sponsers

Thursday, December 2, 2010

<~~Aakashzep~~> ज्ञानभाषा प्रकाशन

 

---------- Forwarded message ----------
From: दत्तप्रसाद <dp_b78@yahoo.co.in>
Date: 2010/12/2
Subject: ज्ञानभाषा प्रकाशन



 

ज्ञानभाषा प्रकाशन

प्रदीर्घ काळानंतर पाठ्यक्रमास उपयुक्त विज्ञान विषयाची पुस्तके मराठी
भाषेतून बनवण्यास ज्ञानभाषा प्रकाशनाने प्रारंभ केला आहे. ११ वी
भौतिकशास्त्र शिकणार्‍या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना उपयुक्त ठरेल
असे पुस्तक तयार झाले आहे.

यातील ५० पुस्तके शाळा-महाविद्यालयांना विनामूल्य वाटण्यासाठी प्रकाशनाचे
हितचिंतक श्री नितीन देशपांडे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.

हे पत्रक वाचणार्‍या प्रत्येकाने शास्त्रशाखेचे ११ वीसाठी वर्ग
चालवणार्‍या महाराष्ट्रातील गावोगावच्या शाळा-महाविद्यालयांना ही माहिती
यथाशक्ती देण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती. संबंधित
शाळा-महाविद्यालयांनी ज्ञानभाषा प्रकाशनाकडे एक पत्र टपालाने किंवा
संगणकाद्वारे पाठवून पुस्तकाची मागणी केल्यास त्यांना पत्रात दिलेल्या
संस्थेच्या शीर्षपत्रातील पत्त्यावर प्रत्येकी एक पुस्तक विनामूल्य
पाठवले जाईल.

ही माहिती विज्ञानशाखेच्या अधिकाधिक प्राध्यापकांना कळवावी,
राज्य-जिल्हा-तालुका स्तरावरील जमेल त्या वृत्तपत्रातून, आकाशवाणी
केंद्रावरून, वैयक्तिक संभाषणातून, भ्रमणध्वनी संदेश, संगणकीय विरोप आणि
सुचेल त्या अन्य मार्गाने सर्वत्र पोचवावी, ही विनंती.

अनिल गोरे
ज्ञानभाषा प्रकाशन, आकांक्षा उद्योग
अ-११२, बाळाजी प्रासाद, ४७१ शनिवार पेठ, पुणे ४११०३०
भ्र.ध्वनी ९४२२००१६७१    वि-पत्ता marathikaka@gmail.com

--
Regards,
Sagar Bhandare


__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___

0 comments:

sponsers