sponsers

Tuesday, March 30, 2010

[GarjaMaharashtraMaza] कॉम्प्युटर स्लो झाल्यास रिस्टार्ट करायचे टाळा.

 

"कॉम्प्युटर स्लो झाल्यास रिस्टार्ट करायचे टाळा."

बर्‍याच वेळेस कॉम्प्युटरवर भरपूर काम केल्याने अथवा भरपूर निरनिराळे सॉफ्टवेअर्स उघडून काम केल्याने कॉम्प्युटर त्या वेळेस थोडासा स्लो होतो म्हणजेच थोडासा हळू चालू लागतो. त्याची झालेली संथ गती आपल्या लक्षात आल्यानंतर आपण कॉम्प्युटर रिस्टार्ट करतो म्हणजेच बंद करुन पून्हा सुरु करतो. जेणे करुन त्याच्या मेमरी मध्ये निर्माण झालेला गुंता सुटून तो पुन्हा व्यवस्थित चालू लागतो.  या परीस्थितीवर चांगला पर्याय म्हणून आपण नेहमी तो कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु करतो, म्हणजेच 'रीस्टार्ट'  करतो. मग या कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु करण्याच्या वेळेमध्ये आपली २-३ मिनिटे वाया जातात.

काम करताना थोडासा स्लो झालेला कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु केल्याने कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये झालेला गुंता सुटून तो पुन्हा व्यवस्थित चालू लागतो. अशाप्रकारे कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये झालेला गुंता सोडविण्यावर कॉम्प्युटर 'रीस्टार्ट'  करणे हा एकच पर्याय नाही. कॉम्प्युटर 'रीस्टार्ट'   न करता देखिल स्लो झालेला कॉम्प्युटर व्यवस्थित करता येतो. असे करताना कॉम्प्युटरमधिल मेमरीमध्ये झालेला गुंता सोडविण्याची क्रिया खाली दिली आहे.

१. कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर माऊसचे राईटक्लिक करुन येणार्‍या चौकोनातील 'New'  या विभागातील  "Shortcut"  या नावावर क्लिक करा.


२. आता आपल्यासमोर 'Create Shortcut'  चा चौकोन उघडेल.  त्यातील 'Type tye location of item:'  च्या खालील जागेमध्ये खाली दिलेली ठळक अक्षरातील ओळ कॉपी करुन त्याजागी पेस्ट करा व खालिल Next >  या बटणावर क्लिक करा.

%windir%\system32\rundll32.exe advapi32.dll,ProcessIdleTasks


३. आता पुढील चौकोनामध्ये 'Type a name for this shortcut'  च्या खालिल जागेमध्ये "Clear Memory"  असे टाईप करुन खालिल Finish  या बटणावर क्लिक करा.


४. असे केल्याने आता कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर  "Clear Memory"  नावाची एक फाईल तयार होईल. मग जेव्हा-जेव्हा आपणास कॉम्प्युटर स्लो झालेला जाणवेल तेव्हा कॉम्प्युटर 'रीस्टार्ट'  न करता फक्त या फाईलीवर डबलक्लिक करुन पुन्हा कॉम्प्युटरचा वेग सुरळीत करा.


Best Regards,

Mahesh Bhoir
www.agrizatka.tk
www.maheshbhoir.tk
www.maheshbhoir.co.cc
+91 9870560065

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Do More for Dogs Group. Connect with other dog owners who do more.


Welcome to Mom Connection! Share stories, news and more with moms like you.


Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.

.

__,_._,___

0 comments:

sponsers