मटा ऑनलाइन वृत्त । लेह ढगफुटी आणि नंतर आलेल्या पुराने लेहमध्ये मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली. थ्री इडियट सिनेमाच्या क्लायमॅक्सचे शूटिंग जिथे झाले ती शाळा देखिल उद्ध्वस्त झाली. मात्र सिनेमातील रँचो उर्फ फुंगसुक वांगडू अर्थात आमिर खान ही शाळा पुन्हा उभी करणार आहे. त्यासाठी आवश्यक ती मदत देण्याची तयारी आमिरने दाखवली आहे. लेहमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा शाळेला फटका बसल्याचे वृत्त कळताच आमिर खानने शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद इलेडट यांना फोन केला आणि शाळेचे नेमके किती नुकसान झाले आहे याची माहिती घेतली. त्यानंतर शाळा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी काय करावे लागेल याचा अहवाल पाठवा मी आवश्यक ती मदत पुरवतो, असे आश्वासन आमिरने दिल्याचे मुख्याध्यापक प्रसाद यांनी सांगितले. लेह-मनाली हायवे पासून १५ किमी अंतरावर असलेल्या रँचोच्या शाळा लेहमध्ये असलेली एकमेव ग्रीन स्कूल म्हणून ओळखली जाते. मात्र सध्या शाळेत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे. कामकाज ठप्प झाले आहे. शाळेच्या कंप्युटर क्लासची पुरती वाताहात झाली आहे. पाणी आणि चिखलामुळे अनेक कंप्युटर बिघडले आहेत. मात्र रँचोने अर्थात आमिर खानने ही शाळा नव्याने उभी करण्याची खात्री दिली आहे |
0 comments:
Post a Comment