sponsers

Friday, June 11, 2010

[GarjaMaharashtraMaza] शिवाजी महाराजांवर इंग्रजी सिनेमा

 

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई 



छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली, मालिका निघाल्या, मराठी सिनेमे आले. पण या जाणत्या राजाचे महत्त्व उभ्या जगाला कळावे यासाठी आता इंग्रजी सिनेमा येणार आहे. महत्वाकांक्षी कलादिग्दर्शक नितीन देसाई हा भव्यदिव्य प्रकल्प वास्तवात आणणार आहेत. 

महाराष्ट्राची अस्मिता असणा-या शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्राबाहेर अनेक प्रवाद आहेत. या सा-या प्रवादांना उत्तर देण्यासाठी त्यांच्या भाषेतून महाराजांचे कर्तृत्त्व मांडणे आवश्यक आहे. यासाठीच ' ग्रेट वॉरियर राजा शिवछत्रपती ' या नावाने हा सिनेमा बनणार असून तो इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमधून प्रदर्शित होईल. 

एखाद्या साहसी हॉलिवूडपटाप्रमाणे यात चित्रीकरण करण्यात येणार असून त्यासाठी कोट्यवधींचे बजेट आखण्यात आल्याचे कळते. त्यासाठी हॉलीवूडमधून विशेष तंत्रज्ञानांना बोलावण्यात येणार आहे. येत्या २४ तारखेला ' राजा शिवछत्रपती ' या मालिकेच्या डीव्हीडी प्रकाशन सोहळ्यात या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात येईल. 

या सिनेमासाठी आवश्यक तेथे भव्यदिव्य सेट उभारण्यात येईलच. पण या सेट्सप्रमाणे महाराजांच्या कर्तृत्त्वाची साक्ष देणारे किल्ल्यांवर या सिनेमाची चित्रीकरण करण्याची देसाई यांची मनिषा आहे. त्यासाठी ते सरकार आणि पुरातत्त्व खात्याची परवानगीही घेणार आहेत. 

राजा शिवछत्रपती ' या मालिकेत महाराजांची भूमिका गाजवणारे डॉ. अमोल कोल्हेच या सिनेमात महाराजांची भूमिका करतील. तर चित्रपटांच्या लेखनप्रक्रियेत कवी गुलजार यांचा सहभाग असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

 

 

 

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.


Get great advice about dogs and cats. Visit the Dog & Cat Answers Center.


Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.

.

__,_._,___

0 comments:

sponsers