पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबातपहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबात सगळं जग एकवटून येत.. मनातली रडगाणी वाहून नेत, नविन सूरातील तराणे गातं.. प्रत्येक थेंबात तेच पाणी, पावसाची तिच जूनी गाणी पण शब्दाविना आकाशाशी आनंदाची देणी घेणी.. मनामधलं मळभ जणू धाव घेउन आभाळ गाठत, अन नभातील इंद्रधनु परत मनात बस्तान थाटतं.. डोळ्यामधल पाणी सुद्धा वाहण आता विसरुन जातं, जलधारांच्या वेगाबरोबर दुःख जणु ओसरुन जातं.. मातीच्या या सुवासासारखं दुसरं काही असत नाही, कुपी मधल्या अत्तराला मन आता फ़संत नाही.. पावसाचे ते पाणी घराच्या छतावर हळुवार आपटत असते, आपल्यातल्या बावरलेल्या बाळाला जणु, आई प्रेमाने थोपटत असते.. from - kavitasangraha-blogspot Leave "something" for"someone" but never leave"someone" for "something" bcuz.in life "something" will leave you but "someone" will always be with you |
__._,_.___
MARKETPLACE
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment