sponsers

Sunday, August 15, 2010

[GarjaMaharashtraMaza] मीटर डाऊन चळवळीला गरज प्रतिसादाची

 

Source:- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6304043.cms

 

सुहास फडके




मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या अरेरावी वृत्तीचा निषेध म्हणून गुरूवारी मुंबईकरांनी बहिष्काराचे हत्यार उचलले. अर्थात याला मर्यादित प्रतिसाद मिळाला. तेही अपेक्षित होते. कारण कोणतीही चळवळ सुरू होते तेव्हा ती छोटीच असते. तिला व्यापक स्वरूप देणे हे नेत्यांच्या हाती असते.

मुळात अशी हाक देणे हेच महत्त्वाचे होते. कारण सर्वसामात्य मुंबईकर दंडेलशाहीपुढे पिचत चालला आहे, मग ती फेरीवाल्यांची असो किंवा रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांची असो. राजकीय कार्यकर्त्यांची असो किंवा पदपथ अडवणाऱ्यांची असो. प्रत्येक मुंबईकर याबद्दल व्यक्तीगत पातळीवर क्षीण आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो आणि रोजच्या रगाड्यात पुढे काही करायचे विसरून जातो म्हणा किंवा त्याच्या अंगात त्राण रहात नाही.

अशा वेळी तीन तरुण किंवा थ्री इडियट्स पुढे येतात आणि आपण एक दिवस तरी एकत्र येऊन टॅक्सी आणि रिक्षा चालक यांना सांगूया की आम्हीही एक होऊ शकतो असे आवाहन करतात. आपल्या परीने ते सर्वांना एक करण्याचे प्रयत्न करतात हे कौतुकास्पद आहे. ते लोकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडलेही असतील, फेस बुक आणि ऑर्कुट ही माध्यमे चळवळ पुढे नेण्यास उपयोगी पडतही नसतील, पण त्यांच्याही या त्रुटी लक्षात आल्या असतील हे नक्की.

खरे म्हणजे आता आपल्यापैकी प्रत्येक मुंबईकराने आपापल्या ताकदीनुसार हा मामला पुढे रेटायला हवा आहे. थोडा विचार केला तर लक्षात येते की, आपण अनेकदा अकारण रिक्षाने अथवा टॅक्सीने प्रवास करतो. सहज चालत जाता इतके अंतर असते, अंगात उत्साहही असतो, केवळ समोर रिक्षा दिसते म्हणून आपण तिच्यात बसतो.

आणि विचार केला तर हेही लक्षात येते की, रिक्षावाला अथवा टॅक्सीवाला आपल्याला फसवतो आहे हे जाणवत असूनही आपण निमुटपणे त्याचा अत्याचार स्वीकारतो. मग आपण स्वत:शीच, दमलो आहे, वेळ नाही, कोण रिक्षावाल्याच्या तोंडी लागणार, रिक्षावाले सगळे असेच वगैरे असे पुटपुटत निघून जातो. एक प्रकारे आपण पराभूत मनोवृत्ती दाखवत असतो.

काही वेळा आपल्याला तक्रार करायची असते पण नेमके काय करायचे याची कल्पना नसते. पत्र नेमके कोणाला लिहायचे हे कळत नाही. शिवाय आपल्याकडश् सरकारी यंत्रणा अशी आहे की तक्रार करून काही फायदा होण्याची शक्यता अधिक असते. अर्थात या सगळया समस्यांवर मार्ग काढता येईल. मध्य रेल्वेने, लोकलमधील उपदवाला आवरण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक दिला आहे. त्यावर फक्तन एसएमएस करायचा. भजनी मंडळ असेल तर बोगी कितवी, लोकल कोणती वगैरे कळवायचे. पुढच्या स्टेशनवर पोलीस मंडळाला ताब्यात घेतात.

आता ग्राहक चळवळीत असणाऱ्यांना हे आव्हान आहे की, पोलिस, आरटीओ अशा लोकांशी कायम संपर्क येणाऱ्या विभागांनी अशाच प्रकारची सेवा सुरू करावी म्हणून त्यांच्यावर दडपण आणावे. हे काम सोपे नाही. कारण असे करण्याने या यंत्रणेला अधिक लोकाभिमूख व्हावे लागेल. आणि सरकारी यंत्रणेला लोकांपासूनक बाबी दडवायला आवडतात.

या तीन तरुणांनी काय साधले असा सवाल काही जण विचारत आहेत. खरे म्हण्जे कोणत्याही चळवळीचा, सार्वजनिक जीवनाचा अनुभव नसताना हा विचार पुढे रेटायचा, लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा हीच बाब मोठी आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे, रिक्षावाले आणि टॅक्सीवाले यांनाही लक्षात आले असेल की आपण प्रवाशांना यापुढे गृहीत धरू शकणार नाही.

या चळवळीत आता मोठा धोका निर्माण होईल तो राजकारण्यांचा. कोठेही लोक एकत्र येत आहेत असे लक्षात आले की राजकारणी पुढे सरसावून ती चळवळ ताब्यात घेतात आणि श्रेय लाटतात किंवा ती चळवळ मरेल अशी व्यवस्था करतात. येथे आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी रिक्षावाले आणि टॅक्सीवाले यांची बाजू घेतली आहे. कारण दोघांच्याही युनियन्स राजकीय पक्षांच्या आहेत. आज मंबईत २५,००० बेकायदा रिक्षा चालवल्या जात आहेत, अनेक टॅक्सीही रस्त्यावर कोणतीही कागदपत्रे नसताना चालवल्या जात आहेत. हे अर्थातच राजकीय नेत्यांना माहीत आहे, पण त्यांच्याकडून पैसे उकळता येत असल्यामुळे ते आणि पोलिसही गप्प असतात.

या चळवळीचा रेटा इतका असला पाहीजे की रिक्षा आणि टॅक्सी या दोन्ही सार्वजनिक वाहन व्यवस्थेमध्ये शिस्त यायला हवी. हे केवळ मुंबईपुरते रहता, ठाणे, नाशिक, पुणे आणि महाराष्ट्रात सर्वत्र व्हायला हवे. मुंबइंने फक्त मार्ग दाखवावा.

मुख्य म्हणजे, हे सारे इतर कोणीतरी आपल्यासाठी करेल, आपण रिक्षावाले, टॅक्सीवाले यांच्या दादागिरीपुढे मान तुकवावी असा विचार सामान्य माणसाने करू नये

__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___

0 comments:

sponsers