सुखकर्ता दुःखहर्ता
वार्ता आनंदाची !
अविस्मरणीय खेळी
तुझी द्विशतकाची !
सर्वांगी सुंदर उधळण
चौकारांची !
आकाशी झळके माळ
उत्तुंग षटकारांची !
जय देव जय देव जय
तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा
मानाचा मुजरा !
जय देव जय देव ..
१४७ चेंडू खेळपट्टी
वरी उभा !
सर्व गोलंदाजांची
दिसे दिव्य शोभा !
मदतीला कार्तिक पठाण
धोनी आले गा !
धावांचा डोंगर उभा
राहिला बघा !
जय देव जय देव जय
तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा
मानाचा मुजरा !
जय देव जय देव ..
दुमदुमले मैदान झाला
जल्लोष !
थरथरला गोलंदाज मानिला
खेद !
कडाडली बॅट चेन्डुचा
शिरच्छेद !
असामान्य अद्भुत
शक्तिचा शोध !
जय देव जय देव जय
तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा
मानाचा मुजरा !
जय देव जय देव..
घालीन लोटांगण वन्दिन
चरणं !
डोळ्याने पाहिले
द्विशतक तुझे !
पोस्टर लावूनि, आनंदे
पुजिन !
भावे �"वाळीन, "सचिन"
नामा !
त्वमेव ब्रॅडमन,
बॉर्डर त्वमेव !
त्वमेव गावसकर, लारा
त्वमेव !
त्वमेव फलंदाज,
गोलंदाज त्वमेव !
त्वमेव क्षेत्ररक्षक,
�`लराउन्डर त्वमेव !
गुड लेन्थ टाकले,
यॉर्कर टाकले !
बाउन्सर टाकले ,
व्यर्थ सारे !
ड्राइव्स तू मारले,
पुल तू मारले !
फ्लिक्स तू मारले,
सार्थ सारे !
हरे सचिन, हरे सचिन,
सचिन सचिन हरे हरे
हरे तेंडुलकर, हरे
तेंडुलकर, तेंडुलकर
हरे हरे !!
__._,_.___
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment