Boyfriend
बंडू बावळे (बनीला) : लग्नापूर्वी तुझा कोणी बॉयफ्रेण्ड होता?
( बनी तशीच शांत असते...)
बंडू : तुझ्या या शांत बसण्याला मी काय समजू?
बनी : जरा, थांब ना... मोजू तर दे!!!
------------
एक गाढव झाडावर चढते. झाडावर आधीपासुनच हत्ती बसलेला असतो.
गाढव- सपरचन्द खायला आलोय.
हत्ती- आरे गढवा हे तर आंब्याचे झाड आहे.
गाढव- मी सफरचन्द सोबत घेउन आलोय
युधिष्ठिर
नवरा- युधिष्ठिर पण जुगार खेळत होता मग मलाच का मनाई करतेस.
बायको- ठीक आहे जा, पण इतकं लक्षात ठेवा की द्रौपदीलापण पाच नवरे होते.
देवाची तब्येत आज ठीक नाही:
राम :-आजी, आज देवपूजेची घंटी हळूहळू वाजव आझी:-का रे राम ?
राम :-देवाची तब्येत आज ठीक नाही वाटत.
आजी:-चूप कहीतरी बडबडू नको.
राम :-कहीतरी नाही.खरच सांगतो. अगं शेजारचे डॊक्टर म्हणे आज देवाघरी गेलेत सकाळी.
------------
झोप:
एक ईसम डॊक्टरकडे येऊन म्हणाला,'डॊक्टर, मी अगदी जीवाला कंटाळून गेलोय.'
'काय होतय काय आपणाला?' डॊक्टरांनी विचारल.
'रात्री झोप येत नाही' पेशंट म्हणाला,'रोज मध्यरात्री स्वयंपाकघरात चोरपावलांनी चालणारया मांजराचा आवाज ऎकूनही माझी झोपमोड होते.'
ठीक आहे मी झोपेच्या गोळ्या देतो तेवढ्या घ्या.' डॊक्टर म्हणाले.
'किती घ्यायच्या गोळ्या?' पेशंटन विचारल.
'तुम्ही फ़क्त एकच घ्या आणि त्या मांजराला दोन द्या.' डॊक्टर म्हणाले...
------------
"फ" "फ" "फ" "फ" "फ":
व्यक्ती : डॉक्टर साहेब मला "फ" ला "फ" नाही म्हणता येत हो डॉक्टर : अहो छानच तर म्हणताय की हो तुम्ही "फ"
व्यक्ती : नाही हो, डॉक्टर साहेब मला "फ" ला "फ" नाही म्हणता येत.
डॉक्टर : पुन्हा तेच, अहो म्हणताय की तुम्ही "फ"
व्यक्ती : डॉक्टर साहेब, तुम्हाला 'फमजलेच' नाही, मला काय म्हणायचेय ते.
------------
कितवा महिना ??:
एकदा एक pregnant बाई डॉक्टर कडे जाते...
डॉक्टर : कितवा महिना ??
बाई: आठवा.
डॉक्टर : मी कसा आठवू ???
Nibandh
उद्या परीक्षेत 'मित्र' हाच निबंध येणार बहुधा... शाळेत सगळ्यात हुश्शार असणाऱ्या चिंगीने त्या दिवशी बंड्याला आतली खबर सांगितली. झालं, तिचा शब्द प्रमाण मानत बंडोबांनी 'मित्र' निबंध घोटून घोटून तयार केला. पण परीक्षेचा पेपर समोर आला तेव्हा त्यात निबंधाचा विषय होता, बाबा! दोन क्षण गांगरलेल्या बंड्याने मात्र अजिबात हार मानली नाही. पेन उचललं आणि त्याने बाणेदारपणे निबंध लिहायला सुरुवात केली...
शीर्षक : बाबा
मला खूप खूप बाबा आहेत. माझे काही बाबा मुलगे आहेत आणि काही मुलीपण आहेत. आम्ही सगळे मिळून मिसळून वागतो. पण माझे सगळ्यात जवळचे बाबा मात्र माझ्या शेजारी राहतात..... (आबाबाबाबा)
पुण्याहून पत्र
प्रिय बाबा, शि. सा. न. वि. वि .
मी पुण्यात सुखरूप पोहोचलो. इथे बऱ्याच गंमती पाहायला मिळत आहेत.
पुणेकरांचं जुनं वाहन म्हणजे सायकल. आपल्या गावात जसे देवाला सोडलेल्या रेड्याला काही करत नाहीत, तसंच इथे सायकलस्वारांना कोणतेही नियम लागू नाहीत. इथलं सध्याचं वाहन म्हणजे बाइक. त्यांना इंधनबचतीचं महत्त्व खूपच पटलं आहे. त्यामुळे ते दुचाकीवर तीनजण बसतात. सिग्नलपाशी लाल दिवा असला, तरी सहसा थांबत नाहीत. त्यामुळे पेट्रोल जास्त जळते ना. वळताना हात दाखवायचा, तर चौदा स्नायू वापरावे लागतात म्हणे! म्हणून हात दाखवण्याचे कष्ट कुणी घेत नाही. हात दाखवून अवलक्षण व्हायला नको म्हणून रिक्षावाले तर पायानं वळण्याचा इशारा करतात.
इथे सहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना तीन आसनी रिक्षा म्हणतात आणि दहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना सहा आसनी रिक्षा म्हणतात. आहे ना गंमत?
Best Regards,
Mahesh Bhoir
www.agrizatka.
www.maheshbhoir.
www.maheshbhoir.
+91 9870560065
0 comments:
Post a Comment