By Bokya Satbande on Wednesday, July 28, 2010
Filled Under: ईतर साहित्य
dfdfdfd
Reading time: < 1 minute
वर्ष होते १९८४. पुण्यात पदव्युत्तर शिक्षण घ्यायची संधी आणि महानगराची भीती अशा दोन कुबड्यांवर लंगडत मी पुण्यात आलो. संपूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत पहिले काही दिवस गेले. जन्माने पुणेकर नसलेल्यांबद्दलची पुणेकरांची तुच्छता समजून घेण्यात नंतरचे काही दिवस गेले. त्यानंतर वर्गातल्या सहकार्यांनी त्यांच्या गप्पांमधे सहभागी व्हायची परवानगी दिली. त्यांच्या गप्पांमध्ये 'अरे, आज स्कॅन्डल इन बोहेमिया वाचली…',' नेव्हल ट्रेटीला तोड नाही…', 'क्रीपिंग मॅन काहीतरीच आहे हं…', 'माझी आवडती म्हणशील तर यलो फेस…' असं काहीतरी त्यांचं बोलणं सुरु असे. एकदा धाडस करुन हे काय आहे असं विचारल्यावर हे सर आर्थर कॉनन डॉईल यांच्या शेरलॉक होम्सच्या कथांबद्दल आहे हे कळालं. 'कम्प्लीट शेरलॉक होम्स' हे त्या वेळी शंभर रुपयांना मिळणारं पुस्तक त्या वेळी आमच्या वर्गातल्या एका मुलाकडं होतं, आणि ते असं आळीपाळीनं फिरत असे. होम्सकथांची मी आजवर भाषांतरं वाचली होती. मुळातून होम्सकथा वाचणं हे आपल्याला पेलणारच नाही अशी जवळजवळ खात्रीच होती. मग एकदा कधीतरी ते खूप लोकांच्या हातांखालून गेलेलें पुस्तक माझ्या हाती आलं. 'डॉग इयर्ड' म्हणतात तसं झालेलं. ते वाचायला घेतलं आणि त्यात पार हरवून गेलो. इंग्रजीशी परिचय होता, पण ही इंग्रजी म्हणजे भलतीच होती. होम्सही माहितीचा होता, पण या पुस्तकातला होम्स वेगळाच होता. मग झपाटल्यासारखा ते उसनं घेतलेलं पुस्तक वाचत राहिलो. कधीतरी हातात पैसे आले, तेंव्हा स्वतःची प्रत विकत घेतली. मग जेंव्हा जेंव्हा शक्य झालं , तेंव्हा लोकांना या पुस्तकाच्या प्रती भेट म्हणून दिल्या. होम्सकथा पुन्हापुन्हा वाचल्या, त्यांच्यावर चर्चा झाल्या, एकूण आनंदीआनंद झाला.
0 comments:
Post a Comment