sponsers

Sunday, November 1, 2009

[GarjaMaharashtraMaza] केसांचे लाड पुरवा!

 


केसांचे लाड पुरवा!!


मऊ, घनदाट, मोकळे केस हे निरोगी शरीराचंच एक प्रतीक आहे. असे आपलेही केस असे असावेत असं स्वप्न अनेकांनी आपल्या उरी बाळगलं असेल. पण त्यासाठी केसांची निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. असं नेहमी म्हटलं जातं की दिवसाला शंभरेक केस गळाले तरी हरकत नसतं. कारण नवे केस उगवत असतात. पण काही परिस्थितींमध्ये केसांच्या गळतीचा हा आकडा वाढतच जातो आणि त्यावर योग्य उपचार करणं आवश्यक बनतं. 

केस निरोगी बनवायचे असतील त्यासाठी त्यांचे अक्षरश: लाडच पुरवले पाहिजेत. योग्य आहार आणि फिट राहणंही निरोगी केसांसाठी अत्यंत आवश्यक आहे. केसांचे लाड पुरवायचे म्हणजे नेमकं काय करायचं? अगदी साधं आहे. नियमितपणे ब्रश किंवा कंगव्याने केस विंचरणं, शॅम्पूने ते व्यवस्थित धुणं, केसांना कंडिशनिंग करणं आणि ते व्यवस्थित सुकवणं. यामध्ये केस गळत असल्यास, ते पातळ होत असल्यास किंवा कपाळापासून केसांची रेषा मागे येत असल्यास, कोंडा झाला असल्यास किंवा केसांची मुखं दुभंगली असल्यास त्यावर योग्य वेळी योग्य उपचार करणंही अंतर्भूत होतं. 

मॉडर्न लाइफस्टाइल आणि आहारामुळे आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच केसांची काही ना काही समस्या सतावत असते. त्यामधली सर्वात मोठी समस्या म्हणजे केस गळणं. जेव्हा केस गळण्याचं प्रमाण खूपच वाढतं तेव्हा आपण कसे दिसू या कल्पनेने अनेकांना नैराश्यही येतं. काहींचे केस मध्यम प्रमाणात गळतात तर काहींना थेट टक्कलच पडतं. केस गळण्यामागचं कारण म्हणजे केसांचे फॉलिकल्स अडकून बसतात आणि त्यांच्यापर्यंत रक्तपुरवठा होताच नाही. अशाने केसांची वाढ खुंटते आणि ते गळू लागतात. 

सर्वसामान्यत: केस गळण्यामागची कारणं 

हॉमोर्न्समध्ये असंतुलन (गर्भारपण किंवा प्रसूतीच्या वेळेस झालेलं असंतुलन) 

आहारातली कमतरता 

अतिनील किरणोत्सर्ग: एक्सरे आणि रेडिओथेरपी 

औषधं, रसायनं 

मोठ्या प्रमाणावर रक्ताचा ऱ्हास 

भावनिक ताण 

हवामान आणि पाण्यात बदल 

रसायनयुक्त शॅम्पू 

कमकुवत केस (उदा: रासायनिक प्रक्रिया केलेले केस) 

प्रदीर्घ आजारपण, मोठी ऑपरेशन्स किंवा गंभीर संसर्गामुळे येणाऱ्या ताणामुळे दोन-तीन महिन्यांत केस गळण्यास सुरुवात होते. या कारणांमुळे हामोर्न्समध्ये अचानक असंतुलन निर्माण होतं आणि केस गळायला सुरुवात होते. स्त्रियांमध्ये विशेषत: गर्भारपणात नसंच प्रसूतीनंतर केस मोठ्या प्रमाणावर गळण्याची समस्या आढळते. मात्र ही तात्पुरती स्थिती असते. योग्य औषधोपचार आणि योग्य शॅम्पूच्या साहाय्याने ती टाळता येऊ शकते. 

केस घट्ट बांधणं, ब्लोड्रायरच्या साहाय्याने केस सुकवणं तसंच हॉट रोलर्स किंवा आयर्नच्या वापरामुळे केस गळतात. 

ब्लिचिंग, पमिर्ंग किंवा हेअर कलरिंग करताना तीव्र रासायनिक घटकांचा वापर केला जात असल्याने केस गळतात किंवा ते पातळ बनतात. 

थायरॉइड डिसऑर्डर, गोवर, कावीळ किंवा शरीरात पोषकतत्त्वांची (प्रोटिन, लोह, झिंक किंवा बायोटिन) गंभीर कमतरता असल्यासही केस गळतात. 

अनुवंशिक कारणांमुळेही पुरुष तसंच स्त्रियांमध्ये केसगळतीची समस्या निर्माण होते. याप्रकारात पुरुषांचे कपाळाकडचे किंवा डोक्याच्या मध्यावरचे केस गळतात. हे वयाच्या कोणत्याही टप्प्यात चालू होतं. यामागचं मुख्य कारण अनुवंशिकता तर असतंच त्याशिवाय हामोर्न्समध्ये बदल किंवा वाढतं वय ही कारणंसुद्धा असू शकतात.

स्त्रियांमध्ये मुख्यत्वे डोक्याच्या मध्यापासून केस गळण्यास सुरुवात होते. 

वाढतं वय हेसुद्धा केसगळतीमागचं मुख्य कारण आहे. विशेषत: तिशीनंतर स्त्री तसंच पुरुषांमध्ये केसगळतीची समस्या तीव्र रूप धारण करते. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ही समस्या अधिक उग्र रूप धारण करते. 

केसगळतीवर सुरक्षित आणि विना साइड इफेक्ट्स उपचार करायचे असतील तर वर्षांनुवर्षं चालत आलेल्या आयुवेर्दाला पर्याय नाही. ज्यांचे केस गळतात ती मंडळी शक्य ते सर्व उपचार करतात. त्यातले बरेचसे उपचार पारंपरिक असतात. आयुवेर्द व्यक्तिगणिक उपचार सुचवतं आणि रोगाच्या मूळ कारणावर हल्ला करतं. आयुवेर्दातले सर्व उपचार कायमस्वरूपी असतात, तात्पुरत्या उपचारांना त्यात थाराच नाही. 

आयुवेर्दाचा आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत अभिनव आहे. आयुवेर्द त्या व्यक्तीचा मानसिक दृष्टिकोन, राहणीमान आदी गोष्टींचाही विचार करतं कारण उपचारांमध्ये त्यांचा एकत्रित विचारच करावा लागतो. शिवाय या उपचारांमध्ये नैसगिर्क घटकांचाच वापर केला जातो. केसगळतीवरच्या उपचारांसाठी आयुवेर्द पुढील घटकांचा वापर करण्यास सांगतं, उदा. 

भृंगराज आणि ज्येष्ठमध केसगळतीवर नियंत्रण ठेऊन केसांच्या वाढीस चालना देतं.








--
============================
As a youth of my nation,

I will work and work with courage to achieve success in all the missions.
http://revtwt.com/index.php?id=38814

http://www.myLot.com?ref=ruperi

http://www.globelive.info

http://hubpages.com/author/ruperi/hot/

__._,_.___
Recent Activity
Visit Your Group
Yahoo! Groups

Mental Health Zone

Schizophrenia groups

Find support

Yahoo! Groups

Mom Power

Kids, family & home

Join the discussion

Y! Messenger

All together now

Host a free online

conference on IM.

.

__,_._,___

0 comments:

sponsers