sponsers

Sunday, August 15, 2010

[GarjaMaharashtraMaza] पोलिटिशियन होण्याचा बिझिनेस

 

Source:- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6296830.cms
मगनभाईला आपल्या अकलेची लाज वाटली... 'आपण एक क्रोड कमवायला अख्खा लाइफ बरबाद केला... इनकम टेक्स बुडविला... कई लोकला टोपी घातली... पन साला हे मिनिस्ट

लोक जे करते ते आपल्याला कदी बी जमला नाय' याचा 'तेला अफसोस होत होता...'

अरे साला आदीच कुनी तरी बिझनेसचा आयडिया दिला असता तर साला आतापर्यंत क्रोडपती झाला असता ना.. ते दिल्लीत काय ते कोमन वेल्त गेम चाललाय ना... ते आपल्याला आदीच का कळले नाही... असे बडबडत तो डोक्यावर हात आपटून घेत होता...

अरे साला थोडा इनवेस्टमेंट करून हजार टायम प्रोफिट झाला असताना... अन साला काय बी करायचा नाय.. नुसता विटवर वीट ठेवायचा... स्टेडियमचा काम अर्धाच सोडून पैसा घेऊन गायब व्हायचा... नाय तर दीडशे रुपयेचा सोप डिस्पेन्सर १९०० रुपयेला सप्लाय करायचा... असा केवडा प्रोफिट झाला असता... साला मिनिस्टर लोकला बी पेटी खोका द्यायला काय वाटला नसता...

आपण सोताला बिझनेसमन म्हणवतो, पण साला इतका सादा आयडिया आपल्याला सुचत नाय.. ते मिनिस्टर लोकला सुचते.. असे पुटपुटत मगनभाई सारखे हळहळत होते.

आपण आता पोलिटिक्समद्देच जायला पायजे... हे त्यांना पटू लागले... 'कालबादेवीच्या पुडे कुठे तरी पोलिटिकल पाटीर्चा हाफिस हाय' असं त्यांना कळलं होतं... काळबादेवीत उतरायच्या ऐवजी पुढच्या आझाद मैदानाच्या स्टॉपवर ते उतरले अन् तडक रस्ता ओलांडून पोलिटिकल पाटीर्च्या बॅरॅककडे ते चालू लागले...

पोलिटिकल पाटीर्चा मेंबर झाला तर 'साला इलेक्शन लडवावे लागेल' हे त्यांना माहीत होते... पण इलेक्शन, त्याचा खर्च याचा भांडवली मेळ मनातल्या मनात घालण्यास त्यांनी सुरुवात केली... या भांडवलाचा फोट्टी पर्सेंटने होणारा इंटरेस्ट अन् मग त्याची करायची वसुली यांची लाल चोपडी त्यांनी मनातल्या मनात तयार केली होती...

या कॉमनवेल्थ गेमच्या तयारीत कुणाला किती मिळाले असतील याचा ताळेबंद त्यांच्या मनात तयार होत होता, पण जसजसे आकडे डोळ्यापुढे नाचू लागले तसे आपण किती 'बेवकुफ बिझनेसमन' आहोत याची जाणीव होऊन त्यांना स्वत:चीच लाज वाटू लागली...

पण आता आपण पोलिटिशियन होण्याचाच बिझनेस सुरू करायचा हे मात्र त्यांनी निश्चित केले..

-
चकोर

__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___

0 comments:

sponsers