sponsers

Tuesday, October 5, 2010

[GarjaMaharashtraMaza] अतिरेक औषधांचा!

 

अतिरेक औषधांचा!

 

 

 ( डॉ. श्री बालाजी तांबे )

 औषध अनेक गुणांनी युक्, अनेक प्रकारांनी योजता येणारे, उत्तम प्रतीचे आणि रोगाला व्यक्तीला अनुकूल, योग्य निदान सारासार विचार करून दिलेले असेल तर थोड्याशा औषधानेही चांगला गुण येतो, असे आयुर्वेदशास्त्र सांगते. मात्र, सध्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने औषधे घेण्याचे प्रमाण वाढतेच आहे. हा औषधांचा अतिरेकच म्हणायला हवा. तो केव्हाही टाळणेच इष्ट... ........

 आजारपण म्हणजे त्यापाठोपाठ औषध आलेच. औषध घ्यायचे ते बरे होण्यासाठी यात काहीच संशय नसावा पण औषध घेण्याचाच त्रास व्हायला नको हेही खरे.

 औषध कसे असावे हे आयुर्वेदात याप्रमाणे सांगितले आहे,

 

 बहुकल्प बहुगुणं संपन्नं योग्यमौषधम्

 ... अष्टांगहृदय

 

 औषध अनेक गुणांनी युक् असावे, अनेक प्रकारांनी योजता यायला हवे, संपन्न म्हणजे उत्तम प्रतीचे असावे. ज्या रोगावर किंवा ज्या व्यक्तीला द्यायचे त्यासाठी अनुकूल असावे. म्हणूनच योग्य निदान करून, सारासार विचार करून औषध दिले ते वरील सर्व कसोट्यांना लागू होत असेल तर थोड्याशा औषधानेही खूप चांगले काम होऊ शकते.

 

 औषधाचे हे गुण आयुर्वेदात सांगितले कारण या प्रकारचे औषध व्यक्तीला सहजपणे घेताही येते, कोणत्याही प्रकारचा त्रास उत्पन्न करत नाही, उलट कमी मात्रेत अधिकाधिक कार्य करू शकते.

 

 कसलाही अतिरेक चांगला नसतोच. औषधही याला अपवाद नाही. मात्र औषधाचा अतिरेक या विषयाबद्दल माहिती घेण्यापूर्वी औषध म्हणजे काय हे लक्षात घ्यायला हवे. आयुर्वेदात औषधाचे दोन प्रकार सांगितले आहेत,

 

 स्वस्थस्यौर्जस्करं किञ्चित् किञ्चित् आर्तस्य रोगनुत्

 ... चरक चिकित्सास्थान

 

 स्वस्थ म्हणजेच निरोगी व्यक्तीला अधिक ओजस्वी बनविणारे ते उर्जस्कर औषध तर रोगी व्यक्तीचा रोग दूर करणारे ते रोगनुत् औषध.

 

 उर्जस्कर औषधे नियत प्रमाणात घ्यायची असली तरी जितकी नियमित अधिक काळ घेता येतील तितकी चांगलीच असतात. उदा. "चैतन्य कल्प'युक् दूध, केशरयुक् पंचामृत, शास्त्रोक् पद्धतीने बनविलेली च्यवनप्राश, सूर्यप्राश, शांतीरोझ, धात्री रसायन यासारखी रसायने जितकी दीर्घकाळ घेता येतील तितकी अधिक प्रभावी असतात. सर्व शरीरधातूंना संपन्न बनविणारी असल्याने त्यांचा शरीराला अतिरेक होणे शक्यच नसते. उलट या प्रकारचे एखादे उर्जस्कर औषध रोज सेवन करण्याची सवय लावली तर भविष्यात रोगनुत् औषधाची गरजच पडणार नाही.

 

 रोगनुत् औषधाचेही दोन प्रकार पडतात.

 रोगस्य प्रशमनम् अपुनर्भवकरं

 ... अष्टांगसंग्रह सूत्रस्थान

 

 रोगाचे शमन करणारे आणि रोग पुन्हा उद्भवू नये यासाठी मदत करणारे

 

 या ठिकाणी रोगाचे शमन हा शब्दप्रयोगही विशिष्ट अर्थाने योजला आहे. रोगावर उपचार करताना केवळ त्रास दूर होणे, लक्षणांची तीव्रता कमी होणे एवढाच उद्देश नसावा तर रोगाचे शमन यथार्थाने झाले पाहिजे. या संदर्भात चरकसंहितेत एक श्लोक दिलेला आहे,

 

 प्रयोगं शमयेत् व्याधीं यो।न्य़मन्यमुदीरयेत्

 नासौ विशुद्धः शुद्धस्तु शमयेत् यो कोपयेत् ।।

 ... चरक निदानस्थान

 

 जी चिकित्सा एका व्याधीला शांत करेल परंतु नंतर वेगवेगळ्या रोगांना उत्पन्न करेल ती शुद्ध चिकित्सा नाही. शुद्ध चिकित्सा ती, जी असलेल्या रोगाला तर शांत करतेच पण दुसऱ्या रोगांचे कारण ठरत नाही.

 

 औषधांचा अतिरेक होण्यामागे चिकित्सा अशुद्ध असणे हे एक मोठे कारण असू शकते. तापासाठी दिलेल्या औषधाने ताप कमी झाला पण पचन बिघडले, पचनासाठी दिलेल्या औषधांनी उष्णता वाढली, वाढलेल्या उष्णतेने डोके दुखायला लागले तर ती शुद्ध चिकित्सा नव्हे. उलट यातून जसजसे त्रास वाढत जातील तसतशी औषधांची संख्या वाढत जाईल, अर्थातच औषधांचा अतिरेक होईल.

 

 आयुर्वेदामध्ये उपचार हे रोगाच्या लक्षणांवर केले जात नाहीत तर रोगाच्या संप्राप्तीवर म्हणजे रोगाला कारणीभूत दोष-धातू-मलाच्या असंतुलनावर करायचे असतात.

 

 उदा. शरीरात पित्तदोष वाढला असेल तर डोके दुखू शकते, हातापायाच्या तळव्याची आग होऊ शकते, केस गळू शकतात, तापाप्रमाणे कसकस जाणवू शकते, प्रत्येक लक्षणावर वेगळे औषध द्यायचे म्हटले तर औषधाचा अतिरेक होणारच. पण त्याची आवश्यकता नसते. पित्तशमन करण्यासाठी एखादे औषध दिले, बरोबरीने पादाभ्यंगाचा आधार दिला तर जसजसे पित्तशमन होईल तसतसा सगळाच त्रास बरा होत जाईल.

 

 चरकसंहितेत सांगितलेले आहे,

 लिंगं चैकमनेकस्य तथैर्वैकस्य लक्ष्यते

 बहूनि एकस्य व्याधेर्बहुनां स्युर्बहुनि ।।

 एका शान्तिरनेकस्य तथैवैकस्य लक्ष्यते

 

 एका रोगाचे एक लक्षण असू शकते, अनेक रोगांचेही एकच लक्षण असू शकते. तसेच एकाच रोगाची अनेक लक्षणेही असू शकतात. अशा वेळेला अनेक रोगांची (लक्षणांची) एकाच उपायाने शांती करता येते.

 

 औषध घ्यावे लागते ते शरीरातील असंतुलन दूर करण्यासाठी रोग बरा करण्यासाठी. मात्र रोग फक् औषधांनीच बरा होत नाही हेही ध्यानात ठेवायला हवे. आयुर्वेदामध्ये हजारो औषधी योग दिलेले असते तरी प्रत्येक रोग समजावताना सुरुवात होते ती रोगाच्या कारणापासून. "निदानं परिवर्जनम्' ही उपचाराची पहिली पायरी असल्याने ज्या कारणामुळे रोग झाला ते टाळणे हा एक प्रकारचा उपचारच असतो. अर्थातच ही पहिली पायरी साधता आली तर इतर औषधांची आवश्यकता निश्चितच कमी होऊ शकते.

 

 योग्य आहार ही उपचाराची दुसरी पायरी म्हणता येईल. "स्वस्थातुराणां विशेषारोग्यकारणम्' म्हणजे निरोगी व्यक्ती रोगी या दोघांनाही जो विशेषत्वाने आरोग्यदायी असतो तो आहार असे काश्यपसहितेत सांगितलेले सापडते म्हणूनच असंतुलन दूर करण्यास मदत करणाऱ्या आहाराची योजना केली तरी औषधांचे प्रमाण, औषध घेण्याचा कालावधी कमी होऊ शकेल.

 

 आयुर्वेदामध्ये काही अद्रव्य उपचार प्रकारही सांगितले आहेत. उदा. आमाशय दुष्टीमुळे म्हणजे ताप आला असेल किंवा अपचनामुळे जुलाब होत असतील तर त्यावर लंघन हा सर्वोत्तम उपाय सांगितला आहे. काही प्रकारच्या त्वचारोगांमध्ये आतपसेवन म्हणजे उन्हात बसणे हा उपाय सांगितला आहे. अर्थात लंघन, आतपसेवनासारख्या उपचारांनी सर्वच रोग बरे करता यात नाहीत, मोठा रोग असला तर औषधांची आवश्यकता असतेच.

 

 औषध जितके संपन्न, वीर्यवान तितके चांगल्या पद्धतीने काम करते हे आपण पाहिले. ही संपन्नता, ही वीर्यशक्ती मुळात औषधीद्रव्यात असायला हवीच, पण ती औषध बनविताना राखता यायला हवी, उलट वाढवता यायला हवी. त्यासाठीच आयुर्वेदाने औषधीनिर्माणशास्त्राची रचना केली. बारकाईने अभ्यास केला असता हे शास्त्र अतिशय परिपूर्ण असल्याचे लक्षात येते.

 

 उदा. चंद्रप्रभा ही गोळी घेतली तर त्यात ३४-३५ औषधी द्रव्ये आहेत, सर्वच द्रव्ये समप्रमाणात नाहीत तर त्यांचे विशिष्ट प्रमाण दिलेले आहे. ही द्रव्ये कोणत्या क्रमाने एकमेकात मिसळायची, सर्वात शेवटी काय घालायचे, खल किती वेळ करायचा हे सर्व ठरलेले असते, सांगितलेले असते. त्या पद्धतीने औषध नीट बनविले तर प्रत्येक द्रव्याचा अंगभूत गुण प्रकर्षाने अनुभूत होतो. शिवाय त्या त्या योगात औषधीद्रव्यांची निवड ही एका विशिष्ट उद्देशाने केलेली असते, एक द्रव्य एकेकटे काम करते त्यापेक्षा इतर द्रव्यांबरोबर संयोग पावले असता वेगळ्या प्रकारे अधिक उत्कटतेने काम करू शकते. चंद्रप्रभेतील सुवर्णमाक्षिक, लोह घटकद्रव्ये रक्तधातूवर काम करतात, शिलाजितासारखे द्रव्य धातूंना रसायनस्वरूप असते, गुग्गुळ वाताचे शमन करतो. गुग्गुळ शिलाजिताला दालचिनी, तमालपत्र, वेलदोडे, सुंठ, मिरी, पिंपळी, वगैरे पाचक द्रव्यांची जोड मिळाल्याने ते अधिक प्रभावी ठरतात. शिवाय गुग्गुळ-शिलाजित त्रिफळ्याच्या काढ्यात विरघळवले जात असल्याने अधिक सूक्ष्म होतात. चंद्रप्रभेतील इतर घटक पाहिले तर काही पित्तदोषाला संतुलित करतात, काही कफदोषाचे शमन करतात, काही मूत्रसंस्थेवर काम करतात आणि म्हणूनच या योगाच्या फलश्रुतीत सांगितलेले सापडते.

 

 चन्द्रप्रभेति विख्याता सर्वरोगप्रणाशिनी

 

 म्हणजेच चंद्रप्रभा सर्व रोगांचा नाश करण्यास समर्थ असते. तेव्हा असे प्रभावी औषध हाताशी असले तर इतर औषधांची गरजच नसते. औषधांचा अतिरेक होण्याचा संभवच नसतो.

 

 अर्थात डोळे बंद करून उठसूट सर्वच रोगांवर एकटी चंद्रप्रभा देता येईल असे नाही. चंद्रप्रभेचे जे कार्यक्षेत्र आहे, ती ज्या प्रकारच्या संप्राप्तीवर काम करू शकते, तशी संप्राप्ती असतानाच तिचा उत्कृष्ट उपयोग करता येतो.

 

 चंद्रप्रभेप्रमाणेच आयुर्वेदात असे असंख्य योग आहेत की जे त्या त्या संप्राप्तीवर अचूक काम करू शकतात. वैद्याने योग्य निदान केले, नेमके असंतुलन ध्यानात घेतले तर अशा एक-दोन योगांद्वारेही खूप मोठे काम करता येऊ शकते.

 

 रुग्णासाठी औषधांची योजना करताना काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. उदा. शरीरात काही संस्था अशा आहेत की ज्यांचे कार्य व्यवस्थित चालणे अत्यावश्यक असते. मूळ रोग बरा होण्यासाठी या संस्थांचे काम नीट व्हायलाच लागते, उदा. पचनसंस्था. भूक नीट लागणे, अन्नपचन नीट होणे, पोट साफ होणे या क्रिया नीट व्हाव्याच लागतात. औषधाचे पचन होऊन ते शरीरात पुरेपूर स्वीकारले जाण्यासाठी पचनसंस्थेचे काम योग्य प्रकारे होणे अपरिहार्य असते.

 

 त्या दृष्टीने रोगावरच्या मुख्य औषधासह पचनास मदत करणारे एखादे औषध दिले जाते. हळूहळू पचन सुधारले, खाण्या-पिण्यासंबंधी अनुकूल बदलाने पचनक्रिया व्यवस्थित व्हायला लागली तर नंतर ही औषधे कमी करता येतात. पचनसंस्थेप्रमाणे दुसरी महत्त्वाची संस्था असते मूत्रसंस्था. एकंदर शरीरातील रक्तातील विषद्रव्ये मूत्रावाटे शरीराबाहेर काढली जात असल्याने मूत्र तयार होण्याची विसर्जनाची क्रिया व्यवस्थित होण्याची खूप आवश्यकता असते. मूत्रात कोणत्याही प्रकारचा दोष असला, किंवा मूत्रावाटे शरीरावश्यक धातू बाहेर पडत असले तर त्याचे संपूर्ण आरोग्यावर, एकंदर शरीरशक्तीवर बरेच दुष्परिणाम होऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे वीर्यशक्ती वाढवणे, शुक्रधातू संपन्न करणे, कारण रोग बरा करण्याचे, रोगाला जिंकण्याचे रोग पुन्हा होऊ देण्याचे महत्त्वाचे काम संपन्न शुक्रधातूवर अवलंबून असते. तेव्हा मूळ औषधाबरोबर या स्वरूपाचेही एखादे औषध असावे लागते. मूळ रोगासाठी किंवा ज्या अवयवाशी संबंधित रोग आहे, त्यासाठी औषध द्यावे लागतेच. अशाप्रकारे मुख्य औषध त्याला आधार देणारी या प्रकारची दोन-तीन औषधे देण्याने औषधांची, गोळ्यांची संख्या अधिक आहे असे वाटले तरी त्यामुळे खरे, सर्वांगीण आरोग्य मिळणार असते. शिवाय ही औषधे नैसर्गिक, खनिज, वनस्पतिज, प्राणिज कशीही असली तरी विधिवत बनविलेली असली शरीराला सात्म्य असमारी असली तर त्यांचा इतर दुष्परिणाम होण्याची अजिबात शक्यता नसते.

 

 पूर्वीच्या काळी रुग्णाला आवश्यक असणारी नेमकी भस्मे, वनस्पती चूर्ण वैद्य स्वतः पुडीमध्ये बांधून देत असत. कैक वेळा रुग्ण दररोज किंवा दोन-चार दिवसांनी वैद्यांकडे जाऊन याप्रकारे औषध घेत असे. पण आजच्या काळात औषध योग्य प्रमाणात, योग्य वेळेला घ्यायची क्रिया आपण रुग्णावंर सोपवणार असू तर औषधाचे स्वरूपही त्या अनुषंगाने सुटसुटीत असणे आवश्यक असते. शिवाय एखादे चूर्ण अर्धा चमचा घ्या असे सांगितले तर चमच्याचा आकार, औषध समतल प्रमाणात घेतले का कसे वगैरे गोष्टींमुळे नेमके, हवे तेवढ्या प्रमाणात पोटात जाईलच असे नाही. मग त्यासाठी चूर्णाऐवजी गोळ्या करणे भाग असते. रुग्णाचे निदान करून औषध देताना या गोळ्या कुटून एकत्र करणे शक् नसते. या सर्व व्यावहारिक सोयींच्या गोष्टींचा विचार करून औषधांची योजना केली तर तो "अतिरेक' वाटू नये, तसेच अन्नांश स्वरूप, नित्य सेवनाची, ताकद वाढविणारी औषधे पण घ्यावी लागतात. तेव्हा जास्त संख्येत येणारी औषधे म्हणजे "अतिरेक' असे नाही, ज्याने त्रास होतो अशा औषधांचा अतिरेक नसावा.

 

 

 औषधे घेताना हे लक्षात ठेवाच!

 जर तुम्ही बाजारात सहज उपलब्ध असलेले (ओटीसी) एखादे औषध स्वतःहून घेत असाल, किंवा मुलांना देत असाल तर, डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना त्याची माहिती द्या.

 बाजारात सहजपणे उपलब्ध असलेली औषधे घेण्यापूर्वी त्यांचे संभाव्य दुष्परिणाम नीट जाणून घ्या. त्याकडे दुर्लक्ष करू नका.

 औषधे घेताना प्रत्येक डोस नेमक्या दिलेल्या प्रमाणातच घ्या. अंदाजपंचे घेतलेले औषध त्रासदायक ठरू शकते.

 

 

 - डॉ. श्री बालाजी तांबे

 आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला.

 

 

 &nbsp  &nbsp  &nbsp

__._,_.___
MARKETPLACE

Get great advice about dogs and cats. Visit the Dog & Cat Answers Center.


Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.


Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.

.

__,_._,___

0 comments:

sponsers