sponsers

Tuesday, October 5, 2010

{Marathi Kavita Mandal} रोबोट रजनीकांतबद्दलचे जोक्स :) :)

 

अजून दोन गोष्टी आहेत रजनीकांत बद्दल
१. लहानपणी रजनीकांत बिछाना ओला करायचा नाही , उलट बिछानाच त्याच्या भीतीने ओला व्हायचा ..
२ रजनीकांतचा इमेल आयडी काय आहे माहितेय ? "' जीमेल@रजनीकांत.कॉम  


॥ निलेश पोटे ॥





--- On Tue, 5/10/10, Anjali Pendharkar <anjalika.pendharkar@gmail.com> wrote:

From: Anjali Pendharkar <anjalika.pendharkar@gmail.com>
Subject: Re: [Marathi_Katha] रोबोट रजनीकांतबद्दलचे जोक्स :) :)
To: Marathi_Katha@yahoogroups.com
Date: Tuesday, 5 October, 2010, 4:43 PM

 
जबरदस्त !!

2010/10/5 Rupesh Rane <ruperi@gmail.com>
 

रोबोट रजनीकांतबद्दलचे जोक्स


रजनीकांतबद्दलचे जोक्स रजनीकांतबद्दल इतके असंख्य जोक्स आहेत की, विचारता सोय नाही. हे जोक्स त्याच्या चाहत्यांनी त्याचा मोठेपणा अधिक वाढवण्यासाठी जन्माला घातले आहेत की, त्याची थट्टा करणा-यांनी त्याला विनोदाचा विषय करण्यासाठी हे सांगणं कठिण आहे. पण या जोक्समधून रजनीकांत ही नेमकी काय चीज आहे हे मात्र नेमकेपणाने उभं राहातं. कुठल्याच फिल्मस्टारबद्दल त्याच्या पडद्यावरील शैलीचा आधार घेऊन अशाप्रकारे जोक्सचा जन्म झालेलं पाहण्यात नाही :

रजनीकांत ज्यावेळी पुशअप्स मारतो, त्यावेळी तो स्वत:ला वर उचलत नाही, तर पृथ्वीला खाली ढकलत असतो

मोनालिसाच्या ज्या हास्याबद्दल जगभरात अजूनही गूढ आणि आकर्षण आहे, हे हास्य साक्षात रजनीकांतनेच तिला दिलंय

रजनीकांत कुठल्याही संख्येला शून्याने भागू शकतो

रजनीकांत माशालाही पाण्यात बुडवून मारू शकतो

रजनीकांतने एकदा एका घोडय़ाच्या हनुवटीला लाथ मारली होती. आज त्याच्या वारशांना आपण जिराफ म्हणून ओळखतो

रजनीकांतने एकदा मॅकडोनाल्डमध्ये इडलीची ऑर्डर दिली आणि.. त्याला ती मिळाली!

बम्र्युडा ट्रँगल म्हणून ओळखला जाणारा भाग पूर्वी बम्र्युडा स्क्वेअर होता; पण रजनीकांतने एका कोप-याला लाथ मारली आणि..रजनीकांत कॉर्डलेस फोनने तुमच्या गळ्याभोवती फास आवळून तुमचा जीव घेऊ शकतो

रजनीकांत श्वास घेत नाही. आसमंतातली हवा संरक्षणासाठी त्याच्या फुफ्फुसांमध्ये लपून बसलेली असते

रजनीकांत यापूर्वीच मंगळावर जाऊन आलाय; म्हणून तर तिथे सजीवसृष्टीचं अस्तित्व नाही

रजनीकांत रोखून पाहतो, तेव्हा पाणी अधिक वेगाने तापतं

गुगलवर रजनीकांतला शोधण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही. कारण कोणीच रजनीकांतला शोधू शकत नाही; रजनीकांतच आपल्याला शोधून काढतो

टेलिफोनच्या आन्सरिंग मशिनचा बीप वाजण्याआधीच रजनीकांत तिथे आपला संदेश नोंदवू शकतो

रजनीकांत न्यायालयात जातो आणि.. न्यायाधीशालाच शिक्षा सुनावून येतो

रजनीकांतला लहानपणी देवी झाल्या होत्या. म्हणूनच आज देवीचं नामोनिशाण दिसत नाही

रजनीकांतच्या कॅलेंडरमध्ये 31 मार्चनंतर एकदम 2 एप्रिलच येतो कारण.. त्याला कोणीही 'एप्रिल फूल' बनवू शकत नाही


रजनीकांत घडय़ाळ घालत नाही कारण.. किती वाजलेत ते तोच तर ठरवतो

मृत्यूला कोणीही फसवू शकत नाही, हे विधान म्हणजे रजनीकांतला स्वत:चा अपमानच वाटतं. कारण तो क्षणोक्षणी मृत्यूला फसवत असतो

पुरातत्त्ववेत्यांनी 1236 सालची एक इंग्लिश डिक्शनरी शोधून काढली. त्यात 'व्हिक्टिम' या शब्दाचा अर्थ 'ज्याचा रजनीकांतशी सामना झाला आहे तो' असा आहे

ग्लोबल वॉर्मिग नावाची काही गोष्टच अस्तित्वात नाही. रजनीकांतला थंडी वाजत होती, म्हणून त्याने सूर्याला थोडं पृथ्वीच्या जवळ आणलं

 

 



__._,_.___
Recent Activity:
If you are passionately in love with Marathi poetry, as a writer or a reader, this is your group.
Please post your poems, the poems that you like, qoutations about poetry and your views and thoghts about Marathi poetry.

Marathi_Kavita_Mandal

Now all Marathi Kavita are available at
http://kavitasangraha.blogspot.com
.

__,_._,___

0 comments:

sponsers