त्रास कुणालाच नाही
इथे मुंबईमध्ये जीवाला आराम कसला तो मूळीच नाही. ट्रेनच्या रिकाम्या डब्यातून ( स्वप्नातल्या ) संध्याकाळी घरी परतल्यावर थोडा आराम करायचा म्हटला तर शप्पथ. थंड झालेला पचपचित चहा घोटभरच पिहून बिछान्यावर थोडा आडवा होताच कळते की लाईट गेली आहे. 'थंडी हवा का झोका' नावाने प्रसिद्ध कुठलाही पंखा शेवटी लाईट नसेल तर तो तरी बिचारा काय करणार. मुंबईमध्ये विज पुरविणार्या बेस्टची पण कमाल आहे. बाकी सर्व कामे आरामात चालतात पण माझ्यासारख्या प्रतिष्ठित माणसाने जरा दोन तीन महिने लाईटचे बील नाही तर मेले लगेच विज बंद करतात. अरे मी काय कुठे पळून जाणार होतो, दिले असते महिन्याभराने. इथे घराचे भाडे मी सहा महिन्यानंतर देऊनही घराचे मालक मलच हात जोडतात. आता दोन तीन लाईट बील न भरल्याने यांना काही लाखोंचे नुकसान होणार नव्हते. पण यांना बघवेल तर ना ! लगेच विज कापून टाकली. आता विजच नाही तर टिव्हि तरी कसा बघायचा. टिव्हि वरुन आठवले. टिव्हिचे सहा महिन्याचे हाप्ते उशिरा दिले तरी त्याचा काही त्रास नाही. इतकेच काय केबलची लाईनपण शेजार्यांकडे आलेल्या लाईन वरुन ( चोरुन ) तरी त्या केबल वाल्याचा काही त्रास नाही आणि हे मेले एखाद्या प्रतिष्ठित माणसाला त्रास द्यायला सदैव तत्पर पाण्याची लाईन घरात घेण्यासाठी वर्ष लागणार होते. म्हणून म्युनिसिपालटीच्या पाण्याच्या पाईपमधून गूपचूप एक लाईन माझ्या घरात घेतली. आता २४ तास पाणी असते. शेजारीपण आमच्याकडेच पाणी भरतात. आता समाजकार्य मी नाही तर आणखी कोण करणार ? आमच्या शेजाऱ्यांचेच उदाहरण सांगतो, पाण्याच्याचे बील भरुनही कधी कधी पाणी येत नाही. पण आमच्याकडे मात्र पाण्याची गंगा म्युनिसिपलटीच्या कृपेने सदैव वाहत असते, ते देखिल एक रुपया न भरता आणि तरीही त्यांना काही प्रॉब्लेम नाही.
__._,_.___
MARKETPLACE
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment