मच्छर अणि जखमा…
त्या दिवशी बुधवार होता..
कामावरून येउन घरी निवांतपणे टिव्ही बघत बसलेलो..
अणि तेवढ्यात काही मच्छर येउन चावायला लागले…
मी खुप प्रतिकार केला…अथक प्रयत्नानंतर सगले मारले…
खुप जखमा झाल्या…पण एक मात्र जिवंत पकडण्यात यश आले…
मी भारतीय न्याय्व्यवस्थेवर विश्वास असलेला माणूस…
म्हटले कायद्याचे सगळे सोपस्कार पार पडून त्याला योग्य ती कायद्याच्या
चौकटीनुसार शिक्षा देऊ…
त्याच्या सुरक्षेसाठी मी बराच खर्च केला,कारण कायद्यानुसार शिक्षा देण्यासाठी
त्याला जिवंत ठेवणे गरजेचे होते…
मी त्याच्यासाठी प्रथम महागडा पिंजरा आणला,
मग investigation सुरु केले…
काही पुराव्यांवरून कळाले की तो बाजुच्यांच्या घरातून आलेला…
तिथेच पोसून वाढलेला…त्यानेही सर्व गुन्हे काबुल केले…
पण बाजूचे काहीच काबुल करेनात…मग मी त्यांना काय्द्यानुसराच पुरावेही पाठवले…
सर्व काही माझ्या डोळ्यासमोर घडले असतानाही मी काही साक्षीदार तपासले…
त्यांचे जबाब घेतले…पुन्हा ते सगळे बाजुच्यान्ना पाठवले..
परत त्यांनी सर्व काही नाकारले…मी अजुन जोमाने जे माझ्यासोबत घडलेले…
डोळ्यादेखत..ते सिद्ध करण्यासाठी पण काय्द्यानुसराच…
जिवाचा आटापिटा करायला लागलो…
अणि एक दिवस लक्षात आले की या गोष्टीला आज वर्ष पूर्ण होत आहे…
इतके सगळे करून हातात काय होते??२-३ जबानी अणि ४-५ पुरावे???
तो मच्छर तर खाउन पिउन सुस्त झाला होता…
माझ्या जखमा तर तश्याच होत्या…ओल्या…
अणि आता तर तो मच्छर पण म्हणायला लागलेला की 'तो मी नव्हेच'????
त्या दिवशी मात्र एक गोष्ट शिकलो….....मच्छर असो वा कसाब…वेळीच चिराडला पाहिजे….
0 comments:
Post a Comment