कॉम्प्युटरमध्ये एखादे सॉफ्टवेअर कसे लोड ( Install ) करावे ?
(१) आपण जे सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये लोड करणार आहात त्याची जर Original सीडी असेल तर ती कॉम्प्युटरमध्ये टाकताच एक प्रोग्राम आपोआप सुरु होईल किंवा (२) जर एखाद्या सीडी असलेले एखादे सॉफ्टवेअर जर तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये इंस्टॉल करायचे असेल पण जर सीडी कॉम्प्युटरमध्ये टाकताच त्यासाठीचा प्रोग्राम आपोआप सुरु झाला नाही किंवा (३) जर एखाद्या सॉफ्टवेअरच्या फाईल्स आपल्या कॉम्प्युटरमध्ये आधिच कॉपी केलेल्या असतील व आपणास फक्त तो सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरमध्ये लोड करायचा असेल तर ..... सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये लोड करण्याची म्हणजेच इंस्टॉल करण्याची क्रिया खाली दिली आहे. १) त्या सॉफ्टवेअरच्या फाईल्स सीडीवर अथवा कॉम्प्युटरमध्ये ज्या फोल्डरमध्य असतील तो फोल्डर उघडा. २) त्या फोल्डरमध्ये तुम्हाला अनेक फाईल्स दिसतील त्यातील कुठल्याही फाईलवर डबल क्लिक ( Double Click ) करु नका. ३) त्याच फोल्डरमध्ये तुम्हाला ' Setup ' नावाची फाईल आढळेल, लक्ष्यात असू द्या की तीथे एकापेक्ष्या जास्त ' Setup ' नावाच्या फाईल्स असण्याची शक्यता आहे. ४) जर त्या फोल्डरमध्ये ' Setup ' नावाच्या एकापेक्ष्या जास्त फाईल्स असतील तर ज्या फाईलच्या पूढे असे किंवा चित्र असेल तीलाच ( फक्त तीलाच ) डबल क्लिक ( Double Click ) करा. टिप : बर्याच वेळा सॉफ्टवेअर बनविणारे इतरांना त्रास नको म्हणून सॉफ्टवेअरसाठी लागणार्या सर्व फाईल्सची मिळून एकच फाईल बनवितात अशावेळी ते त्या एकाच फाईलीला त्या सॉफ्टवेअरचेच चित्र ( Icon ) देतात. अशावेळेस त्याच फाईलीवर डबल क्लिक ( Double Click ) करावे.
• सर्वसाधारणपणे सर्व सॉफ्टवेअर्स लोड करण्याची क्रिया सारखीच असते, म्हणजे त्या सॉफ्टवेअरच्या फाईलीवर डबल क्लिक ( Double Click ) केल्यानंतर एक प्रोग्राम सुरु होतो. त्यामध्ये आपण लोड करीत असलेल्या सॉफ्टवेअर नाव असते. आता काहिही न करता सरळ खाली दिलेल्या ' Next > ' या बटणावर क्लिक करा.
• अशाप्रकारे एक-दोन वेळा अजून ' Next > ' या बटणावर क्लिक करावे लागेल. • पूढे त्याच चौकोनात त्या कॉम्प्युटरमध्ये आधिच लोड केलेल्या सॉफ्टवेअर्स यादी दाखवेल व वर आपण लोड करीत असलेल्या सॉफ्टवेअर नाव असेल, याचा अर्थ आपण लोड करीत असलेले सॉफ्टवेअर या यादमध्ये जमा होईल. आता खालिल ' Next ' या बटणावर क्लिक करा.
• आता आपल्यासमोर इंस्टॉलेशनची प्रक्रिया होताना दिसेल.
• बस्स. इतकेच करायचे आहे, थोड्याचवेळात आपल्यासमोर त्याच चौकोनात ' आपले सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये लोड झाले आहे ' असा संदेश येईल आणि ताच चौकोनात खाली असलेल्या
• आता तो सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये लोड झाला असेल, तपसण्यासाठी विंडोजमधिल ' Start > Programs ' वर क्लिक करा, आपणास तीथे आपण लोड केलेल्या सॉफ्टवेअरचे नाव दिसेल.
| |
---|---|
Best Regards,
Mahesh Bhoir
www.agrizatka.
www.maheshbhoir.
www.maheshbhoir.
+91 9870560065
0 comments:
Post a Comment