दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई
संयुक्त कुटुंबपद्धती झाली. आई-बाबा करिअरिस्टिक झाले आणि लाडका छकुला एकटा पडला. संध्याकाळी आईबाबांना बिलगण्यासाठी तो अधीर झाला. अंगाई गातागाता थोपट नयासाठी प्रेमाचा हात शोधू लागला. पण, तो हात त्याच्या डोक्यावरून कधीच फिरला नाही. मग, तो हिरमुसला. अबोल, एकलकोंडा झाला.
सीमा आणि अभय नोकरीसाठी दिवसभर बाहेर. चार वर्षांचा त्यांचा, छकुला मोहित पाच महिन्यांचा असेपर्यंतच त्याला आईचा सहवास मिळाला. लगेचच सीमाला ऑफिस जॉइन करायचं असल्याने मोहितला पाळणाघरात ठेवावं लागलं. रात्री सात-आठ वाजता केवळ दोन-तीन तासांसाठीच त्याला आपल्या आईबाबाचा सहवास मिळायचा.
मोहित दुसरीला गेला. सीमाला मोहितच्या क्लासटिचरचा फोन आला. 'अॅकॅडमिक अॅण्ड सोशल प्रोग्रेसबाबत मोहित मागे आहे. तो कुणाशी बोलत नाही. चीडचीड करतो. एकटा राहतो. खेळकर नाही.' अशा अनेक तक्रारींचा पाढा क्लासटिचरने सीमासमोर वाचला. मोहितमध्ये सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे असा निष्कर्ष काढून सीमा आणि अभयने स्पेशल एज्युकेटरचा सल्ला घ्यायचं ठरवलं.
मोहितच्या समस्येला 'तुम्ही दोघंच जबाबदार' असल्याचं स्पेशल एज्युकेटरने सांगितल्यानंतर सीमा आणि अभयला प्रचंड धक्का बसला. पण, उत्तरंही अचूक होतं!
मूल ज्या वातावरणात वाढतं त्याचा त्याच्या जडणघडणीवर, व्यक्तीमत्त्वावर खूप परिणाम होतो. विचार करण्याची पद्धत, भावनिकता, सामाजिकता आणि बुद्धीमत्ता यावरून त्याचं व्यक्तीमत्त्व घडतं. घरात खेळीमेळीचं किंवा माणसांनी भरलेलं वातावरण असेल तर मूल सोशल, बोलकं बनतं पण, तेच जर त्याच्या सोबतीला कोणीच नसेल तर तो एकलकोंडा होतो.
मोहितच्या बाबतीत हेच घडलं. घरात एकटं राहिल्याने त्याला चारचौघात मिसळण्याची सवय लागलीच नाही. मुलांमध्ये खेळण्यासाठीही त्याला संकोच वाटू लागला. तो अबोल झाला. पाचव्या महिन्यापासूनच आईच्या सहवासाला तो मुकला. अभय असूनही नसल्यासारखा.
मोहितसारखीच समस्या असणाऱ्या पालकांची संख्या सध्या वाढतेय. पण, या परिस्थितीस पालक स्वत:च जास्त जबाबदार असतात. नोकरीच्या नादात नकळतपणे मुलाच्या जडणघडणीकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. सध्याच्या परिस्थितीत घरखर्च चालवायचा म्हणजे दोघांनाही नोकरी करणं महत्त्वाचंच. जास्त काळासाठी आईला सुट्टीही घेता येत नाही. त्यात संयुक्त कुटुंबपद्धती. त्यामुळे मुलाला पाळणाघरात ठेवण्याव्यतिरिक्त पर्याय राहत नाही. परिणामी, विशिष्ट वयामध्ये आईवडिलांचा किंवा इतर कुटुंबियांचा सहवास न मिळाल्यास मुलाच्या भावनिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीवर वाईट परिणाम होतो, असं स्पेशल एज्युकेटर सई म्हात्रेंनी सांगितलं.
परिणाम एकटं राहणं, उशीरा बोलायला लागणं, अबोल होणं, चारचौघात असूनही घुम्यासारखं राहणं, भावना व्यक्त करता न येणं, विश्वास ठेवण्याची वृत्ती नसणं, पुढाकार न घेणं, आत्मविश्वासाची कमतरता, चिडचिडा स्वभाव
उपाय साधारण वयाच्या बारा वर्षापर्यंत मुलाला आईवडिलांच्या सहवासाची गरज असते. मुलाचा सर्वांगिण विकास करण्याचा गुण निसर्गत:च आईला मिळाल्याने तिचा जास्तीत जास्त वेळ पाल्याला मिळायला पाहिजे. त्यासाठी नोकरी सोडून द्यावी असं नाही. कमी वेळ मुलासोबत घालवायला मिळत असला तरी, तो 'क्वालिटी टाइम' असावा. घरी आल्यानंतर अभ्यास, शाळा यावर चर्चा करण्यापेक्षा त्याला इतर गोष्टींबाबत बोलतं करा. आठवड्यातून एकदा-दोनदा तरी त्याच्याबरोबर बाहेर फिरायला जावं. या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर, कळी उमलण्याआधीच कोमेजेल. पैसा हा सर्वस्व नाही. तो आज ना उद्या कमवता येतो, पण छकुल्याच्या बाललीलांना, विशिष्ट वयातल्या विकासाला मुकलं तर ते दिवस परत आणता येत नाहीत.
.......
दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई

....
प्रसिद्ध सायकलॉजिस्ट एरिक एरिक्सनच्या पर्सनॅलिटी थेअरीनुसार,
* बाल्यावस्था (एक वर्षापर्यंत)
या वयामध्ये मुलाला आईवडिलांच्या सहवासामुळे विश्वास, प्रेम, आपुलकी या भावनांची जाणीव होते. आईवडिल किंवा आपली माणसं नसतील तर तो विश्वास ठेवू शकत नाही. त्याच्या मनात भय निर्माण होतं. 'ओव्हर प्रोटेक्टिव्ह' असूनही उपयोग नाही, कारण यामुळे मूल 'ममाज बॉय' व्हायला वेळ लागत नाही. ते स्वत:चा निर्णय घेऊ शकत नाहीत.
* नुकतंच चालू लागलेलं मूल (अठरा महिने ते तीन वर्षांपर्यंत)
या वयात मूल स्वावलंबी व्हायला शिकतं. यावेळी पालकांनी त्याच्या खूप पुढं पुढंही करू नये आणि तू लहान आहेस, जमणार नाही तुला... या वाक्यांनी खच्चीही करू नये. उदा. त्याला स्वत:च्या हाताने जेवू देणं, वस्तूंना धरून चालायला शिकवणं इत्यादी. प्रेरणा दिल्याने त्याचा स्वाभिमान वाढतो. आपल्या क्षमता थोड्या प्रमाणात त्याला समजायला लागतात. आजुबाजूच्या लोकांचं निरीक्षण करून तसं वागायला आणि थोडंफार बोलायला शिकतात.
* शाळेत जाण्याआधीचा काळ- (तीन ते सहा वर्षं)
या वयात नवीन कला शिकणं, पुढाकार घेणं, क्षमता ओळखणं, कल्पनाशक्तीला वाव देणं इत्यादींबाबत त्यांच्यामध्ये विकास होत असतो. या गोष्टी कळण्यासाठी आईवडिल मुलाच्या सहवासात नसतील तर, त्याचा कल ओळखणं मुश्कील होतं आणि तो भरकटण्याची शक्यता वाढते.
--
============================
As a youth of my nation,
I will work and work with courage to achieve success in all the missions.
http://revtwt.com/index.php?id=38814
http://www.myLot.com?ref=ruperi
http://www.globelive.info
http://hubpages.com/author/ruperi/hot/
--
============
As a youth of my nation,
I will work and work with courage to achieve success in all the missions.
http://revtwt.
http://www.myLot.
http://www.globeliv
http://hubpages.
__._,_.___
MARKETPLACE
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment