स्वाइन फ्लूवरील 'फ्लूवीर' मेंदूवर परिणाम करते! मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) - दुष्परिणामांना घाबरून हजारो डॉक्टर्स आणि रुग्णालयीन कर्मचार्यांनी स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस घेण्यास लेखी नकार दिला. स्वाइन फ्लूच्या रुग्णांना देण्यात येणार्या 'फ्लूवीर' या औषधाचे दुष्परिणाम तर या लसीपेक्षाही भयंकर आहेत. हे औषध रुग्णाच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवरच परिणाम करते. हे माहिती असूनही हजारो रुग्णांना अंधारात ठेवून हे औषध दिले गेले. ऑसेल्टामिवीर फॉस्फेट रसायन असलेले 'फ्लूवीर' औषध कॅप्सुल आणि सिरपमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत 880 रुपये आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचारासाठी 75 मिलीग्रॅमच्या रोज दोन कॅप्सुल सलग 5 दिवस दिल्या जातात. इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी हा डोस कमी करून दिला जातो. डोस कितीही असला तरी पोटात मळमळणे, उलट्या, जुलाबा, श्वसनाचे विकार, असह्य पोटदुखी, डोकेदुखी, चक्कर येणे, कफ, थकवा, स्नायूंमध्ये तणाव, मेंदूला रक्त पुरवणार्या रक्तवाहिन्या अरुंद होणे असे गंभीर परिणाम होतात. इतकी माहिती असतानाही सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये 'फ्लूवीर' नावाचे हे विष रुग्णांना दिले जात आहे. रुग्णांना कॅप्सुल आणि सिरप मिळते. पण औषधाच्या पाकिटातील माहितीपत्रक मात्र रुग्णांच्या नातेवाईकांना दाखवलेही जात नाही. विक्रेत्यांनीच दिली दुष्परिणामांची माहिती रोशे आणि हितेरो ड्रग्ज लिमिटेड या औषध निर्मात्या कंपन्यांकडून हे फ्लूवीर औषध रुग्णालयांसाठी घेण्यात आले आहे. औषधाच्या पाकिटातील माहितीपत्रकात दुष्परिणामांचीही माहिती दिली गेली आहे. या औषधामुळे रुग्णांना त्वचा आणि लिव्हरचे आजार तसेच हेपॅटायटीसची लागण झाल्याचीही उदाहरणे आहेत. याचाही उल्लेख या पत्रकात कंपन्यानी केला आहे. गर्भवती स्त्रियांना हे औषध दिल्यास त्यांच्यासह होणार्या बाळासाठी धोकादायक ठरण्याची शक्यताही या कंपन्यांनी व्यक्त केली आहे. ही माहिती सविस्तरपणे न देण्याची काळजी मात्र या कंपन्यांनी घेतली आहे.
|
॥ निलेश पोटे ॥
|
0 comments:
Post a Comment