गेली चार दशके 'आवाज कुणाचा... शिवसेनेचा' असा नारा घुमणाऱ्या परळ-लालबाग पट्ट्यातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याने शिवसेनेच्या अभेद्य किल्ल्याला तडे गेले आहेत. मनसेने मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघांत लाखालाखांची मते घेऊन शिवसेनेला दणका दिला असला तरी प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील लालबाग-परळ परिसरात झालेली पिछाडी शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे. मुंबईच्या ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी मराठी वस्ती असलेल्या अनेक मतदारसंघांत मनसेने शिवसेनेवर आघाडी घेतलीच; शिवाय पाच मतदारसंघांत मनसेने प्रथम क्रमांक पटकवला! त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मुंबईतच चांगला फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन्ही मतदारसंघाचा मिळून एक लोकसभा मतदारसंघ झाला असून यातील लालबाग, परळ, शिवडी हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या आधीचा दक्षिण मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ १९८५ पासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. १९८० मध्ये काँग्रेस व शिवसेना यांच्यात समझोता झाल्यावर हा मतदारसंघ काँग्रेसच्या सतीश पेडणेकर यांना देण्यात आला होता. त्यानंतर लालबाग, परळ या परिसरातील कट्टर शिवसैनिकांमुळे या मतदारसंघावर शिवसेनेचीच मक्तेदारी होती. मात्र ही मक्तेदारी मनसेने मोडून काढली आहे. मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी वरळी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा या पाच मतदारसंघामध्ये काँग्रेसचे खा. मिलिंद देवरा आघाडीवर आहेत, तर मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर शिवडी मतदारसंघात प्रथम आहेत. मावळते खासदार मोहन रावले एकाही मतदारसंघात आघाडी मिळवू शकले नाहीत. वरळीमध्ये नांदगावकर यांना ३८ हजार तर रावले यांना ३० हजार मते मिळाल्याने मनसेने सेनेपेक्षा ८ हजार मतांची आघाडी घेतली. शिवडीमध्ये नांदगावकर यांना ४८ हजार तर रावले यांना ३७ हजार मते मिळाल्याने इथे मनसेच्या पदरात १३ हजारांची घसघशीत आघाडी पडली. या मतदारसंघात विद्यमान आमदार दगडू सकपाळ यांचा पूवीर्चा परळ मतदारसंघ येतो, हे लक्षात घ्यायला हवे. |
Explore and discover exciting holidays and getaways with Yahoo! India Travel Click here!
__._,_.___
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment