यशासाठी झगडताना...
ऊर्मिला आसगेकर
። जीवनात अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागंत. यात यश-अपयश या गोष्टीही आल्या. कधी अपयशानं अत्यंत नैराश्य येतं. मनात अभद्र विचार येतात. पण जीवन सुंदर आहे आणि तुमच्या आत्मीयांसाठी तुमच्या यशापेक्षा तुम्ही अनमोल आहात याच अवस्थेतून जाऊन यशस्वी झालेले श्रेष्ठी म्हणतात. ። अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यानं खचून जाऊ नका. ። शांतपणे आत्मपरीक्षण करा. "अपयश जरी आले, धैर्य तरी न टाकले' ही वृत्ती आत्मबळ येईल, पुन्हा प्रयत्नांसाठी उमेद येईल. ። दुसऱ्याबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा ती स्वतःबरोबरच करावी. त्यानं गुणवत्ता वाढेल व त्रुटी कमी होतील. ። पूर्वानुभव ध्यानी घेऊन पूर्ण नियोजन करून पुन्हा कामाला लागा. ። अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं कमीपणाचं नाही. ते प्रेरकच ठरेल. ። यश मिळणारच आहे, थोडे जास्त प्रयत्न करायचेत, असं मनाला बजावा हा सकारात्मक विचार कृतीत सहजता आणेल. ። नुकतीच ओळख झालेल्या शंतनू जोशीसारखे अनेक शंतनू जोशी आहेत. त्यांना डोळ्यांसमोर ठेवा. यशासारखं दुसरं यश नाही, आत्माविश्वासानं यशाची चव चाटवायला सज्ज राहा.
Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.
Post a Comment
0 comments:
Post a Comment