आजच्या "सामना" वर्तमानपत्रात वाचण्यात आलेली दुखद बातमी ... ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. 'बाकरवडी'वाले चितळे यांचे निधन पुणे, दि. 13 (प्रतिनिधी) - साठ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या बाकरवडीची चव जगभर पोहचविणारे बाकरवडीवाले चितळे बंधू मिठाईचे मालक राजाभाऊ चितळे यांचे आज निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता. त्यांच्या पश्चात मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. सातारा जिल्ह्यातील लिंबगोवा हे राजाभाऊंचे मूळ गाव. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर, लिंबगोवा, भिलवडी, मुंबई आणि पुण्यात झाले. कोल्हापूरमध्ये मावशीकडे शिक्षणासाठी असताना त्यांनी अनेक मेहनतीची कामे केली होती. त्यातूनच त्यांना स्वावलंबनाचे धडे मिळाले. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राजाभाऊंच्या मोठ्या भाऊंनी मिठाईचे दुकान सुरू केले होते. त्यानंतर पुढे राजाभाऊंनी 1954 मध्ये पदवीधर झाल्यावर डेक्कन जिमखाना येथे मिठाईचे दुकान सुरू केले होते.
|
__._,_.___
MARKETPLACE
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment