मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील जिवंत पकडलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा झाली तरी त्याला गळ्यात प्रत्यक्ष फास अडकायला बराच वेळ आहे. त्याचा खटला यानंतर हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात आणि मग राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज म्हणून जाईल. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने फाशी कायम ठेवल्यानंतर राष्ट्रपतींकडे हा अर्ज गेल्यावर त्यावर लगेच सही होईल का? हे कोणालाच सांगता येणार नाही. कारण आधीच २९ जण असे आहेत, की ज्यांना सुप्रीम कोर्टाने फाशी देऊनही अद्याप फाशी दिलेली नाही.
फाशीच्या प्रतिक्षेत असणा-यांची यादी पुढीलप्रमाणे...
मुरुगन,संथान व अरिवू (तामिळनाडू)
१९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या केल्याबद्दल
दयेचा अर्ज - २०००
देवेंद्रपाल सिंग (दिल्ली)
१९९३ मधले दिल्लीतील बॉम्बस्फोट
दयेचा अर्ज - २००३
सायमन व आणखी तिघे (कर्नाटक)
१९९३ मध्ये २२ जणांची हत्या केल्याबद्दल
दयेचा अर्ज - २००४
मोहमद अफजल गुरू (दिल्ली)
२००१ मधला संसदेवरील हल्ला
दयेचा अर्ज - २००६
गुरमित सिंग (उत्तर प्रदेश)
१९८६ साली उत्तर प्रदेश येथे १७ जणांची हत्या
दयेचा अर्ज - २००७
सोनिया आणि संजीव (हरियाणा)
२००१ साली कूटुंबातील व्यक्तींना मारले
दयेचा अर्ज - २००७
श्याम मनोहर व आणखी पाच लोक (उत्तर प्रदेश)
१९९० मध्ये उत्तर प्रदेश येथे पाच लोकांची हत्या
दयेचा अर्ज - १९९८
र्धमेंद्र व नरेंद्र यादव (उत्तर प्रदेश)
१९९४ मध्ये उत्तर प्रदेश येथे पाच लोकांची हत्या
दयेचा अर्ज - १९९९
पिआरा सिंग व आणखी तीन लोक (पंजाब)
१९९१ मध्ये पंजाबमध्ये १७ जणांची हत्या
दयेचा अर्ज - १९९७ आणि २००३
शोभित चामर (बिहार)
१९८९ मध्ये बिहारमध्ये सहा लोकांची हत्या
दयेचा अर्ज - १९९८
मोहन आणि गोपी (तामिळनाडू)
१९९३ मध्ये तामिळनाडूत दहा वर्षाच्या मुलीची हत्या
दयेचा अर्ज - १९९९
मोलायी राम आणि संतोश (मध्यप्रदेश)
मध्यप्रदेशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार व हत्या १९९६
दयेचा अर्ज - २०००
धरमपाल (हरियाणा)
१९९३ मध्ये हरियाणात ५ जणांची हत्या
दयेचा अर्ज १९९९
महेंद्र नाथ दास (आसाम)
१९९६ मध्ये आसाममध्ये जामिनावर असताना हत्या
दयेचा अर्ज - २०००
एस बी पिंगळे (महाराष्ट्र)
१९९१ मध्ये दोघांची हत्या
दयेचा अर्ज - २००१
जय कूमार (मध्यप्रदेश)
१९९७ मध्ये गरोदर वहिनीची हत्या
दयेचा अर्ज - १९९९
सुरेश आणि रामजी (उत्तर प्रदेश)
पाच लोकांची हत्या
दयेचा अर्ज - २००२
शेक मिरन आणि आणखी दोघे (तामिळनाडू)
१९९४ मध्ये तामिळनाडून एकाची हत्या
दयेचा अर्ज - २०००
प्रवीण कुमार (कर्नाटक)
१९९४ मध्ये कुटुंबातील चार जणांची हत्या
दयेचा अर्ज - २००४
सतीश (उत्तर प्रदेश)
२००१ मध्ये मुलीची हत्या
दयेचा अर्ज - २००७
सुशिल मुरमू (झारखंड)
१९९६ मध्ये नऊ वर्षाच्या मुलाचा बळी
दयेचा अर्ज - २००४
सैबाना (कर्नाटक)
१९९४ मध्ये कुटुंबाची हत्या
दयेचा अर्ज - २००७
कुनवर बहाद्दुर सिंग आणि करण बहाद्दुर सिंग (उत्तर प्रदेश)
१९९९ मध्ये पाच जणांची हत्या
दयेचा अर्ज - २००५
ललीया डुम आणि शिवलाल (राजस्थान)
१९९९ मध्ये तीन लोकांची हत्या
दयेचा अर्ज - २००४
जाफर अली (उत्तर प्रदेश)
पत्नीसह पाच मुलींची हत्या
दयेचा अर्ज - २००६
बंडू बाबुराव तिडाके (कर्नाटक)
२००२ मध्ये अल्पवयिनाची हत्या
दयेचा अर्ज - २००७
0 comments:
Post a Comment