sponsers

Wednesday, April 7, 2010

Re: [GarjaMaharashtraMaza] सह्याची Vidarbha Marathwada

 

Dear Rupesh,

Tumcha sagla mhanan eakdam manya aahe.. katu satya aahe.
Pan he lakshat theva hya weglya vidarbhacha aani marathwadyacha zenda jya netyani khandyawar ghetla aahe tynachya baddal tumchi mata kay aahet te pan spashta kara.
Tumchi talmal.. problems aamhi nakarat nahi..pan hya attachya veglya walya netyanchya kadun tumcha kadhich bhala honar nahi.
Paschim maharshtra khalokhal maharashtra cha Mukhya mantri pad Marathwadya kade hota.
nantar te vidarbha kade pan hota...kay zala?
aaj kalcha kuthlach prashan kharya arthane lokan sathi mandal jaat nahi.
mala eak saanga garib shetkaryan sathi kuthlya vidarbachachy netyani aaplya gharatla dila?
lokanchya bhavnana haat ghalun zindabad murdabad chya ghoshna denyat kay arth aahe.
1 tari vidarbhacha neta saanga jo aaj Soniya gandhina na jumanta weglya vidarbha sathi ladhtoy?
purvichya netyani indira gandhincha padar pakadla hota.
Tumhi chukiche nete niwdun dilet he khara nahi ka?
he nete swahachi tumbdi bhartayat he khara nahi kay?
himmat asel tar maratha vidarbhachya netyani swatahachi kahri ( nokar-chakar..khar..khote natewaik..aani sarv balglelya gotawlya sakat) sampatti jahir karavi!!!
Congress chay netrtwane sagla shandh netrutwa pudhe aanla...
aani Yashwant rao chavan aani Sharad pawarani swatahacha netrutwa motha karnya sathi sampurn maharashtracha bali dila...
tyacha parinaam tumchya sarkhach aamhi pan bhogtoy.
aahe koni koknaat sukhi?koknacha vikas kiti zala? nidan tumchya netayna khayla tari paise milale. kokansathi paise pan nahi milale...aani ajunahi nahi milat!!!


Regards,

Shailesh Joshi

--- On Wed, 7/4/10, Rupesh Rane <ruperi@gmail.com> wrote:

From: Rupesh Rane <ruperi@gmail.com>
Subject: [GarjaMaharashtraMaza] सह्याची मोहीम घेण्या पेक्षा विदर्भ मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रातून वेगळे का होण्याचा प्रयत्न करतात Vidarbha Marathwada [2 Attachments]
To:
Date: Wednesday, 7 April, 2010, 6:12 PM

 



---------- Forwarded message ----------
From: thanthanpal parbhanikar <thanthanpal@ gmail.com>
Date: 2010/4/7
Subject: सह्याची मोहीम घेण्या पेक्षा विदर्भ मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रातून वेगळे का होण्याचा प्रयत्न करतात Vidarbha Marathwada
To: dombavali <dombivalifast@ yahoogroups. com>, shailesh007rane@ yahoo.co. in,


सह्याची मोहीम घेण्या पेक्षा विदर्भ मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रातून वेगळे का होण्याचा प्रयत्न करतात याचा विचार कारणे आवश्यक आहे. आज महा.महणजे मुंबई,पुणे आणि पच्शिम महाराष्ट्रा यापुढे विकासाचा विचार कोणी नेता किंवा त्या विभागातील नागरिक सुद्धा करत नाही.
कोणतीही नवीन योजना,कॉलेज, शासकीय संस्था या महा. उघडण्याचे ठरले तर फक्त वरील भागाचाच विचार होतो. विदर्भ मराठवाड्यात मुलभूत सुविधा नाही म्हणून डावलले जाते.
विकसित भाग अधिकाधिक निधी स्वत; ओरबाडून घेतात. पुण्यात असंख्य शैक्षणिक संस्था असताना नवीन सरकारी शैषणिक प्रकल्पा करता मराठवाडा विदर्भाचा विचार न करता प्रकल्प पुण्यास टाकणे कसे सोयीचे आहे किंवा मागसभागात टाकणे कसे गैरसोयीचे आहे याचाच जास्त विचार नोकरशाह,राजकारणी करतात . आणि मागास भाग मागासच राहतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात होतात पण त्यांचा अभ्यास करणाऱ्या कमिशनर चे कार्यालय  नोकरशाच्या बायको मुलांच्या सोयी साठी पुण्यात उघडले जाते. हा उंटावरून शेळ्या हाकण्याचा उद्योग आम्ही का सहन करावयाचा ? राज्याचा मुख्यमंत्री मान्य करतो की मागास भागात सरकारी अधिकारी, डॉक्टर्स जाण्यास तय्यार नाहीत. आम्ही मजबूर आहोत. आता त्या करता कायदा करणार आहेत म्हणे? मग तुमच्या बरोबर लंगडी करत संसार आम्ही का म्हणून करायचा .
रस्ते,पाणी,वीज याबाबत सुद्धा हेच होते. हा भाग ११-१२ तास अंधारात असतो पण मुंबई पुण्यात मात्र दिपौत्सव चालू असतो. आंतरराष्ट्रीय नावाखाली मुंबई चे  चोचले आम्हाला अंधारात तेवून तहानलेले  जर पुरवत असाल तर आम्ही वेगळा विचार तर करणारच ना. आम्हाल पाणी ८/१० मैलां वरून आणावे लागते,याचा तुम्ही कधी विचार केलात. एक दिवस नळ नाही आला तर आपला टी.व्ही  समोर धिंगाणा चालू असतो. तुम्हाला फक्त तुमचेच पश्न अडचणी महत्वाच्या वाटतात मग आम्ही  वेगळे होण्याचा विचार केल की अखंड एकसंघ महाराष्ट्रा ची आठवण येते. गेल्या चाळीस वर्षात मराठीचे राजकारण करून देखील मुंबई तरी कोठे महाराष्ट्राची राहिली. मुंबई ही ना मराठी माणसाची ना बिहारी,ना गुजराथी ना मद्रास च्या लोकांची राहिली आहे. ती तर  अवैध बांधकाम करणारे बिल्डर, झोपडपट्टी दादा,गुंड मवाली गुत्तेदार नगरसेवक यांची झाली आहे हे कटू सत्य तुम्ही का स्वीकारत नाही.आम्ही  तुमच्या स्वार्था साठी आमचा, आमच्या विकासाचा बळी  का द्यावा? याला एकाधे कारण तुम्ही सांगू शकाल का?
शहरातील या हावरटपणा मुळे आमच्या तोंडाचा घास जर कोणी हिरावून घेत असेल तर तुमच्या अखंड महा. जबरदस्ती चे आम्ही ओझे का उचालावयाचे . पंजाब पासून हरियाना वेगळा झाल्यावर त्या राज्याचा विकास झपाट्याने झाला. आज आंध्रात आणि इतर राज्यात सुद्धा मागास भागात सुद्धा वेगळेपणाची वाढीस लागत आहे, हे आपणास मिडिया मार्फत समजलेच असेल.
तुमची वृत्ती म्हणजे जुन्या जुनाट विचाराच्या  एकत्र कुटुंब प्रमुखा सारखीच आहे. कोणी वेगळ राहण्याचा निर्णय घेवू पाहणाऱ्या तरुणास बंडखोर ठरवून त्याच्या मार्गात अडथळे आणावयाचे , भावनिक नात्याच्या आधार घेत black मेल कारणे , त्यास त्रास देणे, एकत्र राहणाचे काल्पनिक फायदे सांगणे असा प्रकार करत आहात. काळा बरोबर मुंबईत तुम्ही सख्खे भाऊ भाऊ एकत्र राहत नाही तर one room kitchen flat घेवून जन्मदात्यास वाऱ्यावर सोडून राजाराणीच्या संसारात मग्न असतात. पण म्हातारपणी तुमची मुले जेंव्हा तुम्हाला सोडून जातील तेंव्हा तुम्हास मायबापाचे दुख: समजेल. स्वतः; ला एक न्याय आणि आम्हाला दुसरा न्याय असे दुप्पटी वागणे झाले
कोणी बाबा आमटे,डॉ. अभय बंग राणी बंग यांच्या करता काम करत असतात तर तुम्ही तुमची नोकरशाही त्यांनाच खोटे पाडण्याचा उद्योग करतात. साहित्य संमेलना करता तंबाखूची जाहिरात घेण्या एव्हढे तुम्ही संवेदनाहीन झालात. या विरुद्ध डॉ. अभय बंग यांनाच आवाज उठवावा लागला. पुण्या मुंबईतील लोकांना बाबा आमटे अभय  बंग फक्त स्वत:ची समाजसेवेची नसलेली  तळमळ मिरवण्या पुरता लागतात. कधी मुंबई बाहेर पडलात तर फक्त मोज्जमाज कारणे शिर्डी दर्शन या पुढे जात नाही.
आजच मिडिया द्वारे नक्षलवाद्यांनी छत्तीसगढ मध्ये जवानांना मारल्याची बातमी जेवण करत पाहत असाल आणि देशात अंतकवाद कसा फेलावला सरकारने कठोर कारवाई करावी म्हणून लोकल ट्रेन मध्ये  वांझोट्या चर्चा जोरजोरात  करत  असाल. पण हा नक्षलवाद का निर्माण झाला याचे आपल्याला कांही देणे घेणे नाही. कारण तुमची पोटे भरलेली आहेत. त्या प्रांतात आपलेच देश बांधव  कुपोषणाने भुके पोटी मरत आहेत याची तुम्हाला कल्पना तरी आहे. गेल्या साठ वर्षाचा विकास फक्त तुमच्या INDIA  पुरता झाला बाकी भारत कोणत्या भयाण अवस्थेत जगत आहे याची तुम्ही कधी काळजी केली आहे का?
जावू द्या तुमच्या वागण्याचा कोळसा उगाळावा तेव्हढा काळा आहे . आम्ही सुसंकृत पणे आमच्या वेगळ्या राज्या ची मागणी करत आहोत आपण समजूतदार पाने एकली तर ठीक . नाही तर आम्हास सुद्धा इतर मार्ग अंमलात आणावे लागतील. आणि हो ! वेगळे झालो तरी आम्ही कांही उर्दू, कन्नड तमिळ बोलणार नाही मराठीच बोलणार. मुंबईच्या मराठीच्या पोकळ राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला. गेल्या चाळीस वर्षात स्वत: ची करोडो रुपयांची मालमत्ता जमा करण्या पलीकडे काय केले? मराठीच्या विकासा साठी मराठीच्या शब्द संग्रह वाढविण्या साठी काय केले. आधुनिक शाखां करता बँक, मेडिकल, संगणक विद्याना साठी लागणारा शब्द साठा आहे कोठे तुमच्या कडे?
तर दूसरीकडे बेळगाव आपल्यापासून तोडण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. आपण कोणत्या जगात वावरत आहात बेळगाव कधीच महाराष्ट्रा पासून वेगळे झाले बेळगाव चे घोंगडे बीजात ठेवण्यात राजकारणी लोकांचा स्वार्थ: आहे त्याचे कांही होणार नाही उगीच अश्रू ढाळू नका, बेळगाव आहे त्या राज्यात विकास करू द्या ते कांही काश्मीर सारखे भारताचे राज्य नाही. आणि आहेत त्या भागाचा विकास करा .नाही तर लवकरच मुंबई चंदीगढ प्रमाणे केंद्रशासित होईल नंतर हाती कांहीच उरणार नाही. पणे



 
2010/4/6 शैलेश ऱाणे <shailesh007rane@ yahoo.co. in>
 


१ मे (महाराष्ट्र) दिनाबद्दल

सप्रेम जय महाराष्ट्र....

१ मे (महाराष्ट्र) दिनाबद्दल बरेच चांगले विषय मांडले गेले. पण मला आणि माझ्या कही मित्रांनी असा विचार केल आहे की,--- १ मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा करतो कारण की १ मे १९६० रोजी मुंबई सह अखंड महाराष्ट्र या राज्याची स्थापना झाली म्हणून.

पण एका गोष्टीच वाईट की आपण एकीकडे ५० वर्षाचा महोस्तव (suvarna mahotstav) साजरा करत असताना आपल्या महाराष्ट्रातील विदर्भाला वेगळ होण्याचे वेध लागले आहेत आणि आपले चव्हाणरावांना वरून आदेश मिळत नाहीत म्हणून काहीही बोलत नाहीत.

तर दूसरीकडे बेळगाव आपल्यापासून तोडण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु आहेत.


पण मग आपण काय करतो आहोत फ़क्त नेटवर चर्चा करतो आणि आपणही विसरतो, तर ह्या १ मे रोजी आपण सह्या घेण्याची मोहिम हाती घेउया आणि जमा झालेल्या सह्या ह्या आपल्या माननीय मुख्यमंत्री 'अ' शोक 'च' व्हाण यांना देउयात किंवा तय सह्या घेउन आपण काय करू शकतो यावर विचार करुयात.....



The INTERNET now has a personality. YOURS! See your Yahoo! Homepage.



--
Thanks & regard,

Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthan pal.blogspot. com



The INTERNET now has a personality. YOURS! See your Yahoo! Homepage.

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Do More for Dogs Group. Connect with other dog owners who do more.


Welcome to Mom Connection! Share stories, news and more with moms like you.


Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.

.

__,_._,___

0 comments:

sponsers