--- On Tue, 19/5/09, दिनकर हरमळकर <dinkarharmalkar290481@yahoo.co.in> wrote: From: दिनकर हरमळकर <dinkarharmalkar290481@yahoo.co.in> Subject: व्होडाफ़ोन आणि बाहुल्या To: dombivalifast@yahoogroups.com Date: Tuesday, 19 May, 2009, 12:35 AM
आजकाल सगळ्यात जास्त लक्षात रहातायत ती ही मंडळी. ही मंडळी कोण आहेत, कुठून आली हे जर वाचलंत, तर चक्रावून जाल. आयपीएल सुरू असताना, बेकमधे सवयीने चॅनल बदललं जातं. पण सध्या मात्र घराघरात या ब्रेकचीच जास्त आतुरतेने वाट पाहिली जातेय. त्याला कारण ठरतायत झूझूच्या गोष्टी. सेवन अपचा फिडोडीडो, ओनिडाचं शिंगवालं भूत, अमूल बटरची गोल डोळ्यांची मुलगी, यांच्यापाठोपाठ सध्या घराघरात हे झूझू लोकप्रिय होतायत. म्युझिक, मॉडेल्स, डायलॉग्ज कश्शाचाही आधार न घेता, इथे दिसतात कॅस्परसारखे पांढऱ्या रंगाचे गोंडस झूझू. केवळ अर्ध्या मिनिटात त्यांनी दिलेला झकास मेसेज दाद मिळवतो. या गोंडस बाळांचा फॅन क्लब सगळया जगभर पसरलाय. 'आयपीएल'च्या निमित्ताने घरोघरी या अॅड्सची चर्चा होतेय. अॅडमध्ये केलेल्या बाहुल्यांच्या अॅनिमेशनला, त्याच्या एक्सप्रेशन्सना, दिलेल्या मेसेजला प्रत्येकाने दाद दिलीय. पण, मित्रहो, तुम्ही फसलात इथे. पांढऱ्या रंगाचे हे झूझू अॅनिमेटेड नाहीयेत. अॅनिमेटेड बॉडीचे लूक दिलेले हे झूझूमध्ये खरोखरची माणसं वावरतायत. अॅनिमेशन वाटावं अशा तऱ्हेनेच त्यांना तयार केलंय. अॅनिमेशनचा हा 'खराखुरा' प्रयत्न असल्याचं या अॅड्सचे डायरेक्टर प्रकाश वर्मा सांगतात. 'अशा कॅरॅक्टर्सचे कपडे तयार करणं आणि अवघ्या तीस सेकंदात कन्सेप्ट मांडणं आमच्यासाठी चॅलेन्ज होतं. न सुरकुतणारा पांढरा जाडसर कपडा वापरून, त्याला आतल्या बाजूने फोमचं पॅडिंग देऊन सगळ्यांना समान आकार दिला गेला. शिवाय डोकं एका वेगळ्या कडक मटेरियलपासून आणि नॉर्मल शरीरापेक्षा मोठं करण्यात आलं आणि झूझू तयार झाला. याचं शूटिंग टॉप अँगलने हायस्पीड फॉर्ममध्ये करण्यात आलंय. झूझू वापरत असलेली प्रॉपटीर् त्यांच्या प्रपोर्शनमध्ये उंच आणि मोठी केल्यामुळे ही मंडळी बुटकी आणि हातापायच्या काड्या असणारी दिसतात, असंही त्यांनी सांगितलं. झूझूंवर लक्ष जावं म्हणून त्याची बॅकग्राऊण्डही ग्रे शेडची ठेवण्यात आलीय. या सगळ्या अॅड्जचं शूटिंग साऊथ अफ्रिकेत पार पडलंय. |
Explore and discover exciting holidays and getaways with Yahoo! India Travel Click here!
|
Share files, take polls, and make new friends - all under one roof.
Click here.
0 comments:
Post a Comment