मी गणपती बोलतोय
होय होय तोच मी….
आत्ता नुसता बाप्पा राहिलो नाही
विट आणलात तुम्ही मला
दारूच्या वासाने
ढोल ताशाने
उधळलेल्या गुलालाने
हव्यासापोटी सारं केलंत
डोक्यावरुन नेता नेता
भल्यामोठ्या ट्रॉलीवरुन
क्षणांत ढकलून दिलंत
वेदना होत नसल्या तरी
जरा ठेवा जाणीव
वाढलेल्या माजात दिसत्येय
हल्ली भक्तीची उणीव
अस्ताव्यस्थ पडलेलं शरीर
माझं किनारी लागावं
आणखी किती वर्षे मी
पाण्यात उभं राहून बघावं
हटके करावं म्हणून
दुस-या दिवशी होतं विसर्जन
फ़ेसाळलेल्या बाटल्या
आणि धिंगाण्याचं प्रदर्शन
बस्स…सीमा ओलांडली
माझ्या सहनशिलतेची
लाज वाटतेय मला
विघ्नहर्ता असल्याची
बिघडलेलं स्वरुप तरी
मी काही करु शकत नाही
बाजार मांडलेला माझा
मी उघड्या डोळ्यांनी पाही
………..अमरीश अ. भिलारे.
__._,_.___
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment