कुणीतरी आठवणं काढतयवैभव जोशी कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...... कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...... बाकी काही नाही हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...... रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता "एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...... मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...... जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही "कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......" From मनोगत Leave "something" for"someone" but never leave"someone" for "something" bcuz.in life "something" will leave you but "someone" will always be with you |
__._,_.___
If you are passionately in love with Marathi poetry, as a writer or a reader, this is your group.
Please post your poems, the poems that you like, qoutations about poetry and your views and thoghts about Marathi poetry.
Marathi_Kavita_Mandal
Now all Marathi Kavita are available at
http://kavitasangraha.blogspot.com
Please post your poems, the poems that you like, qoutations about poetry and your views and thoghts about Marathi poetry.
Marathi_Kavita_Mandal
Now all Marathi Kavita are available at
http://kavitasangraha.blogspot.com
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment