sponsers

Wednesday, November 4, 2009

[GarjaMaharashtraMaza] जेमॉलॉजी क्षेत्रात करिअर Gemology

 


हिरेमाणकं, रत्नांपासून प्रेशिअस, सेमी प्रेशिअस स्टोन्सचा अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे जेमॉलॉजी. या सर्व प्रेशिअस स्टोन्सचा रंग, दर्जा, ग्रेड, कॅरेट ओळखण्याचं काम यात करावं लागतं. हल्ली सोन्याचांदीच्या दागिन्यांपेक्षा डायमण्ड, स्टोन्सच्या ज्वेलरीला मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे या क्षेत्रात स्किल्ड मॅनपॉवरची गरज भासू लागली आहे. रत्न ओळखणं, त्यांचं वजन (कॅरेट) करणं, रंग आणि पैलू यावरून दर्जा ठरवणं आदी काम या प्रोफेशनल्सना करावी लागतात. 


अस्मी, नक्षत्र, डी बीअर्स अशा नामांकित ब्रॅण्ड्सची प्रेशिअस, सेमी प्रेशिअस ज्वेलरी वापरणं आज स्टेटस सिम्बॉल बनू लागलं आहे. अशा ब्रॅण्ड्सबरोबर मोठमोठ्या सेलिब्रेटीजही असोसिएट होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पारंपरिक सोन्याचांदीच्या दागिन्यांची जागा आता डायमण्ड्स आणि स्टोन्सनी घेतली आहे. म्हणूनच करिअर करण्यासाठी हे क्षेत्र एक चांगला पर्याय देऊ शकतं. 

ज्यांच्याकडे या कामाचं स्किल उत्तम आहे, त्यांना नोकरी मिळवणं फारसं कठीण जात नाही. या कामासाठी मिळणारा आथिर्क मोबदला हा, ज्या प्रकारचं काम आहे त्यावर अवलंबून असतो. क्रिएटिव्ह काम करणाऱ्यांना महिन्याला साधारण १५ हजार रुपये मिळतात. याशिवाय रिटेलर्स, होलसेलर म्हणूनही काम करता येतं. तसंच ज्वेलरी शॉप सुरू करण्याचा पर्यायही आहे. या पर्यायांमधून मिळणारी कमाई वेगवेगळी असते. 




या क्षेत्रात प्रगती करायची, तर इंग्रजीचं ज्ञान असलं पाहिजे. तसंच ग्राहकांशी डील करावं लागत असल्याने कम्युनिकेशन स्किल असणंही तेवढंच गरजेचं आहे. डिझायनिंगचं ज्ञान, निरीक्षणशक्ती, लक्ष एकाग्र करण्याची क्षमता, पेशन्स, को-ऑडिर्नेशन आदी गुण असणं आवश्यक आहेत. 

या क्षेत्रातील प्रोफेशनल्सकडे असणारं कौशल्य लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेने आपली नजर भारतावर केंदीत केली आहे. हिरेमाणकांना सटिर्फिकेशन आणि प्रत ठरवून देणाऱ्या बेल्जियम, न्यूयॉर्क आणि बँकॉकमधील द इण्टरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूटने मुंबईत शॉप सुरू केलं आहे. याशिवाय इतर अनेक इण्टरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट्सचा भारतावर डोळा आहे. 
........ 

हे कोसेर्स उपलब्ध असणाऱ्या काही संस्था : 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, एनआयएफटी कॅम्पस, गुलमोहर पार्कजवळ, हौज खास, नवी दिल्ली 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, टाटा मिल्स, परेल, मुंबई 

याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचं कॅम्पस पश्चिम बंगाल, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू इथेही आहेत. 

जेमस्टोन्स आटिर्शन्स ट्रेनिंग स्कूल, जालना महल, जयपूर 







या संस्थांशिवाय इतर अनेक इन्स्टिट्यूट्स देशभरात आहेत. तसंच लहानमोठे कोर्सेस उपलब्ध असणाऱ्या संस्थाही आहेत.

--

जर वर्षभराचंच उद्दिष्ट असेल, तर फुले फुलवा.
दशकभराची योजना असेल, तर झाडे लावा.
आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी काही करायचे असेल, तर माणसं घडवा.


घ्या एक ठाम निर्णय; जो बदलेल तुमचे जीवन:-
माझा जन्मच विजयासाठी झाला आहे.
मी एक योध्दा आहे, संकटांची भीती नाही मला.
जन्माबरोबरच सुरु झालेली स्पर्धा अखेरच्या क्षणापर्यंत चालणारच,
व्यक्‍ती म्हणून सर्वच जगतात, स्वत:साठी सर्वच जगतात
मी माझ्या आणि इतरांच्या स्वप्नांसाठी जगेन, लढेन.
मी जिंकायचं म्हणूनच जगणार!!!!
मी माझ्या जीवनाचे सार्थक करणारच!!!
मी यशाचे शिखर गाठणारच!!
मी माझे स्वप्न साकार करणारच!
===========================
As a youth of my nation,

I will work and work with courage to achieve success in all the missions.
http://revtwt.com/index.php?id=38814

http://www.myLot.com?ref=ruperi

http://www.globelive.info

http://hubpages.com/author/ruperi/hot/

__._,_.___
Recent Activity
Visit Your Group
Y! Messenger

All together now

Host a free online

conference on IM.

Yahoo! Groups

Mom Power

Community just for Moms

Join the discussion

Find helpful tips

for Moderators

on the Yahoo!

Groups team blog.

.

__,_._,___

0 comments:

sponsers