ग्रुप मेम्बर्स, नमस्कार एक माहिती तुमच्या सर्वांच्या निर्देशनास आणायची आहे. जर आपण airtel ह्या कंपनीचे ग्राहक आहात तर ह्या कंपनीच्या आश्वासनानुसार पूर्णतः मराठीतून संदेश प्रणाली विकसित केली गेली नाही. जर प्रत्यय घ्यायचा असेल तर कंपनी च्या १२१ किव्वा १२१३१ ह्या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधा .. " airtel मध्ये आपले स्वागत आहे" हे सुरवातीचे वाक्य वगळता बाकी सर्व रेकॉर्ड्स हिंदी मधून वाजतात १९८ वर जर कुठल्याही प्रकारची mobile संदर्भात तक्रार करायला जाल तर, तिथे हि आपले स्वागत हिंदीनेच होईल. मी जेव्हा त्या ओपरेटोर शी मराठी तून विचारणा केली तर तिने चक्क मला मराठी येत नाही असे सांगितले व १९८ वर संपर्क करावयास सांगितला व तेथे मला मराठीतून पर्याय मिळतील असे सांगण्यात आले पण वर नमूद केल्याप्रमाणे तिथे हि हेच.. मला कुठल्याही भाषेचा अपमान करायचा नाही पण त्या बाईने चक्क मला मराठी येत नाही तेव्हा तुमीच हिंदीत बोला असा सूर लावला नि मी भूमिका ताठ ठेवताच १९८ वर फोन करून बोला असे सांगून ठेवून पण दिला.. नक्की ह्याला काय म्हणायचे ? ॥ निलेश पोटे ॥ |
Tuesday, September 7, 2010
एक माहिती तुमच्या सर्वांच्या निर्देशनास आणायची आहे
Posted by pooja at 1:54 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment