अभिप्राय- मॅन्युअल कोण वाचणार??
By Bokya Satbande on Wednesday, July 28, 2010
सध्या फोटोग्राफी शिकायला सुरूवात केली आहे. त्यासाठी आवश्यक असलेली एक लेन्स मी मागवून घेतली. एका आकर्षक चामड्याच्या बटव्यात छानपैकी पॅक केलेली ती लेन्स उघडल्यावर टपकन आतलं बहिर्गोल भिंग माझ्या हातात आलं. नशीब!… पलंगावर बसले होते. खुर्चीत बसलेली असते, तर… नको! कल्पनाही करवत नाही.
तर, ते भिंग हातात आल्यावर कुतुहलाने मी ते भिंग हातात घेऊन सर्व लहान लहान वस्तू कशा मोठ्या मोठ्या दिसतात, ते पाहून लहान मुलासारखं कौतुक करून घेतलं. मग मोठं झाल्याची जाणीव झाली आणि लेन्सकडे मोहरा वळवला. एका बाजूचं झाकण काही निघता निघेना. असं जाम घट्ट बसलं होतं की एकवेळ मुरंब्याच्या बरणीचं झाकण सुद्धा चटकन निघालं असतं. बराच वेळ त्याच्याशी झटापट केल्यावर मला ज्ञानप्राप्ती झाली की लेन्सच्या इतर भागांसारखं हे झाकण धातूचं नसून रबराचं आहे, फिरकीचं नाही. मी ते झाकण उचकलं आणि अलगद माझ्या हातात घेतलं. सर्व पार्ट्स सुटे सुटे केले आणि आता सर्व लेन्स व्यवस्थित बघितल्याचं समाधान मला मिळालं.
This is a preview of अभिप्राय- मॅन्युअल कोण वाचणार??. Read the full post (290 words, 3 images, estimated 1:10 mins reading time)
0 comments:
Post a Comment