात - - प़ेम केल होत - ५

नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत
आयुष्यात - - प़ेम केल होत - ६

इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत
आयुष्यात - - प़ेम केल होत - ७

Related posts:

  1. आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……………..

बरं झालं

Posted: 16 May 2009 04:28 PM PDT

बरं झालं

तू नाहीस म्हणुन
तुझी आठवण येते
बरं झालं तू गेलीस ते

दिवस जातो कसाबसा
रातरी कोण र्ड्ल आसते
बरं झालं तू गेलीस ते

सार्या घटका गोठून गेल्या 
भिंतीवर घड़याळ कीट्कीट करते 
बरं झालं तू गेलीस ते

का जगु हा प्रश्न आहे 
मरण्याचे पण भय संपले

No related posts.

.ह्यावर्षी एकदातरी पावसात भिजत रहा

Posted: 16 May 2009 04:28 PM PDT

.ह्यावर्षी एकदातरी पावसात भिजत रहा

काल पासून आभाळ मला छळतय 
होवून तुझ गानं माझ्या कवितेत गळतय.
कधी होत काळ कुट्ट जसा असायचा तुझा हट्ट..
आता ग्रीष्माची आग घेवून सारख मला जाळतय..
कधी कुठून आनत वारा बेफान कळत नाही ..
सारख मागत गानं तुझ तस जात नाही ..
कधी घेवून येतो गारवा कधी एकटाच गातो पारवा ..
कळतोय मला त्याचा असा वेडा हट्ट 
तूच ठेवले त्याला आशेवर … माझ काय ???
त्याला तरी भेटून जा …ह्यावर्षी एकदातरी पावसात भिजत रहा 

No related posts.

एकदा तरी प्रेम करून बघ…

Posted: 16 May 2009 04:27 PM PDT

एकदा तरी प्रेम करून बघ…

सगळ काही पाहिल असशीलच मग 
एकदा प्रेम करून बघ..

एकटच काय जगायच..?
आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघ..

खुप वेळ असेल तुझ्याकडे..
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघ..

कविता नुसत्याच नाही सुचणार…
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघ..

खुप छान वाटत रे..
सर्वात सुंदर भावनेला अनुभवुन बघ…

नुसता तडफातडफी निर्णय घेऊ नकोस..
ह्या गोष्टींचा पण विचार एकदा का होइना करून बघ..

नुसतच काय जगायच..
जिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ..

एक जखम स्वतः करून बघ..
स्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ..

नुसत सुखच काय अनुभवायचे..
दुखाच्या सागरात एक डूबकी मारून बघ..

विरहाच्या तलवारीचे घाव सोसून बघ..
थोड्या जखमा स्वतः करून बघ..

रिकाम काय चालायच..?
आठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ..

रडत असलेले डोळे लपवत..
एकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ..

सोपं नसत रे…एकदा रडून बघ..
तुझ्या अश्रुंची चव चाखून बघ..

सांगण्याचा हेतु एवढाच की..
एकदा का होइना प्रेम करून बघ..

एक वेडा कवी….marathi kavita prem kavita love poem poetry

Related posts:

  1. आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……………..
  2. एकदा तरी ….
  3. प्रेम प्रेम अन् प्रेमच…….

मे महिन्याची सुट्टी

Posted: 16 May 2009 04:23 PM PDT

मे महिन्याची सुट्टी

==========================
.
.
टांण टांण टांण टांअण टांण……….
हे ऐऐऐऐ…………………….. हुर्रे!
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
.
काही दिवस आता आई
लागू नकोस हा पाठी
नको दप्तर नकोच पाटी
नको देऊस खाऊची वाटी
.
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
.
अस्स स…………………….. चक
.
कच्च्या पक्क्या मण्यांनी लगडली 
आहे करवंदाची जाळी
आंबट झेर फोड कैरीची
अन चिंचेची अवीट गोडी
.
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
.
नको रिबीन नकोच वेणी
फिरूदे मला तशीच झिपरी
सैल गाठ अंबाड्याची
दे घालून माने वरती
.
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
.
बोंडा बोंडातून उडणारी
चल पकडू उनाड शेवरी
रानामधल्या सोनं तुऱ्यांची
चल जमवूया जुडी

No related posts.

You are subscribed to email updates from Marathi Kavita
To stop receiving these emails, you may unsubscribe now.
Email delivery powered by Google
Inbox too full? (feed) Subscribe to the feed version of Marathi Kavita in a feed reader.
If you prefer to unsubscribe via postal mail, write to: Marathi Kavita, c/o Google, 20 W Kinzie, Chicago IL USA 60610



__._,_.___
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
Recent Activity
Visit Your Group
Give Back

Yahoo! for Good

Get inspired

by a good cause.

Y! Toolbar

Get it Free!

easy 1-click access

to your groups.

Yahoo! Groups

Start a group

in 3 easy steps.

Connect with others.

.

__,_._,___

0 comments:

sponsers