डॅड सीमेन्स पीएच.डी. स्कॉलरशिप - जर्मनीत प्रगत शिक्षणाची संधी
<http://www.addthis.
<http://www.loksatta
<http://www.loksatta
चंद्रगुप्त अमृतकर , बुधवार, २४ फेब्रुवारी २०१०
ग्लोबल फीचर्स / globalfeatures@
http://www.loksatta
विषय:
जर्मन विद्यापीठात कार्यरत वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली आणि सीमेन्स कॉर्पोरेट टेक्नॉलॉजीमधील वैज्ञानिकांच्या बरोबरीने काम करीत पीएच.डी. डिग्री मिळविण्याची संधी यातून भारतीय विद्यार्थ्यांना दिली जाते. यासाठी विषयाची निवडही लवचिक ठेवण्यात आली आहे, जसे फ्लेक्झिबल प्रॉडक्शन सिस्टीम्स, ऊर्जा उपयोगितेसाठी नाविन्यपूर्ण चुंबकीय सामग्री, मोबाइल आणि एम्बेडेड सिस्टीम्ससाठी परिस्थितीजन्य गरजांचा विकास वगैरेंचा समावेश करण्यात आला आहे.
पात्रता:
उत्तम शैक्षणिक कामगिरी असणारे उच्च पात्रताधारक पदवीधर या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतील. विशेषत: आयआयटी, आयआयएससी, आयआयएसईआर अशा प्रगत शिक्षणाच्या संस्था आणि निवडक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. अर्ज करतेसमयी उमेदवाराचे भारतातील निवास आवश्यक आहे. अर्जासोबत उमेदवाराने निवडलेल्या अभ्यास/ संशोधनाच्या क्षेत्रातील दोन मान्यवर व्यक्तींची शिफारस पत्रे जोडणे आवश्यक ठरतील. इंग्रजी भाषेतील प्रावीण्याच्या चाचण्या जसे टोफेल, आयईएलटीएस (TOEFL 550/213/80; IELTS: 5.5) वगैरेना उमेदवाराच्या अतिरिक्त पात्रता म्हणून गृहित धरले जाईल. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन धाटणीची आहे.
शिष्यवृत्ती रक्कम:
दरमहा १००० युरो (साधारण रु. ६२,६००) विद्यावेतन म्हणून दिले जाईल. या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे फायदे जसे भारत ते जर्मनी आणि पुन्हा परतीच्या विमान प्रवासाचे भाडे, विद्यापीठाचे शिक्षणशुल्क, अभ्यास व संशोधन सबसिडी आणि सक्तीचा आरोग्य विमा वगैरेंचा डॅड शिष्यवृत्ती अंतर्गत समावेश करण्यात आला आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: २८ फेब्रुवारी २०१०
संपर्क: श्रीमती अनुरूपा दिक्षित
पत्ता: German Academic Exchange Service
Mrs. Anuroopa Dixit
IIIrd Floor, 72 Lodi Estate, Lodi Road
New Delhi - 110 003
Tel.: +91 11 2461 5148 / 2461 5009
Fax: +91 11 2469 0919
E-Mail: dixit@daaddelhi.
WWW: www.daaddelhi.
0 comments:
Post a Comment