आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी
शून्य नजरेने रोखून पाहतोय
झिरोचा बल्ब.
झिरो नजरेने न्याहाळतोय
शून्याचा बल्ब मला.
चिठ्ठी लिहायचीय मला जिच्या नावाने
तिला तर वाचताही येत नाही
रात्रीचे खूप काही वाजले आहेत म्हणून
ती टिकटिकत आहे,झोपेत, घड्याळासारखी
`उद्यापासून एकटी खेळ एवढं मुलीच्या
हसऱ्या चेहऱ्याशी बोलून
मी लिहायला बसलोय आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी.
दहा वाजल्यापासून आत्महत्येचा उंदीर धावतोय शरीर भर
तो थांबेल तेव्हा संपून जाईल कुरतडणं.
शेवट्चा भाऊ पाध्ये वाचला धर्मग्रंथासरखा
हमसून हमसून रडायचे टाळले.
श्वास कोंडला छाती फुटली
हे सालं, मरण येतच नाही, बेडरूमच्या बाहेर
बायकू लग्नापासून नुसतीच धम