'मोरया 2010' संकेतस्थळ रुजू; 'साम'वर 'बाप्पा मोरया' कार्यक्रम
पुणे - गणेशोत्सवाची धूम "साम' मराठी वाहिनी आणि "ई सकाळ' या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. "बाप्पा मोरया' हा खास कार्यक्रम गणेशोत्सवानिमित्त "साम' मराठीवर सुरू झाला असून, 'मोरया2010' हे खास संकेतस्थळ ऑनलाइन गणेशभक्तांच्या सेवेत रुजू झाले आहे.
"साम' मराठीवरील "बाप्पा मोरया' हा विशेष कार्यक्रम रोज सकाळी दहा ते साडेदहा, रात्री नऊ ते साडेनऊ आणि रात्री अकरा ते साडेअकरा या वेळात प्रसारित होत आहे. गणेश विसर्जनापर्यंत (ता. 22 सप्टेंबर) "बाप्पा मोरया'मध्ये रोज आगळ्या-वेगळ्या गणेशभक्तांची भेट प्रेक्षकांशी घडवून आणली जात आहे. राज्यभरातील गणेशोत्सव, देखाव्यांतील वेगळेपण याबरोबरच प्रथितयश कलावंतांच्या गणेशोत्सवाचा अनुभव प्रेक्षकांना घरबसल्या घेता येणार आहे.
"मोरया 2010' या संकेतस्थळावर गणेश माहात्म्य, गणेश पूजन, सेलिब्रिटी गणेशोत्सव, घरगुती आरास, चविष्ट मोदकांसह पंचपक्वानांची साहित्यकृती, अष्टविनायक दर्शन, महाराष्ट्रातील तसेच देशोदेशींचे गणपती अशी 10 स्वतंत्र दालने आहेत. मंत्रपुष्पांजली, अथर्वशीर्ष, षोडशोपचार पूजा, विविध आरत्या ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात या संकेतस्थळावर आहेत. याशिवाय अभिनेता मकरंद अनासपुरे, अंकुश चौधरी, गायक त्यागराज खाडिलकर, ऊर्मिला धनगर, नेहा राजपाल आदींनी सांगितलेल्या त्यांच्या गणेशोत्सवाच्या आठवणींचा खजिनाही ऑनलाइन समुदायासाठी येत आहे.
संकेतस्थळाचा पत्ता : http://www.esakal.in/moraya2010
'हटके' खिरापती
गणेशोत्सवाच्या काळासाठी खास "हटके' खिरापती "साप्ताहिक सकाळ'ने सादर केल्या आहेत. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचे गणेशोत्सवाबद्दलचे चिंतन आणि प्रख्यात "गणेश चित्रकार' अरुण दाभोळकर यांनी रेखाटलेली चित्रे व त्यांचे मनोगत "साप्ताहिक सकाळ'ने उत्सवानिमित्त वाचकांसमोर आणले आहे.
Source:- http://72.78.249.107/esakal/20100910/4783791443479653295.htm
0 comments:
Post a Comment