"याहु" च्या एका ग्रूप मधे वाचण्यात आलेली एक छान कविता. बघा आवडते का !!एक होता विदुषक....... एक होता विदुषक, खूप मेहनत करायचा, लोकांचे दु:ख दूर करण्यास, सदैव धडपडायचा. एक होता विदुषक, स्वता:चं दु:ख विसरायचा, दूस-यांच्या दु:खांना, आपलसं करायचा. एक होता विदुषक, कधीच नाहि रागवायचा, लोकांच्या हिणवण्याला, हसत हसत स्वीकारायचा. एक होता विदुषक, एकदा खूप दुखावला, दु:खाचा सागर, त्याच्यावर ओढवला. लोकांना हसवणे, त्याचे कमी झाले, अन लोकांनीहि त्याच्याकडे जाणे, हळू हळू बंद केले. एक होता विदुषक, एकटाच पडलेला, ह्या स्वार्थी लोकांनी, त्याला दु:खात ढकललेला. खूप आक्रोश केला, पण कोणी नाहि आले, शेवटच्या घटका मोजताना, त्याला जुने दिवस आठवले. लोकांना हसवण्यासाठि, जीवाचा आटापिटा करायचो, इकडे-तिकडे भटकत, पोटासाठि झगडायचो. एक होता विदुषक, असाच निघून गेला, लोकांच्या मनात मात्र, घर करून बसला. एक होता विदुषक....... |
Saturday, June 12, 2010
[marathi_in_mumbai] एक होता विदुषक.......
Posted by pooja at 12:59 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment