गुढीपाडव्याच्या दिवशी आसमंतात प्रसन्नता दरवळते ती संस्कार भारती या सामाजिक संस्थेतफेर् काढण्यात येणाऱ्या रांगोळीच्या पायघड्यांमुळे! आकर्षक रंगसंगती व भव्यतेचा संगम असणाऱ्या या रांगोळ्या यंदा कळवा येथील गावदेवी मैदानात होत असून हिंदू शुभचिन्हांसह पोट्रेट आणि थ्री डी स्वरुपाच्या वैैविध्यपूर्ण रांगोळ्यांंचे एकत्रित फ्युजन पाहण्याची संधी कळवावासियांना यानिमित्ताने चालून आली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवषीर् निघणाऱ्या शोभायात्रांमध्ये संस्कार भारती संस्थेतफेर् काढल्या जाणाऱ्या रांगोळीचा महत्त्वाचा वाटा आहे. शोभायात्रेच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा तसेच एखाद्या मैदानात भव्य प्रमाणात रांगोळी काढल्याने यात्रांना मिळणाऱ्या प्रतिसादात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. हीच परंपरा कायम ठेवत यंदा संस्कार भारतीच्या कळवा समितीतफेर् येथील गावदेवी मैदानात ५० बाय ५० फुटांची रांगोळी काढली जाणार असल्याची माहिती समितीच्या उपाध्यक्ष अरुणा लोंढे यांनी दिली. केवळ पानाफुलांची रांगोळी काढून तिला आकर्षक करण्यापेक्षा तरुण पिढीस मार्गदर्शन करणारा एखादा संदेश देण्याचा प्रयत्न या रांगोळीतून केला जाणार आहे. महाराष्ट्रच नाही तर आपल्या कर्तृत्वाने अवघ्या राष्ट्रासाठी आदर्श उभा करणारे शिवाजी महाराज अश्वारुढ स्वरुपात या रांगोळीत दाखवले जातील. विशेष म्हणजे ही रांगोळी खडेमीठातून साकारली जाणार असून त्यासाठी १०० किलो खडेमीठ वापरले जाईल. महाराजांसह त्यांची मोडी लिपीतील राजमुदा वठवण्याचा प्रयत्नही समितीचे स्वयंसेवक करणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले. त्याभोवती 'सार्मथ्य आहे चळवळीचे' हा रामदास स्वामींचा उपदेश गिरविण्यात येईल. राष्ट्रप्रेमासह पर्यावरण संवर्धनाचे धडेही या माध्यमातून दिले जाणार आहेत. आतापर्यंत ७ जागतिक आश्चर्ये, १८५७ चा राष्ट्रीय उठाव असे देखावे साकारणारे समितीचे स्वयंसेवक यंदा ध्वनी व जलप्रदूषण रोखण्याचे उपाय, उजेर्ची बचत याविषयी माहिती देतील. १४ मार्च रोजी रात्री समितीचे २५ स्वयंसेवक रांगोळी काढण्याची सुरुवात करणार असून १० तासात ४५० किलो रांगोळी व रंगांचा वापर करून कलेचा हा आविष्कार पुढील २ दिवस सर्वांना पाहण्यासाठी खुला केला जाईल.
Post a Comment
0 comments:
Post a Comment