sponsers

Sunday, August 15, 2010

[GarjaMaharashtraMaza] वन्दे मातरम्' - एक भंगलेले स्वप्न!

 

http://www.bokyasatbande.com/'वन्दे मातरम्' - एक भंगलेले स्वप्न!

- भारतकुमार राऊत



बंकिमचंदांनी भारतमातेचे वर्णन 'सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,' असे केले. पण आज पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी करोडो लोकांना दिवसभर टँकरची वाट पाहात थांबावे लागते. 'सुफलाम्'चा तर पत्ताच नाही. धान्य नाही, म्हणून गरीबांना सडक्या गव्हासाठी लाठ्या खाव्या लागतात आणि कुपोषणामुळे मेळघाटात लहानग्यांच्या शरीराचे सापळे बनतात...
...............

आज १५ ऑगष्ट. देशाचा स्वातंत्र्यदिन. पहाटेच्या अंधारातच राष्ट्रभक्तीपर गाण्यांनी तुम्हाला जाग आली असेल. सकाळपासूनच ध्वजवंदनाचे कार्यक्रम, टीव्हीवर देशभक्तीचे गोडवे गाणारा सिनेमा आणि संध्याकाळी गल्लीगल्लीत सत्यनारायणाच्या महापूजा आणि नंतर सांस्कृतिक कार्यक्रम. दिवस कसा निघून जाईल, ते कळणारही नाही. अनेक नोकरदार मंडळी नेमका रविवारीच स्वातंत्र्यदिन आल्याने एक 'हक्काची' रजा कशी बुडाली, याचा शोक करत स्वातंत्र्यदिनाचा आनंदही गमावून बसली असतील. अशावेळी स्वातंत्र्यासाठी ज्यांनी सर्वस्वाची होळी केली, अशा हजारो ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्याचे भान कोणाला? त्यांचीच आठवण नाही, तर मग जे गात अनेकांनी इंग्रजांच्या लाठ्या झेलल्या, त्या 'वन्दे मातरम्'चे तरी कोणाला सोयरसुतक?

स्वातंत्र्यानंतर घटनासमिती स्थापन झाली आणि अनेक बुद्धिमंतांनी चर्चा केल्यानंतर गुरुदेव रवींदनाथ टागोर यांच्या 'जन गण मन'ची 'राष्ट्रगीत' म्हणून घोषणा झाली. हे गीत आवेशयुक्त तर खरेच, पण त्याची मूळ रचना इंग्लंडचे बादशहा पंचम जॉर्ज यांच्या स्तुतीसाठी झाली होती, याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले. 'जन गण मन' या गीताच्या सुरावटीवर संचलन नीट करता येईल, शिवाय त्यातील शब्द सर्वांना नीट समजण्यासारखे आहेत, त्याची भाषा हिंदी असल्यामुळे ती भारतीयांच्या 'जवळची' आहे, असे युक्तिवाद करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्ती आणि लोकशाहीचा मोठा प्रयोग या भावनांमध्येच भारतीय मन गुंतून पडलेले असल्याने 'जन गण मन'चा 'राष्ट्रगीत' म्हणून स्वीकार होण्यात फारशी खळखळ झाली नाही. (खरे तर 'राष्ट्रगीत' म्हणजे नक्की काय, याचीच बहुतांश भारतीयांना तेव्हा कल्पना नव्हती.) याचवेळी 'वन्दे मातरम्' या गीताला 'राष्ट्रगीता'चा दर्जा द्यावा, अशी मागणी पुढे आली होती. पण ती तिथेच दबली. ती आजवर तशीच दबलेली आहे.

'
वन्दे मातरम्' की, 'जन गण मन' हा वाद आजच्या पवित्र दिवशी उगाळण्याचा हेतू नाही. पण इतके खरे की, बंकिमचंद चट्टोपाध्याय यांच्या 'आनंदमठ' कादंबरीच्या अखेरच्या पानावर छापली गेलेली ही कविता एकेकाळी हजारो स्वातंत्र्यप्रेमी भारतीयांचे गर्वगीत होते. ज्यांनी स्वातंत्रचळवळ प्रत्यक्ष पाहिली अनुभवली, ते सांगतात की, ब्रिटिश सत्तेविरुद्ध महात्मा गांधींच्या नेतृत्त्वाखाली नि:शस्त्र लढा देण्याचा निर्धार करून सत्याग्रह करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना 'वन्दे मातरम्'चाच आधार वाटत होता. खरेतर 'वन्दे मातरम्' हे भारतभूमीला आई मानून तिची स्तुती गाणारे 'भक्तिगीत'. पण त्यातील 'भक्ती'ची धार अशी की, 'हर हर महादेव', 'अल्ला हो अकबर', 'जो बोले सो निहाल, सत् श्री अकाल' या आणि अशा युद्धातील घोषणांप्रमाणेच 'वन्दे मातरम्' हीसुद्धा लढाईची आरोळी ठरली. बिनीच्या सत्याग्रहीने 'वन्दे' अशी हाक द्यायची आणि त्याच्या मागून शेकडोंनी 'मातरम्'ची साद देत ब्रिटिशांचे कडे मोडण्यासाठी धडक द्यायची आणि तांेडातून रक्त येईपर्यंत लाठ्यांचे प्रहार सोसायचे, असे अनेकदा व्हायचे. प्रभातफेऱ्यांमध्ये घोष व्हायचा तो 'वन्दे मातरम्'चाच आणि काँग्रेस अधिवेशनांतही गाणे व्हायचे ते 'वन्दे मातरम्'.

'
आनंदमठ' ही कादंबरी स्वातंत्र्यध्येयाने पेटून उठलेल्या तरुणाचीच कहाणी. त्या काळात अनेक सर्जनशील लेखकांनी याच विषयावर लेखन केले. ते लोकप्रियही झाले. पण कादंबरीतील कथानकापेक्षाही ही साहित्यकृती अजरामर झाली, ती त्यातल्या 'वन्दे मातरम्' या कवितेमुळेच. मूळची ही कविता चार कडव्यांची. त्यातले केवळ पहिले कडवेच सामान्यपणे गायले जाते. ब्रिटिश सरकारला 'वन्दे मातरम्' नकोसे झाले होते. पण स्वतंत्र भारतातील सरकारलाही ते त्रासदायक का वाटू लागले? केवळ त्याची भाषा संस्कृत म्हणून? तसे असेल तर 'सत्यमेव जयते' हे भारताचे बोधवाक्य आणि अनेक महामंडळांची, बँकांची आणि पोलिस दल, संसद, विधानसभा यांचीही बोधवाक्ये संस्कृतच आहेत की. असे तर नसेल की, या गीतातील 'वन्दे मातरम्'चा अर्थ मी आईपुढे (इथे भारतमातेसमोर) नतमस्तक होतो, असा होत असल्याने, अल्पसंख्याकांच्या तथाकथित 'धामिर्क' भावना त्यामुळे दुखावतील, अशी पोकळ भीती राज्यर्कत्यांना वाटली आणि नको ती कटकट म्हणून त्यांनी 'वन्दे मातरम्' कट केले? अनेक कार्यक्रमांत 'वन्दे मातरम्' गायले जाते, तेव्हा अनेक मुस्लिम त्याचे गायन करता केवळ उभे राहतात, असे दिसते. प्रत्येकाने धामिर्क भावना जागवून व्यक्तिगत जीवनात कसे वागावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण त्याचे परिणाम सरकारी विचारप्रक्रियेवर होणार असतील, तर ते कितपत योग्य?

अर्थात सध्या देशाची वाटचाल ज्या पद्धतीने चालू आहे, ती पाहता 'वन्दे मातरम्' हे 'राष्ट्रगीत' झाले नाही, याबद्दल बंकिमचंद आणि शेकडो हुतात्मे यांच्या स्वर्गस्थ आत्म्यांना आनंदच होत असेल. या गीतात वर्णन केलेले भारतमातेचे वर्णन ६३ वर्षांनंतरही प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाही, हा खरेतर या गीताचा त्यातील भावनांचा अपमानच आहे. या गीतात बंकिमचंदांनी भारतमातेचे वर्णन 'सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,' असे केले. पण आज देशात पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी करोडो लोकांना दिवसभर टँकरची वाट पाहात हायवेवर थांबावे लागते आणि महिलांना दहा दहा किलोमीटर पायपीट करून डोक्यावरून पाणी वाहावे लागते. 'सुफलाम्'चा तर पत्ताच नाही. धान्य नाही, म्हणून गरीबांना सडक्या गव्हासाठी रखवालदारांच्या लाठ्या खाव्या लागतात आणि कुपोषणामुळे मेळघाटात लहानग्यांच्या शरीराचे सापळे बनतात. पर्यावरणाचे चक्र मोडल्याने 'मलयजशीतलाम्' नव्हे, तर अंगाची लाही करणाऱ्या उन्हाचे चटके सहन करावे लागतात.

बंकिमचंद पुढे म्हणतात, 'सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम् सुखदाम् वरदाम् मातरम्. किती उत्कट हे वर्णन! पण त्यांना कुठे ठाऊक होते, की, ६३ वर्षांनंतर सार्वजनिक जीवनात हास्य नव्हे, केवळ क्रोध, सुमधुर शब्द नव्हेत, तर केवळ निषेधाचे सूर, नेत्यांची शिवराळ आणि आगखाऊ भाषणेच भारतमातेला ऐकावी लागतील. अशी ही भारतमाता सुख आणि सुखाचा वर तरी कशी देणार? कारण ती स्वत: दु:खी आणि कष्टी आहे..

'
वन्दे मातरम्'ला सरकारदरबारी न्याय मिळाला नाही आणि त्यातील शब्दांच्या अर्थाला आपण भारतीय न्याय देऊ शकलो नाही, इतका विचार आज मनात बाळगला, तरी पुरे!

(
लेखक टाइम्स ऑफ इंडिया समूहाचे संपादकीय सल्लागार असून शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आहेत.)

 

 

Source: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6312473.cms

 

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Get great advice about dogs and cats. Visit the Dog & Cat Answers Center.


Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.


Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.

.

__,_._,___

0 comments:

sponsers