नमस्कार ! सर्वांनाच इतिहासाचे आकर्षण वाटत असते.आणि हा इतिहास आपल्याला भेटतो शब्द, चित्र वा प्रत्यक्ष ऐतिहासिक वास्तू-दर्शनातून.पण कधीही,कोणत्याही वेळी मनपसंत स्थितीत एका जागी बसूनही इतिहासात आपण मनसोक्त भ्रमंती करू शकतो ती केवळ पुस्तकामुळेच ! आज इतिहास-ग्रंथांविषयी वाचलेल्या दोन वार्ता.. आनंदवार्ता !!तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठीच तुमच्या टपाल खिडकीवर ही टकटक....! पहिली वार्ता: १९८० मध्ये शिवपुण्यतिथीच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने प्रकाशित झालेला 'शककर्ते शिवराय ' हा द्विखंडी ग्रंथ पुन्हा प्रकाशित होतो आहे.श्री. विजय देशमुख लिखित हा द्विखंडी शिवचरित्रग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीत केवळ रु. ८००.०० या नोंदणीशुल्कात उपलब्ध होणे ही आनंदवार्ताच नाही का? तर मंडळी त्वरा करा आणि नोंदणीशुल्क भरा. अंतिम दिनांक :- २५ जुलै संपर्क :- छत्रपती सेवा प्रतिष्ठान. दूरध्वनी :- ०७१२-२२९०९८६, ९७३००७८२५९,९९७५०१९०७१,९८६७५६८२३५,९८२०९५०९३२. संकेतस्थळ :- नोंदणी करण्यासाठी अधिक प्रेरणा :- नोंदणीकर्त्यांना 'महाराजांच्या मुलखात' ही ग्रंथभेट विनामूल्य... ! दुसरी वार्ता : आणखी एक शिवग्रंथ. गजानन भास्कर मेहेंदळे लिखित "शिवछत्रपतींचे आरमार" या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन. स्थान: सु.ल. गद्रे सभागृह, महाराष्ट्र सेवा संघ,मुलुंड(पूर्व), मुंबई. दिनांक : २० मे , गुरुवार सायं ६.०० वाजता. संपर्क : परम मित्र पब्लिकेशंस , ०२२-२५४४७९४८ , ९९६९४९६५३४. बाकी क्षेम.तुमचेही असेलच, असोही. सध्या तुम्ही काय वाचताय? लिहिताय? कळवाल? आपला , प्रमोद बापट. |
__._,_.___
MARKETPLACE
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment